पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
मांसाहार जिंदाबाद ...!!
सोने गं सोने, रांधल्या का तुने बेडूकाच्या खुला खेकड्याची आमटी अन् गांडूळाच्या शेवया...!!
गोचिडाची खिचडी टमगिर्याचं भरीत डासाचा अर्क घे घुबडाच्या तर्रीत जरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण घे पुरणात भराया .....!!
गोमाश्यांचा लाडू कर त्याला सरड्याचा रंग दे उवा-टोळ पिळूनी सापा-विंचवाचा पाक घे उंदराची चटणी, पालीची सलाद घे तोंडास लावाया ....!!
कोंबडी नी बकरी निरुपद्रवी जनावर तुझ्या जिभेचे चोचले उठती त्यांच्या जीवावर गरिबाला सुळी, शत्रूला अभय का करीशी अन्याया?....!!
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.