पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मढे मोजण्याला
लपेटून फासामधी कायद्याला ससे वाकुल्या दावती पारध्याला
नको पाडसा आज कळपास सोडू चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला
जवानीत होता उतावीळ श्रावण अता फ़ागही ना विचारीत त्याला
तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे कुणी येत नाही मढे मोजण्याला
करा की नका काम कोणी पुसेना बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला
इथे देवळाच्या चिखल भोवताली स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.