फसगत
कसं उठून नभाळ
मोर फुलून बसला
बाप खुळ्या आशेवर
शेता अनवाणी गेला
सूर्य माघारी फिरला
आता वाराही हारला
बाप जिद्दी माझा भला
नाही परते घराला
पण नभा नहीं कळं
दिसे जमिनीला वळं
मीठ डोळ्यातून गड्या
खुल्या जखमेवर गळं
फसे मोरही बिचारा
गप्प मिटून पिसारा
'तो' नाही कोसळणार
फार कळले उशिरा
- प्रशांत पनवेलकर
वर्धा.
-------------------------
(षडाक्षरी)

सुरेख कविता.
गंगाधर मुटे
सुरेख कविता.