![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा
अपुल्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा
अनुशेष सिंचनाचा हा प्रश्न कोरडा अन
शेतात मग खतांचा उपयोग काय सांगा
फासावरी लटकते कर्जातली जवानी
कवितेतल्या बटांचा उपयोग काय सांगा
किल्या मधेच शत्रू पोसून ठेवले मग
मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा
शेतात फाटलेल्या चपलेतल्या गड्याला
तुमच्या नव्या बुटांचा उपयोग काय सांगा
पैशावरीच देता निवडून जर पुढारी
अनमोल या मतांचा उपयोग काय सांगा
पाठीत मारण्याचा त्यांचा स्वभाव आहे
युध्दात चिलखतांचा उपयोग काय सांगा
इतक्यात वादळाने झुकणार जर असू तर
खंबीर पर्वतांचा उपयोग काय सांगा
निष्णात सारथ्यांनो पकडा लगाम हाती
गतिमान या रथांचा उपयोग काय सांगा
वा-यावरीच आहे ज्यांची मिरासदारी
फसव्या अशा ढगांचा उपयोग काय सांगा
नितीनदेशमुख बेलोरा
प्रतिक्रिया
सुरेख गझल
सुरेख गझल
शेतकरी तितुका एक एक!
पोथीतल्या कथांचा.......
अप्रतिम गझल!
हेमंत साळुंके
अप्रतिम गुरुजि
अप्रतिम
वा !
छानच ! !
राजीव मासरूळकर
पाने