Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

वाचकांना अंतर्बाह्य चिंब करणारा मेनका धुमाळे यांचा 'कोरडा पाऊस' कथासंग्रह.

Main page content

By Anant | 10:04 PM IST, बुध November 25, 2026
महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण

वाचकांना अंतर्बाह्य चिंब करणारा मेनका धुमाळे यांचा 'कोरडा पाऊस' कथासंग्रह.

साहित्य क्षेत्रामध्ये कवींच्या तुलनेत कथाकारांची संख्या तशी कमीच. त्यातल्यात्यात महिला कथाकार म्हणाल तर अगदी बोटावर मोजता येतील एवढ्याच ! मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागात अनेक हात लिहिते झाले आहेत ही अभिमानास्पद बाब असली तरी ज्या मराठवाड्याने आद्यकवी मुकुंदराज, आद्य कवयित्री महदंबा अशी अस्सल रत्ने साहित्य वर्तुळाला दिली त्या भागातील साहित्यिक स्थिती आजही सोचनीय आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. एकूणच साहित्य क्षेत्राला जातीयता, टोळी, कंपू, राजकारण यांचे ग्रहण लागले आहे. असे असले तरी काही मंडळी या सर्वाकडे दुर्लक्ष करत आपल्या लिखाणात सातत्य ठेवून आहेत. त्यापैकीच लातूर स्थित मेनका धुमाळे हे एक नाव. मनाने अत्यंत हळवी, संवेदनशील असलेली ही लेखिका समाजभान जपत स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ लेखन करते तेव्हा तो कौतुकास्पद विषय ठरतो. त्यांना वाचन व लेखनाचा वारसा हा तसा घरातूनच मिळाला.
'कोरडा पाऊस' हा धुमाळे यांचा चर्चेतील कथासंग्रह. 'आता उसळू देत लाटा' हा त्यांचा पहिला दखलपात्र कवितासंग्रह यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे. स्री शिकली, नोकरी करू लागली, पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली तरी तिच्या वाट्याला येणारी अवहेलना अजूनही कमी झालेली नाही अशी त्यांची परखड आणि तितकीच रास्त भावना आहे. त्यामुळेच शब्दांनाच सखा, मित्र मानणाऱ्या या लेखिकेने शब्दांद्वारे आपल्या अंतरीच्या दुःखाला मोकळी वाट करून दिली.
मदनच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मनिषाला वास्तवाचे चटके बसतात तेव्हा तिचे डोळे उघडतात पण तोपर्यंत खुप उशीर झालेला असतो. परंतु सुरेश देवधर हा तरुण तिच्या रुक्ष वाळवंटात ओयासिस बनून येतो आणि तिच्या उजाड झालेल्या जीवनात पुनश्च पालवी फुटते. अशा आशयाच्या 'दशकपूर्ती' कथेने कथासंग्रहाची सुरवात नक्कीच आशादायक झालेली आहे. कथेचे दुसरे पुष्प म्हणून 'मर्यादा' कथेचा उल्लेख करता येईल. केवळ ज्ञान मिळविण्याच्या लालसेने मराठवाड्यातील नांदेड सारख्या शहरातून परराज्यातील बेंगलोर मध्ये आंतरराष्ट्रीय सेमिनारसाठी गेलेल्या मनिषाची सेमिनार संपल्यानंतर पुन्हा नांदेडला जाणारी रेल्वे चुकल्यावर तिला तेथील स्टेशनवर जो अविश्वसनीय परंतु तितकाच वास्तव अनुभव येतो त्याची हकिगत म्हणजे ही एक आगळीवेगळी कथा ! या संकटाच्या रात्री एक अनोळखी तरूण स्वतःच्या पुरूषत्वाच्या मर्यादांचे भान राखून या संकटग्रस्त मुलीला वासनेचा स्पर्शही होऊ न देता एक रात्रभर आपल्या कुशीत घेऊन अभय देतो याची कहाणी वाचून मन प्रसन्न होते.
नुकतेच लग्न होऊन सुखी संसाराच्या स्वप्नांसह सासरी नांदायला आलेल्या सुनंदाला आपल्या नवर्‍याचे जावेबरोबर संबंध असल्याचे कळते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. पतीसोबत पावसात भिजण्याचे गोड स्वप्न पाहत स्वत:हून आपलं सर्वस्व ज्याच्यावर ओवाळून टाकण्याची तिची तयारी असते तो नवरा नावाचा अधम पुरूष लांडग्यासारखे तिच्या शरीराचे लचके तोडतो त्यामुळे ती मुसळधार पावसातही कोरडीच राहते...! मिनलच्या अवेळी वयात येण्याने परेशान झालेली तिची आई सुमनची काळजी अगदीच अनाठायी नसल्याचे मिनलच्या पराक्रमावरून वाचकांच्या लक्षात येते. कमी वयात कसलेही अनुभव नसलेली मुले मुली उत्सुकतेपोटी नको ते पाऊल उचलतात आणि नंतर त्यांच्यावर पस्तवायची वेळ येते. त्यामुळे त्यांच्या आई वडीलांनी या काळात त्यांचे मित्र बनून त्यांना विश्वासात घेत त्यांच्या शंकांचे, समस्यांचे निराकरण करायला हवे असा मोलाचा संदेश लेखिका 'जाहिरात' या कथेतून देते.
मधुरा आणि मंदार एकाच ऑफिसात काम करणारे सहकारी. आई-वडीलांचे आजारपण, भावाचे शिक्षण आणि बहिणींची लग्ने या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता मधुराचे लग्नाचे वय उलटून चालले होते. तिच्या भावभावनांचा विचार न करता तिचे कुटुंबिय फक्त आपापला स्वार्थ पाहण्यात दंग झाल्याने उद्विग्न झालेल्या मधुराला मंदारची निस्वार्थ साथ भेटते. यातूनच त्यांची जवळीक वाढते आणि इतके दिवस स्वतःतील नैसर्गिक उर्मी नैतिक अनैतिकच्या बंधनाखाली दाबून ठेवलेल्या मधुला आयुष्यातील वाळवंट त्यागून त्यात नंदनवन फुलवण्याचे भावविभोर स्वप्ने पडू लागतात. या आशयाची 'अनैतिक' कथा वाचतांना मानवी भावनांचे निरनिराळे पदर आपल्यासमोर आपसूकच उलगडत जातात.
उच्च असो की कनिष्ठ असो, जात धर्म कोणताही असो, पण बाईकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाहीय. आजही ती एक उपभोगाची वस्तूच आहे. शिकली, नोकरी केली तरी तिने बाई म्हणून असणारे तिचे बाईपण जपलेच पाहिजे, नाहीतर ती व्यभिचारी. कधी बदलणार हे चित्र ? असा रोखठोक सवाल लेखिका 'दुसरा नवरा' या कथेतून समाजाला विचारते आहे. पहिल्या नवऱ्याच्या कटू आठवणी विसरू पाहणारी प्रिती घरच्यांच्या आग्रहास्तव दुसर्‍या लग्नाला कशीबशी तयार होते तर तिला पहायला येणाऱ्या बिजवरांच्या अपेक्षा ऐकून ती अचंबित होते. प्रत्येकजण फक्त तिच्या पगारावर डोळा ठेवूनच पहायला आलेला. नकाराचा अधिकार हा स्रियांनाही हवा हे सुचवणारी ही कथा खरोखरच क्रांतिकारी विचार पेरणारी आहे.
काॅलेजात शिकवणाऱ्या जाधवांच्या शारदेला तिन बहिणी आणि एक भाऊ. वडिलांचा कॅन्सर सारखा जीवघेणा आजार, लहान भावाचे शिक्षण आणि तिन्ही बहिणींची लग्नं, बाळंतपणं, पाव्हणा-रावळा हे सगळं सांभाळता सांभाळता आपल्या वैवाहिक सुखावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र घरच्यांसाठी राबणाऱ्या शारदेवर एकाच वेळी वडील आणि आई यांना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ येते आणि कहर म्हणजे वडील दवाखान्यात शेवटचा श्वास घेतात ही गोष्ट कुणालाच माहीत नसते. तेव्हाच डाॅक्टर आईच्या पोटात वेगाने वाढणाऱ्या ट्युमरवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा शारदेला सल्ला देतात. त्यावेळी वडीलांच्या पार्थिवावर गावी जाऊन अंत्यसंस्कार करणे आणि दुसर्‍याच दिवशी घरातील सर्वांचा विरोध पत्करून आईला शस्त्रक्रियेसाठी पुन्हा दवाखान्यात दाखल करावे लागणे हा मोठा बाका प्रसंग तिच्यासमोर उभा राहतो तेव्हा वाचकाचेही ह्रदय आपोआपच द्रवते आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. अशी काळीज पिळवटून टाकणारी 'मरणतांडव' ही कथा लेखिकेच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळे एका सुशिक्षित कुटुंबाची कशी वाताहत होते याचे वर्णन करणारी कथा म्हणून 'करपलेलं मन' या कथेचा, तसेच पोरीच्या जीवावर स्वतःचं कुटुंब चालवू पाहणाऱ्या परजीवी आई बापाच्या तावडीत सापडलेल्या दुर्दैवी मुलीची करूण कहाणी म्हणून 'मला मरायचंय' या कथेचा उल्लेख करता येईल. मन मारून जगणाऱ्या स्त्रीची डायरी म्हणजे 'मुकी पाने' या कथेने कथासंग्रहाचा शेवट केलेला आहे.
मेनका धुमाळे यांच्या उक्त कथा वाचतांना स्त्रियांच्या गुलामी, दास्यत्व, कौटुंबिक अन्याय-अत्याचार, बलात्कार, समाजाने फक्त तिच्यासाठी आखून दिलेल्या लक्ष्मणरेषा या दुखऱ्या नसेवर लेखिकेने आवर्जून बोट ठेवलेले आहे याची पदोपदी जाणीव होत रहाते. त्यांनी हाताळलेले काही विषय नाजूक असले तरी त्यावरही सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे. वावर प्रकाशन लातूर ने प्रकाशित केलेल्या या २१६ पानी कथासंग्रहात एकूण ११ कथांचा समावेश असून सरदार जाधव यांचे कल्पक मुखपृष्ठ अन् राजन गवस यांची दमदार पाठराखण त्याला लाभलेली आहे. मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डाॅ.राजन गवस, प्रा.डाॅ.भास्कर बडे यांचे ऋणनिर्देश व्यक्त करणारा हा कथासंग्रह दळवी, बडे आणि आमले कुटुंबियांना अर्पण केलेला असून कथासंग्रहाच्या दशकपुर्तीच्या निमित्ताने त्यावर मला व्यक्त होता आले याचे समाधान वाटते. वाचकांच्या मनावर गारूड घालणारा हा 'कोरडा पाऊस' अजूनही दीर्घकाळ बरसत राहो याच एकता परिवाराच्या वतीने मेनका धुमाळे यांना शुभेच्छा !

समीक्षक - साहित्यिक अनंत कराड
अध्यक्ष - एकता फाउंडेशन
अध्यक्ष - म.सा.प.शिरूर कासार
संचालक, मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर.

कथासंग्रह - कोरडा पाऊस
लेखिका - मेनका धुमाळे, लातूर
प्रकाशक - वावर प्रकाशन, लातूर
मुखपृष्ठ - सरदार जाधव
पृष्ठ - २१६. मूल्य - २००/- रू.

महिला, महिला कथाकार, स्त्री संवेदना
  • Log in or register to post comments
  • 3 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 8 सदस्य उपस्थित आहेत.
  • Subhash.patil
  • Anant
  • sandip-7829
  • Rajshree
  • RANGNATH TALWATKAR
  • bade-bhaskar
  • Abhay Dandekar
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 55 *
Who's new नवीन सदस्य
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar
  • Kiran mahadev …
  • roshankumarpil…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • छान
    1 minute 31 seconds ago
  • छान रचना
    2 minutes 54 seconds ago
  • छान
    9 minutes 18 seconds ago
  • छान रचना
    10 minutes 18 seconds ago
  • प्रतिक्रिया
    14 minutes 40 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हॉट चिप्स 9
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 9
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 9
गझल 8
शेतकरी पात्रता निकष 8
फुलू दे शिवारी 8
कागद अजून कोरीच आहेत 8
कल्पनांमधला शेवट आनंदीच का? 8
पूर 8
बरं झाल देवा बाप्पा...!! 8
शेती :-एक जुगार 8
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 8
काही सुटे अन काही मुटे शेर 8
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 8
आम्ही शेतकरी... 8
दुःख मातीतले.... 8
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 8
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 7
माझ्या धन्यासाठी 7
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 7

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,180
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,150
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,384
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,275
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,252
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,178
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,769
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,967
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,898
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,508
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,965
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,763
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,006
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,615
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,472
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,808
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,277
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini