महाबळेश्वर संमेलनाला कसे पोचावे
महाबळेश्वरला पोहोचण्याचे मार्ग:
१) पुणे-महाबळेश्वर : पुण्यावरून वाई मार्गे ३-४ तासांत पोहोचता येते.
२) मुंबई-महाबळेश्वर : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून वाई मार्गे ५-६ तास लागतात.
३) बस (Bus) : स्वारगेट (पुणे) किंवा मुंबईतून महाबळेश्वरसाठी नियमित एसटी आणि खाजगी बसेस उपलब्ध आहेत.
४) ट्रेनने (Train) : जवळचे रेल्वे स्टेशन वाठार (६० किमी) आहे, पण पुण्याची रेल्वे कनेक्टिव्हिटी जास्त सोयीची आहे.
=~ =~ =~ =~ =
महाबळेश्वरवरून संमेलन स्थळी कसे पोहोचावे :
१) महाबळेश्वर ते जावळी फाटा २२ कि.मी. (डोंगराळ रस्ता असल्याने चारचाकी वाहनाला 40 मिनिटे लागतात)
२) जावळी फाटा ते दाभे मोहन (संमेलन स्थळ) 21 कि.मी. (चारचाकी वाहनाला 1 तास लागतो)
प्रवासाचे नियोजन
अ] स्वतःचे वाहन :
१) २० फेब्रुवारीला स्वतःच्या वाहनाने यायचे असल्यास २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाभे मोहन येथील संमेलनस्थळी पोचावे. त्यानंतर डोंगराळ भाग असल्याने प्रवास अवघड/अशक्य होईल.
२) २१ फेब्रुवारीला स्वतःच्या वाहनाने यायचे असल्यास २१ फेब्रुवारीला सकाळी लवकरात लवकर दाभे मोहन येथील संमेलनस्थळी पोचण्याचा प्रयत्न करावा.
ब] बस प्रवास :
१) २० फेब्रुवारीला बसने यायचे असल्यास २० फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजेपर्यंत जावळी फाटा येथे पोचावे. तिथून शेअरिंग वाहनाची व्यवस्था असेल. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जावळी फाटा पोचणे शक्य नसेल तर महाबळेश्वर किंवा जावळी फाटा येथे मुक्काम करावा.
२) २१ फेब्रुवारीला बसने यायचे असल्यास २१ फेब्रुवारीला येणारांनी सकाळी १० वाजेपर्यंत जावळी फाटा पोचावे. तिथून शेअरिंग वाहनाची व्यवस्था असेल. त्यानंतर आल्यास स्पेशल वाहनाने यावे लागेल.