Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

गीत रचना घाबरायचं नाय...

Main page content

Anu25488
By Anu25488 | 3:50 PM IST, शनी December 17, 2022
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय

धरणामध्ये गेलं घर तरी कोरडीच शेती
फाटला संसार सारा उसवली नाती
इस्कटला खोपा पुन्हा ईनायाचा हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय

लटकुनी बा गेला, तू तसा ईचार नको करू
भेगाळल्या वावरामंदी अवंदा बारूद पेरू
लढूनिया हक्क अपुला मिळवायचा हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय

आत्महत्या करून कुठे सुटतो कारे प्रश्न?
उचल दुःखाचा गोवर्धन तूच बनुनिया कृष्ण
सावकारी पाढा आता पुन्हा गिरवायचा नाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय

पिढ्यांपिढ्यापासून सुरू नियतीशी भांडण
दुःख पचवूनी जगा देशी सुखाचं आंदण
सातबाऱ्याचं चक्रव्यूह तुला तोडायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय

कृषीप्रधान देशातून दिसेनाशी होईल माती
सिमेंटच्या जंगलात अमली पदार्थांच्या राती
जुलमी कपटी धोरणास या गाळायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय....
••••
श्री.अनिकेत जयंतराव देशमुख
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम
ता. जि. अकोला 444006
MO. 9689634332
Email - anudesh25488@gmail.com

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 2085 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • प्रतीक
  • thakshyam@gmail.com

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 23 *
Who's new नवीन सदस्य
  • प्रतीक
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 10 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 10 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 10 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 10 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 11 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
असा आहे आमचा शेतकरी 0
हारासी 0
शेतमालाला भाव द्या 0
नाना पाटेकर : शरद जोशींचे चारित्र्य अभ्यासक्रमात लावा 0
अन्य ग्रहावरील सजीव सृष्टी अशी असेल! 0
14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आणि स्ट्रॉबेरी शेती भेट 0
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 0
शेतकरी पात्रता निकष 0
रूप सज्जनाचे 0
फ़ुलझडी..........!!!! 0
सजणीचे रूप : अभंग ।।३।। 0
जात्यावरची गाणी 0
चिडवितो गोपिकांना 0
विपरीत 0
पैशापुढे नतमस्तक 0
अवघ्या २० हजारात कृषी कार्यालये हायटेक ? 0
कापसाचा उत्पादन खर्च 0
अंगारमळा - आत्मचरित्र 0
आधी महायुद्ध नंतर यशू-बुद्ध 0
माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस 0

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,987
कान पकडू नये 25,872
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,544
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,337
माय मराठी स्तवन git 25,331
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,061
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,027
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,408
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,974
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,943
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,920
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,889
हे गणराज्य की धनराज्य? 23,822
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini