नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उध्वस्त आज केला माणूस पावसाने!
(गझल)
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
इतकी कशी बदलली या कूस पावसाने?
उध्वस्त आज केला माणूस पावसाने!
बुडत्यास वाचवूनी जिंकायचा सदा पण
सपशेल आज हरला पाऊस पावसाने
बरसायची तयाला आली लहर अशी की
शेतात ठेवला ना कापूस पावसाने
हिरव्या वसुंधरेवर अन्याय वाढल्याने
उट्टेच काढले बघ खरपूस पावसाने
दसरा दिवाळिलाही उघडाच अन्नदाता
शेतात घातल्यावर धुडगूस पावसाने
व्याकूळ तूर कोठे करपून ऊस गेला
पाहू दिलाच नाही हापूस पावसाने
धुसफूस एवढी का नात्यामधे अचानक
का लावली तुलाही या फूस पावसाने?
◆ चंद्रकांत कदम (सन्मित्र)
नांदेड
मो.9921788961
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने