Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी

Main page content

Kiran dongardive
By Kiran dongardive | 5:40 PM IST, बुध September 06, 2017
गद्यलेखन स्पर्धा-२०१७
वैचारिक लेख

काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी

३ डिसेंबर बहिणाबाईंची पुण्यतिथी . त्यानिमित्त..निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या अशिक्षित स्त्रीचे काव्यातून प्रकट होणारे तत्त्वज्ञान शिक्षितांनाही लाजविणारे आहे. जात्यावर किंवा चार स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांनी ओव्या, गाणी म्हणावीत ती सोपान चौधरी यांनी लिहून ठेवावीत, आचार्य अत्रे यांनी ती पाहावीत आणि संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडणारी कविता प्रकट व्हावी, हा एक अद्भुत योगायोग होय. खांदेशामध्ये जन्मलेल्या बहिणाबाई या खर्‍या अर्थाने निसर्गकन्या होत्या. त्यांच्या कवितेत शेतकरी, रानवनातील निसर्ग,कष्टकरी या सार्‍यांचे वर्णन आलेले आहे. अप्रतिम प्रतीके सहज व सोपी शब्दरचना कवितेतून अगदी आपलासा वाटावा असा गोडवा आणि शेवटी डोळय़ात झणझणीत अंजण घालणारा व आपलासा वाटणारा उपदेश या सर्व पार्श्‍वभूमीवर बहिणाबाई यांची कविता मनामध्ये कधी घर करते ते वाचकाला कळतच नाही. 
माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिणीच्या मनी,किती गुपित पेरली
सरस्वतीप्रमाणेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्या भक्त होत्या. मातीचे ऋण मानण्याचे तत्त्वज्ञान त्या काळात त्यांच्याकडे होते. त्याचप्रमाणे सूर्य हा सृष्टीपोशिंदा आहे हेही त्यांच्या काव्यातून प्रकट होते. 
अरे देवाचं दर्शन झालं आपसुक।
हिरीदात सूर्यबापा दाये अरूपाचा रूप॥
माहेरवासीन स्त्रियांच्या नशिबी येणारे सुख व सासरच्या व्यथा हा बहिणाबाईंच्या काव्यांचा आणखी एक पैलू होता. बहिणाबाईंच्या माहेरच्या वर्णनात त्या स्वत:चे माहेर शोधू लागतात. माहेरच्या वाटेने जाणारं मन माहेरपणासाठी कसं आसूसलेल असतं यांची जाणीव बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर होते.
माझ्या माहेराच्या वाटे, जरी आले पायी फोड
पाय चालले चालले, अशी माहेराची ओढ
पायाला फोड आले तरी पाय थांबत नाहीत ते माहेराच्या दिशेने चालत राहतात. अशा प्रकारचे वर्णन त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. घरोटा,संसार अशा कवितांतून त्यांनी सहजीवनाच्या यशाचे गमक सांगितले आहे.
देखा संसार संसार, दोन्ही जिवाचा सुधार
कधी नगद उधार, सुखा दु:खाचा बेपार
संसार म्हणजे काय? त्यात एकमेकांच्या जिवाचा व विचारांचा कसा आदर करावा ते बहिणाबाईपेक्षा योग्य रीतीने आणखी कोणी चांगले सांगू शकेल, असे वाटत नाही. संसार वेलीवर सुख-दु:खाचा सामना करताना पती निधन झाल्यावर खंबीरपणे संसाराचा गाडा रेटणार्‍या बहिणाबाई या खरोखर आदर्श असे प्रतीक होत्या. पती निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा जो डोंगर कोसळला. खरे तर त्यात एक अडाणी, निरक्षर, स्त्री पूर्णपणे नेस्तानाबूत झाली असते. मात्र, त्यांच्या कवितेतून जे संदर्भ समोर येतात ते फार विचार करायला लावणारे आहेत. लपे करमाची रेखा किंवा आता माझा मले जीव यासारख्या कवितांमधून त्यांच्या सोशिकपणाचे व खंबीरतेचे दर्शन घडते.
देव गेले देवाघरी, आणि ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जिवा
पती गेल्यावर दोन मुलांकडे पाहत रडायचे नाही. हे स्वत:ला बजावणारी स्त्री खरोखरच धिरोदात्त असली पाहिजे यात शंका नाही. त्याच बरोबर ज्योतिषासारख्या थोतांडाला विरोध करून
नको नको रे जोतिषा, नको हात माझा पाऊ
माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ!
असे ठणकावून सांगत आपल्या नशिबात जे आहे त्याला समोर जाण्याची त्यांची बेधडक वृत्ती वाखणण्याजोगी आहे,यात शंका नाही. कष्टकरी व शेतकरी जीवन जगणार्‍या बहिणाबाई त्यांच्या कवितेतून शेतीला बाजूला ठेवू शकल्या नाहीत. शेतीची साधने यात मोघडा, पांभर, कोयप, आऊत, तिफन, चाहूर, वखर, नांगर या सर्व अवजारांचे उपयोग त्यांनी अगदी सोप्या शब्दांत मांडून ठेवले आहेत. शेतकर्‍याला सर्वात जास्त वाट पाहावी लागते, तो पाऊस. तो आल्यावरचे अप्रतिम वर्णन बहिणाबाईंच्या आला पाऊस या कवितेत आढळते. पेरणी, कापणी, रगडणी (मळनी) उफणनी या प्रत्येक शेतकरी कर्माचे जिवंत वर्णन करणार्‍या स्वतंत्र कविता बहिणाबाईंनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर
धरत्रीच्या कुशीमंदी, बियबियानं निजली
वर्‍हे पसरली नाही, जशी शाल पांघरली
अशा प्रकारे शेतातील बियाणे व त्यातून फुटणारे अंकुर त्याचे वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. मोट हाकतो एक या कवितेतूनही त्यांनी कष्टकरी जीवन चित्रित केले आहे.
निसर्गातील सुगरण या पक्ष्याच्या खोप्याला अजरामर शब्दरूप देण्याचे काम ज्यावेळी बहिणाबाई करतात, त्याचवेळी गुढी उभारणी, आखजी (अक्षय तृतीया), पोया (पोळा) इत्यादी सणाची महती वर्णन करताना शेतकर्‍याने बैलाची पूजा का करावी तेही बहिणाबाई सांगतात.
वढे नागर वखर, नही कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हाती, त्याच्या जिवावर शेती
अशाप्रकारे दु:ख, सण, उत्सव, अध्यात्म धर्म इत्यादी सर्व बाबींवर आपल्या सहजसाध्य शब्दांनी भाष्य करीत बहिणाबाईची कविता समाजासाठी एखाद्या दीपस्तंभासारखी तेवत आहे. कवितेप्रमाणेच सहज बोलण्यातून वापरल्या जाणार्‍या काही सुंदर म्हणी हे सुद्घा बहिणाबाईंचे एक देणं आहे.
१) दया नाही, मया नाही डोयाले पाणी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोणी,२) शिदोळाले आला राग, माले म्हणा फन्या नाग, ३) कयाचे गेली नवस, आज निघाली आवस, ४) आसु नाही ती सासु कशाची?आसरा नाही ती सासु कशाची?
५) माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा.
##########$$$$$$$$###################किरण शिवहर डोंगरदिवे
समतानगर, मेहकर, जि. बुलढाणा
मोबा ७५८८५६५५७६

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शनीवार, September 9, 2017 - 17:14
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:

  • Log in or register to post comments
सुरेख

गंगाधर मुटे

सोमवार, February 19, 2018 - 22:00
Permalink
New

सुरेख लेखन. पुढील लेखनास शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 10042 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nilesh
  • Subhash.patil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 53 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    19 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    2 hours 30 minutes ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    2 hours 39 minutes ago
  • मस्तच
    6 hours 51 minutes ago
  • हार्दिक आभार
    9 hours 35 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 4
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 3
छंदमुक्त कविता- धावपट्टी 3
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 3
कागद अजून कोरीच आहेत 3
शेतकरी आत्महत्या 3
सातबारा..... गझल 3
पोळ्याच्या झडत्या 3
घाल घाव! 3
मायीनं जगवली पिलं 3
अरे, फुलवा अंगारमळा! 3
वांगे अमर रहे 3
नको फास घेऊ! 3
नाटकी बोलतात साले! 3
दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक 3
मुठमाती 3
दुष्काळ... 3
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 3
मग मात्र लिहावीच लागते कविता... 3
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,242
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,158
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,525
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,474
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,361
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,260
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,180
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,857
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,968
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,901
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,510
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,968
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,857
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,007
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,617
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,475
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,810
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,278
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini