नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आयुष्यात काही क्षण किती मोलाचे असतात हे शब्दांमधे गुंफणे तसे जरा अवघडच आहे. असाच एक अविस्मरणीय क्षण माझ्या साहित्यिक प्रवासात मला लाभला आणि मी धन्य झालो. तो क्षण म्हणजे चपराक प्रकाशनच्या वतीने आयोजित चपराक साहित्य महोत्सव २०१७ मधे माझा "प्रांजळ" हा काव्यसंग्रह १९ जानेवारी २०१७ ला मसपा पुणे चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी सरांच्या हस्ते आणि सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. द. ता भोसले, सरहद्दचे अध्यक्ष श्री. संजय नहार, जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक श्री. संजय सोनावणी, चपराकचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे ताई यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. तसेच अखिल भारतीय मराठी शेतकरी चळवळीचे अध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांची प्रस्तावना लाभणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
मातृभाषेची सेवा करण्याचे माझे हे व्रत चपराक प्रकाशनमुळे प्रत्यक्षात आले. माझे हे व्रत पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीकोनातून पडलेले हे पाऊल माझ्यातील कवी व लेखकाला नवी उमेद देणारेच ठरले हे नक्की. चपराकच्या सर्व सहकारी मंडळींचे आभार मानतो व माझ्या ह्या व्रतास मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.
रविंद्र कामठे
प्रतिक्रिया
अभिनंदन सर
अभिनंदन सर
पाने