नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अबब...! अहाहा...!!
अबब अबबबबबब!
केवढा हा अजगर....!!
सन २००५ च्या सुमारास माझे शेतात ३ अजगरांनी संसार
थाटला होता. ठरलेल्या बीळात त्यांचा विश्राम असायचा. ठरलेल्या वेळी ते बाहेर पडायचे.
आम्हाला तसा त्यांचा काहीच त्रास नव्हता पण ते चक्क पायवाटेवर येऊन अलगद पसरायचे व मस्तपैकी बिंधास्त झोपा काढायचे. कुत्र्यांना सवय झाल्याने त्यांनीही भुंकने सोडून दिले होते.
पण महिला शेतमजूर घाबरायच्या. शेवटी मी नाईलाजाने वर्धेवरून सर्पमित्रांची 'HOPE' चमू बोलावली व त्यांना जीवंत पकडून जंगलात नेऊन सोडले.
त्यांचे प्रत्येकी वजन अनुक्रमे १२.५ किलो, १७ किलो व १८.३ किलो असे होते.
****************************
****************************