Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शेतकऱ्यांच्या काळीज व्यथा : अवकाळी विळखा

Main page content

By महादेव बाबासो बुरुटे | 12:13 PM IST, मंगळ September 13, 2016
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
गद्य पुस्तक समीक्षण

स्वरचित पुस्तक परिक्षण
===============

शेतकऱ्यांच्या काळीज व्यथा : अवकाळी विळखा
==============================

विळखा म्हणजे मिठी ! या मिठीचे अनेक प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या कंबरेभोवती पडलेला अनेक संकटांचा विळखा म्हणजे जणू मगरमिठीच ! कितीही धडपड केली तरी सैल न होणारा अजगराचा विळखाच तो . हाडं खिळखिळी करुन त्यांचा भुगा केल्याशिवाय तृप्त न होणारा अक्राळविक्राळ...!! असाच प्रकर्षाने अनुभव येतो तो कथाकार सचिन वसंत पाटील यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला "अवकाळी विळखा" हा कथासंग्रह वाचताना. शेती, माती आणि शेतकरी यांची जीवा - शिवाची नाळ जन्मताच जुळलेली असते. कुठल्या ना कुठल्या विळख्यात ती आवळत जाते. बळीराजा या उपाधीने गौरवलेला बळीराजा नवीन अर्थव्यवस्थेत भरडला जातो, चिरडला जातो. आतल्या आत झुरत राहतो. त्यामुळे बळीराजा ही उपाधीच हास्यास्पद ठरली आहे कि काय, असे वाटू लागते.
या संग्रहातील सर्वच कथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या टांगत्या तलवारीची भिषण सत्य वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. या अवकाळी विळख्यात 'घुसमट' कथेत आपणास परिस्थितीचे चटके सोसत द्विधा अवस्थेत होरपळणारा विलास भेटतो. शेती मातीवर आईप्रमाणे श्रद्धा असणारा विलास शेत विकण्याच्या सल्ल्याने काळजात फाटत जातो. पैसेवाल्यांच्या त्याच्या दारिद्र्याच्या जखमांवर मिठ चोळणारे उग्र शब्द आणि व्यवहाराने अंतरबाह्य घुसमटून जातो. कथा वाचताना तो विलास म्हणजे आपण कधी होतो हे कळतच नाही.
शेतीत पीक पेरुन त्याचं उत्पन्न हातात येईपर्यंत कोणकोणत्या दिव्व्यातून शेतकऱ्यांना जावे लागते. डोक्यावरील अनेक समस्यारुपी टांगत्या तलवारींचा प्राणपणाने सामना करावा लागतो. त्यातून तावून सुलाखून निघालं तर कुठे चार पैसे हातात पडतात, . मजुरांची टंचाई हाही अलिकडे भेडसावणारा प्रश्न, अर्थात विळखाच झाला आहे. निसर्गाचे तांडव आणि मजूर समस्या यात हवालदिल झालेला नामा 'टांगती तलवार' या कथेत बरंच काही सांगून जातो.
मातीत जन्मलेला आणि मातीतच विलीन होणारा एक सच्चा शेतकरी नारुकाका 'सुर्यास्त' या कथेत भेटतो. एक सच्च्या भुमिपुत्र असलेल्या नारुकाकाच्या भयानक वास्तववादी जगण्याची ही शोकांतिका आहे. पिढीतील अंतर आणि काळानुसार होणाऱ्या बदलात, निसर्ग बदलात त्या त्या पिढीतील लोकांची होणारी घुसमट या कथेत वाचून मन हेलावते. शेती-मातीवर नितांत श्रद्धा असलेल्या शेतकरी जीवनाचा अचूक वेध घेणारी ही कथा साहित्यिक मुल्ल्याच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाची आहे.
कृत्रिम टंचाई आणि काळा बाजार ही तर नेहमीचीच समस्या ! 'उद्रेक' या कथेत रासायनिक खताची ऐन मोक्याच्या वेळी कृत्रिम टंचाई होते. शासकीय भ्रष्टाचारावर वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात कसा संताप येतो आणि त्यातून होणारा त्यांचा उद्रेक कसा व्यक्त होतो हे दाखविले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन पिकवलेल्या मालाचा फायदा दलाल उठवतात हे 'तुपातली वांगी ' या कथेत दिसून येते. कर्ता धर्ता बळीराजा भिकेकंगाल राहतो हे सांगत असतानाच सचिन पाटील यांनी जर शेतकऱ्यांनी ही मधली दलालांची फळी मोडून काढली आणि आपला माल आपणच विकला तर शेतकरी व ग्राहक या दोघांनाही ते फायद्याचे ठरणार असल्याचा भविष्यकालिन दृष्टिकोण कथन केला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तसा शेतकऱ्यांचा दृष्टिकोणही आज उदयास येताना दिसतो आहे.
या कथासंग्रहात 'वाट' कथेत ऊस शेतीची परिस्थिती आणि इतरांनी त्यात जाणून-बुजून नाडलेला हतबल पांडबा भेटतो. त्याची घरसंसाराचा मेळ घालण्यासाठी होणारी घुसमट पाहून मन द्रवते. 'दिवसमान' कथेत राबराब राबून मुलांच्या जवानीत आपल्याला सुख मिळेल या आशेवर वाटचाल केलेला महादेवबापु भेटतो. उतारवयातही पोरांच्या अविचारी कर्तव्याने त्याची पोटासाठी चाललेली धडपड पाहून अंतःकरण व्यथीत होते. 'कष्टाची भाकरी' कथेत द्राक्ष बागेतील नुकसानीने वैफल्यग्रस्त होवून व्यसनात बुडालेल्या विनायकला जेंव्हा शिक्षणाची खोटी प्रतिष्ठा सोडून कोणतेही काम करुन कष्टाची भाकरी मिळवण्यातली गोडी लागते हे वाचून मनाला दिलासा मिळतो.
नानाची कुस्तीतली 'लढत' ही खरी कुस्तीतली लढत नसून संसाररुपी कुस्ती जिंकण्याचा त्याचा प्राणपणाने चाललेला लढा असल्याचे जाणवते. घर फिरले की घराचे वासेही फिरतात याची प्रकर्षाने प्रचिती येते. तर 'मैत्री' कथेत अलिकडे फोफावलेल्या फसव्या स्किमा, त्यात होणारी फसगत, व्यसनाधिनता, नामदेवसारख्या स्वच्छ मनाच्या माणसाची मित्राने केलेली फसवणूक पहायला मिळते. 'बुजगावणं' कथेमध्ये झटपट मिळणाऱ्या पैशासाठी शेत एम. आय. डी. सी. ला देणारा अधुनिक पोरगा आणि या धक्क्याने वेडा झालेला वृद्ध शामूतात्या आहे.
'सांभाळ रे... ' कथेत पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला गेलेल्या विकाची विठ्ठ्लाभोवती पडलेल्या संधीसाधुंच्या गराड्यात होणारी घोर निराशा पहायला मिळते. पवित्र चंद्रभागेची केलेली गटारगंगा, श्रद्धा- अंधश्रद्धांच्यात अजूनही अडकलेला समाज वाचून मन उद्वीघ्न होते. याउलट 'रान' कथेत रानमातीच्या सुगंधासाठी असुसलेला सखाराम भेटला की मन आनंदते. शिर्षक कथेत अवकाळी विळख्यात बेचीराख झालेली शेती पाहिली की अंतःकरण करपल्याशिवाय राहत नाही. पण या अवकाळीला वृक्ष तोड हीच कारणीभूत असून आता झाडे लावली पाहिजेत हा विचार ऐकला की दिलासाही मिळतो.
या पुस्तकातील प्रसंग वाचताना लेखकाच्या सुक्ष्म निरीक्षण आणि वर्णन करण्याची खुबी वाचकाला खिळवून ठेवते. काही कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. त्यातला आशय पुन्हा पुन्हा गडद होत वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावतो.
असा हा अतिशय बोलके आणि समर्पक मुखपृष्ठ असलेला कथासंग्रह 'अवकाळी विळखा'. यातील शेतकरी अनेक संकटात अडकुन सुद्धा शेती माती व शेतकरी यांची नाळ तुटू न देता सुखेनैव वाटचालीची बीजे रुजवणारा आहे. हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाला आहे हे मला अभिमानपुर्वक नमूद करावेसे वाटते.

पुस्तक विषयक माहिती :
कथासंग्रह: अवकाळी विळखा
लेखक: सचिन वसंत पाटील.
प्रकाशक: गवळी प्रकाशन, इस्लामपूर
पाने: २०४
किमंत: ३१० रुपये
सवलत मुल्य: १५० रुपये

::©©
- महादेव बी. बुरुटे ,
६५०, जे. मार्ग, शेगांव
ता. जत, जि. सांगली
PIN- 416404
Mob- 9765374805
Email: burutemahadev@gmail.com

प्रवेशिकेचे मनपूर्वक

गंगाधर मुटे

मंगळवार, September 20, 2016 - 15:55
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6225 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 4 सदस्य उपस्थित आहेत.
  • Subhash.patil
  • admin
  • spatil
  • surekha

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 84 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    6 hours 51 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    22 hours 7 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    22 hours 15 minutes ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    22 hours 25 minutes ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    22 hours 27 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 5
महा गड्या ! महा रड्या !! 5
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 5
संपर्क/सुचना/अभिप्राय 5
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 5
हे गणराज्य की धनराज्य? 5
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 4
कोण तुम्ही व्हा रं ? 4
ऋणानुबंध 4
केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३ 4
लढू गड्यांनो 4
२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : VDO 4
दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक 4
सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव 4
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 4
मी मेल्यावर....! 4
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 4
उद्ध्वस्त 4
रानी चा पाऊस अन्- ती 4
माय मराठी स्तवन git 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,128
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,064
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,749
वादळाची जात अण्णा 31,523
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,210
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,204
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,165
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,088
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,595
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,945
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,494
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,581
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,999
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,599
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,467
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,987
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,798
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,265
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini