![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१९७२ ते २०१३ इथ बदललंय काय/
तवा बी पाण्याचा प्रश्न व्हता नि आज बी हाय .
दरवरीस सरकारची नवी योजना
पर शेतक-यापर्यंत कधीच पोचंना ...
मत मागताना पुढारी म्हणत्यात
तुमीच आमच बाप आन माय
पन गरजला जवल कोण न्हाय
विहिरी पडल्यात सुक्या त्यात पाण्याचा थेंब न्हाय
एक हंडा पाण्यासाठी दुस-या गावी जाते माय
पाय दुखत्यात म्हणून कुरकुर करते ताय
माणसाचं सोडलं तर
पाण्यावाचून चवताळते ती माझ्या गोठ्यातली बैल आन गाय
पक्ष्याचं तरी कोण ऐकल जिथं माणसांसाठी सोय न्हाय
झाडांच मोहोर गेल सुकून...
फळ तर सोडाच यंदा फुल पण गेले करपून
उम्बईतयेतो घरोघरीच पूर
म्हणत्यात मोजातो आम्ही पैस भरपूर
आमच गाव म्हणजे शेतीवाडी अन पैश्यांपासून खूप दूर
आमच गाव म्हणजे शेतीवाडी अन पैश्यांपासून खूप दूर
वर्षाच्या सुरवातीलाच पाणीपाणी करतुय पर कुणालाच यत न्हाय कीव
वाटतंय वैशाख येई पर्यंत कितीतरी बोलक्या अन मुक्या प्राण्यांच जातील जीव
पाणी आता फक्त आमच्या डोळ्यात उरलय..
बोलता बोलता उरलेल एक थेंब पण गालावर घसरलय
१९७२ ते २०१३ इथ काय बदललंय?
--
Kavigore
प्रतिक्रिया
अभिनंदन!
स्पर्धेतली पहिली प्रवेशिका!
अभिनंदन! खूप खूप अभिनंदन!!
अवांतर : कविता कोणत्या भागातील बोलीभाषेशी जुळती मिळती आहे?
अभिनंदन कविता गोरे
अभिनंदन कविता गोरे.
मात्र, तुमची कविता मनाला चटका लावून गेली.
पाणी आता फक्त आमच्या डोळ्यात उरलय..
बोलता बोलता उरलेल एक थेंब पण गालावर घसरलय
१९७२ ते २०१३ इथ काय बदललंय?
शेतकरी तितुका एक एक!
हि कविता गावच्या भाषेतील
हि कविता
गावच्या भाषेतील आहे
पण अस नेमक सांगता नाही येणार
खरतर मी वर्तमान पत्रात
गावक-याचं मनोगत वाचल होत
तेव्हा मला ते कवितेत मांडावस वाटल
kavigore
धन्यवाद
धन्यवाद आणि पुढील शेतीविषयक लेखनास शुभेच्छा.
पाने
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण