नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बारोमास
आरास ही दिव्यांची
हा कुठला प्रकाशपर्व
गेली कर्जात ही दिवाळी
कंबरडे मोडले सर्व ..१
रमीचा डाव हा नुसता
शेती पाठशिवणीचा खेळ
संत्रा ,कापूस, ज्वारीचा
येथे नाही बसत मेळ ..२
फवारे ,खते ,सोन्याच्या
किमती केवढ्या वाढल्या
जगाचा पोशिंदा तू,पण
मालाच्या किमती पडल्या..३
बारोमास बळीची
ही वणवण चाललेली
ओल्या,कोरड्या दुष्काळाने
आत्महत्येची पाळी आली..४
लाजू नको तू आता
हाती विळा कोयता घे
एकजुटीची मशाल घेऊन
दाणादाण उडवून दे ..५
आमची जमीन ,भाव आमचा
हाच नारा बदल घडवतो
मी चिडून व्यवस्थेशी
आता दोन हात करतो...६
अजित नरेंद्र सपकाळ
अकोट जि अकोला