Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

तर तुम्ही आजच मेला आहात - भाग - ३

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 4:32 PM IST, शनी March 19, 2022
साठीचे हितगुज
आयुष्याच्या रेशीमवाटा
साठीचे हितगुज
साठीचे_हितगुज : भाग - ३
तर तुम्ही आजच मेला आहात....!
 
       मी लहानपणी एक कथा ऐकली होती. त्या कथेतला तपस्वी तपश्चर्या करताना इतका अविचल आणि निश्चल बसतो की कालांतराने त्याच्या अंगावर मुंग्या वारूळ घालायला लागतात आणि एक दिवस तो तपस्वी पूर्णतः वारुळाखाली दबून जातो. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा एक म्हण आहे "कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला" आणि कविवर्य केशवसूत सुद्धा लिहून गेलेत की.... "सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका!" अर्थात सतत उद्यमशील व कर्तव्यशील असणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. ही उदाहरणे शरीरात संबंधातील असली तरी मनालासद्धा हीच समीकरणे लागू पडतात. 
 
        वास्तविक पाहता शरीरशास्त्र आणि मनशास्त्र बऱ्याच अंशी परस्परभिन्न आहेत. दोन्हीच्या कार्यशैली परस्परांच्या उलट आहेत. शरीराचा कल सहसा "जुने ते सोने" अशा स्वरूपाचा असतो, शरीर सहजासहजी "नवे ते हवे" असे म्हणत नाही उलट रुळलेल्या वाटेवरून चालणे, यापूर्वी जी कार्ये ज्या पद्धतीने केली आहेत अशाच पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करणे हा शरीराचा मुख्य गूण आहे. जसे अंगवळणी पडले तसेच पुन्हा पुन्हा करणे शरीराला आवडते, ज्याला आपण सवय असं म्हणतोय. शिवाय शरीराला जुनी पद्धत सोडून नवीन पद्धत शिकवायची असेल किंवा शरीराकडून वेगळ्या स्वरूपाचे कार्य करून घ्यायचे असेल तर शरीराला राजी करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात. सवय आणि सवयीनुसारच कार्य करणे शरीराची आवडती कार्यपद्धती आहे.
 
       एखाद्या लहान बाळाला सुरुवातीला आईचे दूध सोडून अन्य काहीही पचत नाही. साधे पाणी किंवा गायीचे दूध त्याला पाजले तर त्या बाळाचे शरीर सुरुवातीला पाणी अथवा गायीचे दूध उलटून फेकत असते. एखादा वयस्क व्यक्ती सुद्धा तंबाखू किंवा अन्य तत्सम पदार्थ खायला गेला, अगदी एक किंचितसे पान जरी खाल्ले तरी त्याचे शरीर तो पदार्थ पचवून न घेता उलटून फेकत असते, शरीर नव्या जिन्नसाचा सहजासहजी स्वीकार करत नाही. पण बाळाला गायीचे दूध, पाणी किंवा वयस्क माणसाला तंबाखू किंवा अन्य खाण्याचे पदार्थ जर वारंवार दिले तर मात्र पुढे पुढे त्याला काल नकोनकोसे असलेले पदार्थ कालांतराने हळूहळू आवडायला लागतात. नशिले पदार्थ वारंवार दिले तर त्याची सवय व्हायला लागते इतकेच नव्हे तर हीच सवय कालांतराने व्यसनाची जागा घेते. सुरुवातीला नाशिले पदार्थ उलटून फेकणारे शरीर नंतर मात्र इतके व्यसनाधीन होते की नंतर मग शरीर त्याशिवाय जगू शकत नाही.
 
     मनाचे शास्त्र मात्र अगदीच शरीरशास्त्राच्या उलटे आहे. पूर्णतः वेगळे आहे. मनाला जुने ते काहीच नको असते. मनाला सतत "नवे ते हवे'' असते. लहान मुल खुळखुळा हवा म्हणून रडते पण एकदा त्याच्या हाती खुळखुळा दिला की काही तासानंतर त्याला तो खुळखुळा नको असतो ज्यासाठी काही तासापूर्वी ते मूल रडत होतं. आता त्याला आणखीन दुसरेच काहीतरी हवे असते. दुसरे मिळाले की काही काळानंतर तेही नको असते, तिसरेच पाहिजे असते. मन नेहमी नाविन्याच्या शोधात असते. जे कधीच बघितले नाही ते बघण्याची सतत उर्मी मनाला आकर्षित करत असते. अगदी पिकनिकला किंवा पर्यटनाला जायचे असेल तरी जे स्थळ त्यापूर्वी बघून झाले तिकडे न जाता नवीन स्थळी जाण्याचा मनाचा कल असतो.
 
       सतत एकच काम सलगपणे करण्याचा मनाला कंटाळा येतो. आहे तेच काम पुढे सुरु ठेवायचे असेल तर मग काही काळासाठी तरी विरंगुळा हवा असतो. मनोरंजन हवे असते, हवापालट हवा असतो. अगदी शाळेत सुद्धा पिरियड ठेऊन विशिष्ट वेळानंतर विषय बदलले जातात. विद्यार्थ्यांचे जसे विषय बदलले जातात तसेच शिकवणाऱ्याचा विषय एकच असला तरी वर्ग बदलले जातात. दिवसभर एकच विषय शिकणे जसे विद्यार्थ्याला अवघड असते तसेच एकाच वर्गाला दिवसभर शिकवणे शिक्षकालाही अशक्यप्राय असते. हे सर्व मनाचे खेळ आहेत. मनाला कंटाळवाणे होऊ न देता त्याला वेगवेगळ्या तऱ्हेने गुंतवण्यासाठी नाना तऱ्हेच्या क्लुप्त्या योजाव्याच लागतात.   
 
       इतके सगळे लक्षात घेतले की एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होऊन जाते की, मनाला सतत काहीतरी नवे आणि नाविन्यपूर्ण हवे असते. जुन्यात कधीही मन रमत नसते. वयाची साठ वर्ष ज्या कामात मनाला गुंतवलं त्याच कामात वयाच्या 61 व्या वर्षी आपण गुंतवायचे ठरवले तर शरीर तर जिवंत राहील परंतु मन मात्र हळूहळू म्हातारे होत जाईल आणि कदाचित एक दिवस मरुनही जाईल. शरीर जिवंत पण मन मेलेले.... ही मानवी जीवनातील सर्वात वाईट अवस्था आहे.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
 
=-=-=-=
अठरा/तीन/बावीस
=-=-=-=


साठीचे हितगुज : भाग - १

साठी बुद्धी नाठी : बळीराजा लींक 

साठी बुद्धी नाठी : फेसबुक लींक
साठीचे हितगुज : भाग - २

मन वृद्ध झाले तरच शरीराला वृद्धत्व येते - बळीराजा लिंक 

मन वृद्ध झाले तर शरीराला वृद्धत्व येते - फेसबुक लिंक
साठीचे हितगुज : भाग - ३
तर आजच तुम्ही मेला आहात....! - फेसबुक लिंक 
साठीचे हितगूज : भाग - ४
तू स्वतःला गुंतवावे..! - फेसबुक लिंक
 
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी *Fingure-Right*  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========





 


साठीचे हितगूज
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
गद्यलेखन
वाङ्मयशेती
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 3861 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Rajshree
  • आशिष आ. वरघणे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 122 *
Who's new नवीन सदस्य
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    8 hours 48 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    9 hours 31 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    22 hours 21 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 13 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 13 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
शेतकरी 1
शेतकरी संघटक ६ डिसेंबर २०११ 1
पाकिस्तानी साखरेचे वास्तव 1
नको नको विकू राजा 1
कार्यक्रमपत्रिका : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 1
७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 1
बहुसंख्य-अल्पसंख्य : गझल ।१८।। 1
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 1
गझल : आबाद शेत नाही 1
साठी बुद्धी नाठी : भाग - १ 1
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 1
किती चाटणार भारतपुत्रा? 1
शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ 1
महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलन 1
४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : परिसंवाद 1
चंद्रपूर जिल्हा आंदोलन वृत्तांत 1
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह - श्री राज पठाण 1
अन्य ग्रहावरील सजीव सृष्टी अशी असेल! 0
14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आणि स्ट्रॉबेरी शेती भेट 0
रानमेवा खाऊ चला....! 0
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,993
कान पकडू नये 25,874
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,746
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,560
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,343
माय मराठी स्तवन git 25,338
एवढा मोठा नांगूर... 25,074
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,071
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,488
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,416
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,025
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,977
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,946
शेतकरी पात्रता निकष 23,935
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,894
हे गणराज्य की धनराज्य? 23,831
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,740
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini