नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*आमच्या गावात, रास्त भावात - माजा वैयक्तिक अनुभव.*
शेतकरी संघटनेने आपल्या गावात, रास्त भावात हे आंदोलन जाहिर केले व आपल्या काही कार्यकर्त्यांनी त्यात स्वत: सहभाग घेउन शहरात माल विकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अनेक शेतकरी स्वत:हुन शहरात शेतीमाल चांगल्या भवात विकत आहेत.
मी अनेक वर्षापासुन या प्रयत्नात होतो. मुंबइत गहू , ज्वारी विकली, पीठ ही विकलेआहे. परंतू पुढे मार्केट कमेटी कायदा आड आल्यामुळे थांबावे लागले. कोरोनाच्या पार्शभुमीवर शहरात निर्माण झालेली भाजीपाल्याची गरज लक्षात येताच मी व सीमाताई नरोडे यांनी मिळुन हे आंदोलन राबवायचे ठरवले.
सीमाताईंनी पुण्यात असलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यक्रत्या सायलीताई देशमुख (स्व. हसनराव देशमुखांची मुलगी), अलकाताई दिवान ( मदन दिवान यांची पत्नी), खन्नाताई ( सीमाताईंच्या गाववाल्या) व सीमाताईंची मुलगी यांच्याशी बोलुन त्यांच्या सोसायटीमध्ये भाजीची गाडी लावण्यची व्यवस्था करुन घेतली. मी श्रीगोंद्यातील शेतकर्यांकडुन भाजीपाला विकत घेतला. सर्व भाज्या व्यवस्थित साफ करुन पावशेर, अर्धा किलो, एक, दोन पाच किलो असे पॅकिंग केले. कोरोनापासुन दुर राहण्यासाठी पॅकिंग केले म्हणजे कमित कमी हाताळणी होइल व प्रत्येक वेळेस वजन करण्यात वेळ जाणार नाही. भाड्याचा टेंम्पो करुन माल पुण्यात घेउन गेलो. सकाळी १० पासुन संध्याकाळी ५ वाजे पर्यंत जवळपास सर्व माल विकला. सर्व ठिकाणी व्यवस्थित सोशल डिस्टंसिंग पाळुन, मास्क, हातमोजे वापरुन माल विकला.
ही कल्पना प्रत्यक्षात येई पर्यंत सीमाताईंना मोठे टेंशन होते. हा माल विकला नाहीतर विसएक हजार रुपये बुडतील अशी त्यांना भिती होती. मी म्हणालो नाही तरी संघटनेच्या कामात फिरताना माझे पैसे असे जातच होते, दोन महिण्यात वाचलेले पैसे या आंदोलनासाठी घालवू, तुम्ही काळजी करू नका, माझे हे पैसे बुडाले असे समजुन मी लावतो आहे.
माल विकल्या नंतर हिशोब केला सर्व खर्च जाउन बर्या पैकी पैसे शिल्लक राहिले होते. आता नियमित भाजी पुरवठा सुरू करत आहोत. माल खरेदी, पॅकिंग करताना बरीच शारिरिक मेहनत झाली. पण एक अनुभव आला, जे लोक रोज असा व्यापार करतात त्यांना काय काय सहन करावे लागते याचा.
द्राक्ष खरेदी करण्यासाठी पारगावला गेलो असता माझ्या एका मित्राचा मुलगा भेटला. तो म्हणाला आमचे कलिंगड सुरु झाले अन् कोरोना आला. कलिंगडाला गिर्हाइक लागेना, जे येत ते तिन- चार रुपये किलोने मागत मग तुमचा अॅग्रोवन मधला लेख वाचुन मी प्रेरना घेतली व टेंमपो भरुन पुण्यात गेलो. रसत्याच्या कडेला टेंम्पो लावुन कलिंगड विकले. दहा रुपयाने पैसे झाले साहेब. तुमच्या आंदोलनाचा मला खुप फायदा झाला. पाच एकर कलिंगड कसे विकायचे हा प्रश्न होता माझ्या पुढे तुमच्यामुळे मार्ग मिळाला आता व्यापार्याला कधीच कलिंगड देणार नाही सर्व माल मीच पुण्यात जाऊन विकणार. आपल्या गावात रास्त भावात या आंदोलनाचा सेनापती असल्याचा खरच अभिमान वाटला. गावकडची शेतकरी संघटना व शहरातल्या महिला अघाडीने हे आंदोलन यशस्वी केले ही आणखी एक जमेची बाजू.
अनिल घनवट.