नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१० वे मराठी अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन विश्वस्तरीय अॉनलाईन लेखन स्पर्धा .
पद्दलेखन स्पर्धा -२०२२ विभाग अ) पद्दकविता
शिर्षक :- *शेतकरी*
रात्रंदिवस करी काळ्याआईची सेवा
नाही करी कधी कोणाचा हेवादावा
घेवून हातावर भाकरी ठेसा कांदा खाई
आहे त्या परिस्थितीत समाधानी लई
जरी नसली स्वतःला अजिबात शेती
तरी दुसऱ्या कडे साल धरुन राबती
औतकाठी नांगर बैलांची सावड करी
दुसऱ्यांच्या मदतीला धावतो लवकरी
पेरणीच्यावेळेला संशय येई मनात
भेसळ तर नसेल ना या बियाणांत
खतं पाणी खुरपणीला कष्टच फार
पिकं डोलते काळयाराणी चिकार
बरेचदा आडाणी राहून मुलांना शिकवतो
न राबावे मुलांनी या करिता धडपडतो
पक्षी गुरं राखणीला माणसांची कमी
माणसां ऐवजी उभे बुजगावणे डमी
खळं केल्यावर डोक्यात विचार नुस्ता
किती ठेवू घरी किती भरू कर्ज हप्ता
धनधान्य मोंढयावरती विकायला नेती
व्यापारी आडते शेतकऱ्यांना खुप पिळती
राजकारणात योजनांचा भडिमार होतोच
लाभ मात्र चाळणीतून पदरात पडतोच
निवडणूकी वेळी जाहीरनाम्यात अग्रस्थान
प्रश्नसोडण्या सत्ताधारीविरोधकात ओढातान
बळीराजा जगाचा पोशिंदा गोष्ट आहे खरी
पण कर्जबाजारीपणाने गळ्यास लावी दोरी.
कवी :- *राजेंद्र महादेव उदारे*
पाथर्डी,जि.अहमदनगर
९४२३०४६६०६/८६२३९९०८०७