![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आठोनिच्या झुल्यावरं.......(वऱ्हाडी बोली )
आठोनिच्या झुल्यावरं
गेला पाऊस नाचूनं
सर्दावल्या त्या मनाले
देल्ली अंगार लाऊन
गच्च चिखोल भरल्या
पाय फसनीच्या वाटा
हातातल्या मेंदीसाठी
कायजाचा आटापिटा
जरा लवली पापनी
केला इशारा तो खोटा
गेला पायात खुळून
हिर्वा अनिदार काटा
सल काट्याची उरात
अस्यी काई उसयली
त्याले कोरता कोरता
उभी बंदी इरयली
धाकधूक अंधाराची
दोनी आंगात भिनली
वली खवंद काट्याची
भरपावसात न्हाली
पांदनीच्या आळवाटा
कस्या कानोकानी गेल्या
हटखोरावानी साऱ्या
काटा काळाले लागल्या
आठोनिच्या झळीसंग
मन चिंब चिंब न्हालं
जुनं जानतं कुरुप
आज हिर्वगारं झालं
.........रवींद्र अंबादास दळवी,नाशिक
7038669542
प्रतिक्रिया
खुप छान रविंद्रभाऊ
खुप छान रविंद्रभाऊ
मस्त दळवीजी
छानच
Dr. Ravipal Bharshankar
हातातल्या मेंदी साठी कायजाचा
हातातल्या मेंदी साठी कायजाचा आटापिटा... मस्त दळविजी, सार रान भारल.....
Narendra Gandhare
. खूप छान रचना, रवींद्र सर
सल काट्याची उरात
अस्यी काई उसयली
त्याले कोरता कोरता
उभी बंदी इरयली
खूप खूप छान रचना दळवी सर!!!!!!
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने