Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ...

Main page content

By सचिन शिंदे | 5:04 PM IST, सोम September 23, 2019
छंदमुक्त कविता

लेखन विभाग : छंद मुक्त कविता

बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ...

बांधावर उभं राहून
शेतावर नजर टाकली
अन् तरळून गेलं नजरेसमोर
काय काय...

पुरानं वाहून वाकून
मोडलेलं ते बाभूळझाड ..

वाळून गेलेला
विहिरीवरचा तो कोरडा पळस ..

उभ्या बांधावर उदासपणे
उभा असलेला तो म्हातारा साग ..

नदीपात्राजवळची ती
पळसाची गर्द झाडी ..

पक्ष्यांच्या आवाजानं
भांबावून गेलेलं ते बोरबन ..

मोडक्या जाळ्यांचा आधार घेत
उभा राहिलेला तो निर्जीव मांडव ..

उभा जन्म मसाईला सावली देता देता
स्वतःच वाळून गेलेलं ते लिंबाचं झाड ..

गेल्या अनेक वर्षांपासून शेतराखण करणारी
माईची ती दगडी समाधी ..

अन् पावसाळ्यात रों रों आवाज करत धावणारी
पण नंतर कोरडी पडणारी ती पैनगंगा ..

असं काय काय अन् किती किती...

हे सारं कित्येक वर्षे
काळजात सलतेय
अन्
शेताचा बांध
ते पुन्हा पुन्हा जिवंत करतोय...

सचिन शिंदे
मुरली,उमरखेड
8421527542

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

बुधवार, September 25, 2019 - 17:46
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5165 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Giridhar kachole
  • डॉ ज्ञानेश भाऊ…

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 67 *
Who's new नवीन सदस्य
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप छान अप्रतिम कविता आहे…
    3 hours ago
  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 15 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 15 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 15 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 15 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
मातॄभक्त 5
अंगाई गीत 5
हूसास 5
कवडीमोल दाम 5
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 5
आम्ही शेतकरी... 5
पाणी लाऊन हजामत 4
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 4
काळ्या आईचा आक्रोष 4
गझल :शेती चरून गेली. 4
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 4
काही सुटे अन काही मुटे शेर 4
७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 4
त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ 4
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 4
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 4
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 4
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 3
रूप सज्जनाचे 3
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 3

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,509
नियमावली 44,821
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,152
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,823
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,746
शरद जोशी 40,747
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,115
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,548
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,046
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,045
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,801
गरीबी कशामुळे? 36,068
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,618
आईचं छप्पर ।।१०।। 34,525
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,108
रे नववर्षा 33,749
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,297
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,268

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini