नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वप्न पेरल्यावर, दुःखचीच येते
पीक आयतेची, मग घरीच येते
जाग का धरू मी, होश नसल यावर
झोप माणसाला, ही बरीच येते
या जलाशयाच्या, सानिध्यात असुनी
जर न स्नान केले, कर्म नीच येते
ढेप खावया मी, बैल ना कुणाचा
सौम्यता तशी ही, अंतरीच येते
तू न मी किती ही, एकरूप झालो
जात ही आपल्या, आडवीच येते
रोजच्या श्रमाने, अंग अंग शिणले
क्लेश शेत्कऱ्याला, हरघडीच येते
एकटा तिथे तू, एकटी इथे मी
थांब माळराजा, थांब मीच येते