Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

माझा शेतकरी देव

Main page content

माही_निर्मिती
By माही_निर्मिती | 10:04 AM IST, रवी November 19, 2023
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

हमीभाव देत नाही
बांधू लागले सरण
कसं जगतू रं आम्ही
पाठी बांधून मरण....

पाठी बांधले मरण
नको मला तुझी भीक
घेत चिमटा पोटाला
कस जगवील पिक...

कस जगवील पिकं
झेलून संकट अस्मानी
भाव मिळेना पिकाला
कावा हा तर सुलतानी....

कावा हा तर सुलतानी
कशी यावी कुणा कीव
पैस कुठं रं गाडीला?
चालून भागला हा जीव....

चालून भागला हा जीव
जड पायातले गोळे
सुखी सपान बघती
राती निजताना डोळे....

राती निजताना डोळे,
दिस सरलेला दिसे
ओल्या पापण्यात झोप
ओठी लटकेच हसे....

ओठी लटकेचं हसे
रात खायला उठते
देह थकून नीजतो
मनी काहूर पेटते....

मनी काहूर पेटते
जीव कासावीस होई
पीक वाळत चाललं
बोजा कर्जाचा तो डोई....

बोजा कर्जाचा तो डोई
कशी जाईल भाकर
बळी नावालाच राजा
साऱ्या जगाचा चाकर...

साऱ्या जगाचा चाकर
घरी बायका नि मुलं
भरी जगाचे तो पोट
घरी विझवूनी चूल....

घरी विझलेली चूल
द्या रास्त त्याला भाव
उभ्या जगाला पोसतो
माझा शेतकरी देव....!

- महेश ज्ञानोबा होनमाने

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

रवीवार, November 19, 2023 - 22:01
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!



CongratsCongrats

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 12:36
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

  • Log in or register to post comments
शेतकऱ्यांचं दुखणं व्यक्त

RANGNATH TALWATKAR

बुधवार, November 22, 2023 - 13:38
Permalink
New

शेतकऱ्यांचं दुखणं व्यक्त केलंय बळीराजा विषय घेतला तर त्यात पूर्वी आणि आता व पुढे कसं लढता येईल यावर लिखाण करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6084 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 9 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    2 hours 39 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    2 hours 41 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    2 hours 43 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    2 hours 45 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हूसास 9
दुःखात राहतो मी 9
मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४| 9
शेतकरी साहित्य चळवळीची कार्यपद्धती : ठळक मुद्दे 9
"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 9
१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक 9
बोल बैला बोल : नागपुरी तडका ॥३३॥ 9
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 9
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 9
कल्पनांमधला शेवट आनंदीच का? 8
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 8
शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर 8
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 8
कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 8
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 8
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका ।।१६।। 8
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र 8
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 8
माझ्या धन्यासाठी 7
इथून गेल्यावर ... 7

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,111
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,743
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,683
वादळाची जात अण्णा 31,516
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,186
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,161
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,804
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,669
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,173
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,940
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,888
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,488
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,146
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,993
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,461
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,783
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,253

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini