Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

अश्रूंचा पाऊस

Main page content

By Krushna Ashok Jawle | 6:24 PM IST, मंगळ October 12, 2021
ललितलेख

ऋतुचक्रांचा खेळ हा सदोदित चालूच असतो. मागेपुढे काहीवेळा लपंडावही त्याचा चालूच असतो. सुख-दुःखाची विण विणतच राहतो. जमिनीच्या सदऱ्याला नाना रंग भरण्याचे काम त्याच्या येण्या जाण्याने नकळत भरले जातात. ग्रीष्म सरायला सुरुवात झाली की, चाहूल लागते पुढच्या ऋतूची. सगळी जमीन रुक्ष झालेली त्यात जमिनीला पडलेले तडे पार काळीज पिळवटून टाकतात. कित्येक झाडंही नवसंजीवणीच्या प्रतीक्षेत आभाळाकडे टक्क डोळे लावून बसलेले असतात. बळीराजा अंगात त्राण आणून जमिनीच्या मशागतीस जुंपलेला पाहायला मिळतो. बळीराजा समवेत सर्वच चातकासारखी आभाळाकडे नजर रोखून वावरत असतात. उजाड रानात गुर-ढोर घेऊन पाण्यावर जायला सुद्धा फिरकावसं वाटत नाही. अशा या वातावरणात जीव यायला उजडाव लागतं वर्षा ऋतूला. तो येतो तर चैतन्य नांदते. पहिल्या पावसाच्या सरींच्या वर्षावात जमीन ओलिचिंब होते. तप्त अशी माती जमिनीवर पावसाशी एकरूप होताना दिसते आणि पूर्ण वातावरण सुवासाने गँधून टाकते.
"नेमेची येतो मग पावसाळा । हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! " या उक्ती कुठेतरी वाचलेल्या आणि त्याच खरेपणही तेवढंच सत्य. पाऊस हा नेहमीच नाही पडत त्यालाही ठराविक वातावरणाचा आधार हवाच असतो. रानात पडणारा पाऊस डोळ्यासमोर उभा ठाकला की, डोक्यावर घोंगड करून चालणारे गुराखी, शेतात राबणारा कष्टकरी-शेतकरी, आया-बाया आणि पावसात भिजणारी पोरं आणि एका लयीत चालणारे गुरेढोरं मनावर आजही गारुड घालतात. यातली परिस्थिती काहीशी बदलती आहे पण माती आणि पाऊस यांचं रिवाज आहे तोच. रानात चार-पाच जोरदार पाऊस झाले की, पेरणीची लगबग सुरू होते. पडीक जमीन शहारून येते अंगी हिरवा रंग ल्याते; जणू हिरवा शालूच नेसते. त्या तुलनेत इतरत्र काळी जमीन तोवर रुक्ष, उजाड जमिनीचे रूप वाटते. दरसाली रानात कोसळणारा पाऊस आबादनी साठीचा असेल हे अनिश्चितंच. एका साली वातावरण सारं आल्हाददायक आणि सकारात्मकतेनं भरलेलं. पेरणी पार पडून पिकं तरारून मातीच्या गर्भाशयातून बाहेर आलेली. हळूहळू कामाजोगा पाऊस चालूच असायचा; त्यांमुळे पिकं जोमात वाढू लागली. ते सारं जणू ना. धो. महानोर म्हणतात तसं " या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतूनी चैतन्य गावे.." या ओळीच इथे समर्पक बसेल अशीच सारी स्थिती.
पिक चांगलं आले. यंदाचं आबादानीच ठरणार अशीच एकूण सारी गावातली आणि आजूबाजूच्या परीसरातल्या शेतकऱ्यांत सकारात्मक वातावरण. काही शेतकऱ्यांनी पिकाची कापणी( सोंगणी ) करून चांगल्या प्रकारे सुड्या घातल्या तर काही मजुराअभावी शक्य होईल तशाप्रकारे सोंगणी आटोपून घेण्याच्या तयारीत. आभाळाचं वातावरण तसं काहीसं नेहमीसारखच असायचं. याच लगबगीच्या दरम्यान एके दिवशी रात्री पावसानें हाहाकार करीत पार हाता-तोंडाशी आलेला घास कैक शेतकऱ्यांच्या पदरातून हिसकावून नेला. गावातला शेतकरी मनोहर रावांच्या शेतातील पीक जमिनीवर कापणी करून पडलेले होते. पाऊस सलग तीन - चार दिवस संततधार बरसतच होता. पीक सार मातीमोल झालं; जमा करायला जेवढं मजूर लागेल तेवढ्या खर्चही त्यातून निघणार नाही अशी एकूण दुर्दशा झालेंली. त्यांचा पोरगा माझा मित्रच. त्याचे वडील डोळ्यांतील आसवांना बाहेर येऊ देत नव्हते मात्र मला कळून चुकलं होतं; आतून खूप पिळवटून निघाले असणार हा माणूस. सगळी मेहनत एका पावसात मातीमोल झाली. पण डोक्यावरच्या कर्जावर असं कुठलं सुलतानी संकट नाही येणार. जसा जसा पाऊस बरसत होता तसं तसे त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाण्यात विरघळत होते. त्यांना धीर द्यायला सारा गाव होता कारण बऱ्याच जणांचं नुकसान तसंच काहीसं कमी प्रमाणात झालंच होत. हार मानायची नाही हे वाक्य भिंतींवर, पुस्तकांमध्ये फार छान वाटते पण वेळेवर पचवायला हलाहला'सारखं असते. पाऊस रोमँटिक असतो हे वाक्य माझ्या जीवनात तेव्हापासून आजतागायत मला कधी जवळचं वाटलं नाही ते यामुळेच. ज्याच्यावर दुःखाच आभाळच कोसळलंय त्यास कुठला आधार द्यावा कळत नाही. तो पाऊस आजही गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींना स्मरणात आहे. पावसाने नुकसान होते हे माहीत होते पण एवढं भलंमोठं संकट हे पहिल्यांदा गावावर आणि आजूबाजूच्या परिसरात गडद पसरलं होतं. पाऊस जसा आधार देतो तसाच कैकदा आधार काढूनही घेतो. असा हा अश्रूंचा पाऊस आजही आठवला की, डोळे भरून येतात, मन गहिवरून येतं. भूतकाळात डोकावताना असा पाऊस पुन्हा कुणाच्या वाट्याला येऊ नये असंच सदोदित वाटते.
- कृष्णा जावळे.

प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 20:30
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5473 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Kiran mahadev …
  • Madhuri_123

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 53 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    1 hour 19 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    3 hours 30 minutes ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    3 hours 40 minutes ago
  • मस्तच
    7 hours 51 minutes ago
  • हार्दिक आभार
    10 hours 36 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस - 2 8
शरद जोशी 8
जात्यावरची गाणी 7
असा आहे आमचा शेतकरी 7
४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८ 7
मृगजळ 7
दुष्काळ... 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 6
हंबरून वासराले चाटते जवा गाय 6
शेती आणि माती 6
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 6
पुस्तक समीक्षण : बळीवंश 6
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 6
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 5
फुलू दे शिवारी 5
शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 5
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 5
तुझ्यापायीच झाली ही दैना 5
मातृत्वाचा शृंगाररस 5
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,513
नियमावली 44,833
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,179
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,830
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,779
शरद जोशी 40,770
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,127
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,070
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,578
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,060
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,058
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,806
गरीबी कशामुळे? 36,082
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,634
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,571
आईचं छप्पर ।।१०।। 34,548
रे नववर्षा 33,768
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,328
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,308
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,296
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini