बा बळीराजा...
आत्महत्या उत्तर नसते
गळ्या हे समजून घे...
पेटून उठ अन् व्यवस्थेले
खनखनित उत्तर दे... ||ध्रृ||
तुह्या घामानं पिकतील मोती
दुनिया होईन खातीपिती
तुच पोशिंदा दुनियेचा या
दान अन्नाचे दे ... ||१||
छातीले माती लावनाराची
जात असे भाऊ कास्तकाराची
करून हात दोन संकटासंग
घे लढाई जिंकून हे... ||२||
परिवाराचा खांब गळ्या तू
तुह्या खांद्यावर संसारी जू
लाथ मारू तथी काळू पानी
जान हा मंतर रे... ||३||
मरनानं हे प्रश्न न सुटतील
मेल्यावर तू त्याले फाटे फुटतील
चिल्ल्यापाल्ल्यायसंग घरधनीनचा
ईचार करून घे... ||४||
हिम्मत ज्याच्या मनी रे वसते
इच्छा जथी, तथी मार्ग हा दिसते
पंखाले या गरूड झेपेची
आस तू असू दे... ||५||
निलेश जगदेवराव देवकर.
मु.पो.डोंगरगांव,
ता.जि.अकोला.
