
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*राजा शिवाजी*
ज्याचा जन्म आणि मृत्यू
गडावरीच जाहला,
राजा शिवाजीशिवाय
दुजा कुणी ना पाहिला.
छत्रपतींच्या स्वराज्यी
होते शेतकरी सुखी,
राजा धावून जातसे
कुणी दिसताच दु:खी.
सातबार्याची पद्धत
शेतसारा जमिनीचा,
जगी सुरू करणारा
राजा पहिला बाणीचा.
वेतनाची संकल्पना
मूळ शिवाजी राजाची,
कामे उत्तम व्हावया
दिली बोनसही साची.
पाणी अडवा जिरवा
थोर राजाची योजना,
झाडे लावा नि जगवा
बिंबविले जनमना.
उभ्या राज्यात नव्हता
कुणी याचक भिकारी,
राज्य दुजे ना जगती
प्रजा कामोकामी सारी.
राजासाठी बलिदाना
होते आतुरले जन,
दुष्टांसाठी होता काळ
आप्त मानिती सज्जन.
राजा एकच जगती
ज्यास रयतेचा ध्यास,
देशोदेशी सालोसाल
चाले तयाचा अभ्यास.
----------------------------
खुशाल दादाराव गुल्हाने,
अमरावती.
9403019795