Main page content
मेंदू पिसाळणारा ध्यास
ही बोर, ही बाभूळ, हा आंबा, ही चिंच
ही किलबिल, ही झुळझुळ, हा हंबरडा
ही आर्जवे, ही डरकाळी
ही हिरवळ आणि ही दरवळ;
तेव्हाही असणार आहेच! जेव्हा;
तुम्ही आणि मीही नसणार आहे
जिस दिन हम जनम लियो
जग हासे हम रोये
ऐसी करनी कर जाओ
पीछे न हासे कोय
कबिरांचं ऐकावं काय?
आपण ऐकलं वा ना ऐकलं तरीही
तेव्हाही कबीर असणार आहेच जेव्हा
तुम्ही आणि मीही नसणार आहे
माणूस द्या मज, माणूस द्या ही
भीक मागता प्रभु दिसला
स्वत्वाचा शोध घेऊन आपणच
दाखवावा का माणूस राष्ट्रसंतांना?
आव्हान स्वीकारलं वा नाकारलं तरीही
तेव्हाही राष्ट्रसंत असणार आहेच जेव्हा
तुम्ही आणि मीही नसणार आहे
उकिरड्यावर घास शोधणारी लेकरं
घुटभर पाण्यासाठी दुडदुड धावणारी कोकरं
छटाकभर ऋणापायी वळवळणारा फास
राजकारणापायी मेंदू पिसाळणारा ध्यास
या सर्वांना तेव्हाही अभयच असणार आहे?
जेव्हा;
तुम्ही आणि मीही नसणार आहे?
- गंगाधर मुटे 'अभय'
======
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 21 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 11 hours 13 minutes ago
- 11 hours 21 minutes ago
- 11 hours 32 minutes ago
- 11 hours 34 minutes ago
- 11 hours 35 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| हंबरून वासराले चाटते जवा गाय | 32,127 |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,014 |
| हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची | 31,747 |
| वादळाची जात अण्णा | 31,522 |
| ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन | 31,205 |
| गगनावरी तिरंगा - ॥२१॥ | 31,163 |
| शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती | 31,138 |
| संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती | 31,024 |
| आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून! | 30,527 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल | 29,943 |
| भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | 29,889 |
| गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते | 29,494 |
| कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन | 28,949 |
| पिकलेला काटा अन् करपलेली पिके | 28,518 |
| दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ | 27,998 |
| हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ | 27,597 |
| श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। | 27,466 |
| नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ | 26,985 |
| प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी | 26,797 |
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,261 |
