Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

शेतकर्‍यांचे कत्तलखाने

Main page content

Anil Ghanwat
By Anil Ghanwat | 7:32 PM IST, सोम November 23, 2020

आज दि. २३/११/२०२० रोजी आॅग्रोवन मध्ये छापलेला माझा मूळ लेख.
---------+--------------------+---------------------
शेतकर्‍यांचे कत्तलखाने
- अनिल घनवट
शेतीमाल व्यापार स्वातंत्र्यावर केंद्र शासनाने पारीत केलेल्या नविन कायद्यावरील माझा लेख वाचुन एका शेतकर्‍याने माझ्याशी संपर्क केला. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेलेल्या कलिंगडात व्यापार्‍याने कसे फसविले हे सांगितले. रुमालाखाली सौदा केल्यामुळे समोर असून सुद्धा माल काय भावाने विकाला ते समजत नव्हते. पाटीवाल्याला विकलेल्या काही मालात, पाटीचे वजन घेतलेल्या पैशावरुन साधारण किमतीचा अंदाज येत होता पण ठोक विकलेल्या मालात काहीच समजले नाही. ठोक विकलेल्या मालाच्य‍ वजनात ४०० किलोचा फरक दिसला. एक टनाला ५० किलो "कडता" म्हणुन कपात केली होती ती वेगळीच. माल पाठवताना २५ रुपये किलोचे भाव सांगितले मात्र पट्टी देताना १० रुपये व १४ रुपयांनीच पैसे दिले अशी त्याची तक्रार होती.

त्या शेतकर्‍याशी झालेले संभाषण मी सोशल मिडियावर व्हायरल केले. सोबत व्यापार्‍याच्या नावासह थोडक्यात हकिकत ही लिहिली होती. हा संदेश खुपच वेगाने पसरला. व्यापार्‍या पर्यंत गेला व बदनामीच्या भितीने व्यापार्‍याने शेतकर्‍याच्या घरी जाऊन २७,४०० रुपये दिले व पोष्ट डिलीट करण्याची विनंती केली ( मूळ पट्टीनुसार शेतकर्‍याला फक्त २०२०० रुपयेच मिळाले होते).

ही घटना ऐकुन त्याच गावातील एका शिताफळाच्या शेतकर्‍याने आपले गार्‍हाणे सांगितले. वाशीके लुटेरे- २ हे शिर्षक देऊन मी हा संदेश सुद्धा व्हायरल केला. त्याची हकिकत अशी.

पुणे जिल्ह्यातील, शिक्रापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर खेडकार यांच्या बागेतील शिताफळे विक्रीसाठी तयार झाल्यानंतर त्यांनी तळेगाव ढमढेरे येथील ट्रांस्पोर्टर मार्फत, वाशी येथील दलालाकडे प्रतवारी करून माल पाठवला. पहिल्या दिवशी ( १/१०/२०२०) रोजी १ नं प्रतिच्या मालाला ७०० रु. क्रेटचे दर दिले. २,३,४, नं प्रतीला ३००, २००, १५० असे दर दिले. हाच दर मिळत राहील या अपेक्षेने शेतकरी रोज सिताफळे पाठवत राहिले. दलालाने किंवा ट्रांसपोर्टवाल्याने दर कमी होत असल्याचे खेडकरांना सांगितले नाही. १ ते १३ आॅक्टोबर पर्यंत माल पाठवत राहिले व एक दिवस ट्रांस्पोर्टवाल्याने पावत्या दिल्या त्यात ७०० रुपये प्रतीे क्रेट दर ५००, ३००, २०० ते १५० रुपये क्रेट पर्यंत घसरवला होता.

सिताफळाची पट्टी पाहिल्यानंतर ट्रांसपोर्टरकडुन पैसे घेण्यास नकार दिला. ३०७ क्रेटचे फक्त ५७ हजार (म्हणजे सरासरी १८५ रुपये प्रती क्रेट) कसे झाले असे विचारले. शेतकर्‍याला अपेक्षा होती सरासरी ५०० रुपये क्रेटची. १०० रुपये खर्च गेला तरी ३०७ चे ४०० रुपये क्रेट प्रमाणे १ लाख तेवीस हजार मिळावेत अशी शेतकर्‍याची अपेक्षा होती. म्हणजे दलालाने खेडकरांना किमान ७० ते ७५ हजाराचा चुना लावला आहे.

शेतकर्‍याच्या संभाषणाची आॅडिअो क्लिपसह व्हारयल झालेला संदेश पणन मंत्र्यां पर्यत पोहोचला. शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या सचिवांना भेटावे, त्याचे काम होइल असा मंत्र्यांचा सांदेश ही आला. शेतकर्‍याला वाशीला जाऊन पैसे घेऊन येण्यास सांगितले तर त्याची हिम्मत होइना. तिथे दलालांची खुप दादागिरी आहे, तुम्ही बरोबर चला असा त्याच आग्रह होता. दिवाळी नंतर जाऊ असे मी शेतकर्‍याला सांगितले.

पाडव्याच्या दिवशी शेतकर्‍याचा फोन आला व सांगितले की व्यापारी पैसे देण्यास तयार झाला आहे. सरसकट ५०० रुपये क्रेट प्रमाणे पैसे देणार आहे. म्हटलं बर झालं. दुसर्‍या दिवशी ३८,००० रुपये बॅंक खात्यावर जमा केल्याचा फोन शेतकर्‍याने केला. पैसे अपेक्षेपेक्षा कमी होते पण शेतकरी त्यातही समाधानी होता. (काय घेता चोराच्या हातची लंगोटी) अशी भावना असावी बहुतेक.

वरील दोन्ही उदाहरणे पहाता शेतकर्‍यांना बाजार समित्यांच्या कचाट्यातून सोडवणे किती महत्वाचे आहे याचा अंदाज येईल. शेतकर्‍याने सहा महिने कष्ट करून खर्च करून मालाचे जितके पैसे मिळतात त्याच्या पेक्षा जास्त पैसे दलाल, दहा सेकंद रुमालाखाली हाताची बोटे चापुन कमवतात हे विदारक सत्य आहे.

फक्त भावात मरुनही हे दलाल थांबत नाहीत. २० किलोचा एका क्रेटची हमाली १३ रुपया प्रमाणे शेतकर्‍याकडून वसूल केली आहे. म्हणजे ६५ रुपये क्विंटल!! बेकायदेशीरपणे कडत्य‍ाच्या नावाखाली वजन कमी धरले जाते. यांचे वजन काटेही "सेट" केलेले असतात. कारण नसताना टपालाचा खरच लावतात. मार्केट फी वसूल केली जाते. पावती पुस्तके मार्केट कमिटी कडून नोंदवणे गरजेचे असते ते पण पाळले जात नाही.

१९६३ साली महाराष्ट कृषी उत्पन्न पणन अधिनियम आमलात आले. खाजगी व्यापारी शेतकर्‍यांची फसवणुक करातात, वजनात मारतात, पैसे बुडवतात म्हणुन हा पणन कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार सर्व शेतीमालाची विक्री जाहीर लिलाव पद्धतीनेच व्हावी असा नियम आहे. रुमाला खाली हातात हात घेउन सौदा करण्यास ( हत्ता पद्धत असे त्यात म्हटले आहे) बंदी आहे. वजन मापावर लक्ष ठेवण्यासाठी बाजार समितीचा मापाडी नेमले आहेत. हमालीचे दर निश्चित आहेत बेकायदेशीर कपाती करण्यास बंदी आहे. कायदा होऊन ५७ वर्ष झाली तरी अंमलबजावणी नाही. राज्याच्या राजधानीतील एक भाग असलेल्या या बाजार समितीला शिस्त लावण्याची हिम्मत एकाही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आली. एकही पणन मंत्री ही जवाबदारी पार पाडू शकला नाही. शेतकर्‍यांना या बाजार समितीतच माल विकवा असा कायदा असतित्त्वात आहे. नविन कायद्यात ही सक्ती काढून टाकण्यात येणार आहे तर त्याला या राज्य सरकारचा विरोध आहे. एका आमदाराच्या अर्ज‍वरून केंद्र शासनाच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे.
कलिंगड व सिताफळवाल्या सारखे लाखो शेतकर्‍यांचा माल वाशी मार्केटला येत असतो. सर्वांच्या बाबतीत अशीच लूट होत असते. वाशी, गुलटेकडी सारख्या बाजार समितीत व्यापार करण्य‍चा परवाना मिळवण्यासाठी व्यापारी दोन तीन कोटी रुपये का देतात हे आता समजले. कत्तल करण्याचा परवानाच तो. कोट्यावधी रुपयांना शेतकरी रोज लुटला जातो. शेतकरी बिचारा हतबल आहे. पर्याय नाही. अलगद या सहकारी सापलळात साोडतो. अशा लुटारू बाजार समित्यांना सक्षम पर्याय निर्माण करणे हा एकच मार्ग आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकर्‍यांचे कत्तलखाने आहेत असे, शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशीे जाहीर भाषणात सांगत. अनेक दशके शेतकरी संघटना शेतकर्‍यांना बाजार समित्यांच्या सक्तीतून मुक्ती देण्याची मागणी करत आहे पण मार्केट कमिट्यांतुन मिळणार्‍या मलिद्यासाठी सर्व पक्षाच्या सरकारांनी ही कत्तल सुरु ठेवली आहे. या कत्तलखान्यातुन शेतकरी नावाच्या सावजाला वाचवायचे असेल तर शेतकर्‍यांना बाजाराचे स्वातंंत्र्य मिळविण्य‍चा लढा तिव्र करावा लागेल. कसायांकडुन बकर्‍याची कीव करण्याची अपेक्षा व्यर्थ आहे व मंत्रालयात बसलेल्या दलालांना कमाईशी मतलब, शेतकर्‍यांच्या हिताशी यांना काय देण घेणं?

१९/११/२०२००

अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.
९९२३७०७६४६

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 2199 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Kiran mahadev …

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 2686 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    18 hours 40 minutes ago
  • धन्यवाद
    18 hours 41 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    20 hours 21 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    20 hours 23 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    20 hours 25 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
२ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन 24
IT कार्यशाळा - इंटरनेटचे धोके आणि फसवणुकीची कारणे - भाग-१२ 24
मोती असे गळाले.. 23
मग मात्र लिहावीच लागते कविता... 23
३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : कवी संमेलन-१ 23
हरवलेल्या पोळ्याचे संदर्भ 23
गझल: घेऊन जा करोना 23
गज़ल : विळखा अरे ऋणाचा 23
आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा 22
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 22
हूसास 22
संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती 22
हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे 22
९ वे Online शेतकरी साहित्य संमेलन : कार्यक्रमपत्रिका 22
योद्धा शेतकरी 22
माय मराठी स्तवन git 22
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल 22
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल : नागपुरी तडका 22
सत्कार समारंभ : वर्धा 21
गणपतीची आरती ॥३५॥ 21
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,042
कान पकडू नये 25,937
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,797
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,613
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,438
माय मराठी स्तवन git 25,424
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,160
एवढा मोठा नांगूर... 25,158
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,099
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,965
कापसाचा उत्पादन खर्च 24,492
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,430
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,094
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,067
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 24,067
शेतकरी पात्रता निकष 24,016
शेतकरी प्रकाशन 23,939
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,931
हे गणराज्य की धनराज्य? 23,915
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 23,762
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini