नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मरतात चार शेळ्या...
दाखले दिले त्यांनी कोणा विशेषत्वांचे
मरताच वाघीण ज्यांचे चवताळले रक्त
सोडून शहरी हवेल्या उघड्या शेतात जावे
राखावी पिके रात्री अन घालावी त्यांनीच गस्त...
डरकाळी धसका घेते रातीच्या काळोखाचा
गळ्यात जेव्हा भयाच्या गारठ्याला फुटतो घाम
उजेड सोबत ज्यांच्या स्वप्ने उशीत मोठी
दुलईच्या उबदार पोटी थंडीला गुलाबी नाम...
असतात घरात ज्यांच्या कुत्री सुसंस्कारी
अभ्यासे करीत खंत लिहावी त्यांनीच पाने
मांडून गणित पाहावे फाटल्या आशयाचे
विध्वंस होतो ज्यांचा भरावे रिते रकाने...
भागते भूक कुणाची मरतात चार शेळ्या
जगणेच घास होते राखोळी होता रिकामी
जोखमी आयुष्याच्या जखमा इलाजण्याला
बुद्धी सजग कुणाची येवो येथेही कामी...
रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने