Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 4:35 PM IST, बुध November 04, 2020
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३
 
खरं तर सोशल मीडियाचा वापर करतांना विशेष अशी काळजी घेण्याची गरज नाही फक्त इंटरनेटच्या बाहेर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात जितकी काळजी घेत असतो, तेवढी घेतली तरी पुरे आहे. पण खरी गंमत अशी आहे कि वापरकर्ते नेहमी हीच बाब विसरून जातात आणि सोशल मीडियाचा वापर गांभीर्याने न करण्याची सहज चूक करून बसतात.



सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची सावधगिरी :
 
  1. आपण आपल्या घराबाहेर पडताना दागिने ठेवलेल्या कपाटाची चाबी उघड्यावर अशीच अस्ताव्यस्त टाकून देत असतो का? नाही ना? मग दागिन्यांच्या कपाटाची चाबी जशी सांभाळून ठेवायची असते अगदी तसाच आपला पासवर्ड सांभाळून ठेवायचा असतो.
  2. आपल्या घरातली एखादी व्यक्ती उनाड, उधळी आणि बेजबाबदार असल्याची आपली खात्री झाली तर घरातील महत्वाचा ऐवज तिच्यापासून आपण सांभाळून ठेवत असतो ना? अगदी तसाच आपला त्या व्यक्तीपासून सुद्धा पासवर्ड सुद्धा सांभाळून ठेवायला हवा.
  3. सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन सभ्यपणाचे असते, तितकेच सभ्यपणाचे वर्तन सोशल मीडियातही ठेवायला हवे.
  4. प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनात आपले जसे वर्तन असेल अगदी तसेच वर्तन सोशल मीडियात ठेवावे. आगाऊ दिखाऊपणा केल्यास फार काळ दिखाऊपणा आपण लपवू शकत नाही. कधी ना कधी बिंग फुटणारच असते. त्यांनतर होणारी आपली मानहानी असहनीय असू शकते.
  5. अनोळख्या व्यक्तीला जसे आपण आपल्या मनातील रहस्य कधी सांगत नाहीत आणि मनातील गोपनीय अंतरंग उघडून दाखवत नाही त्याप्रमाणेच सोशल मीडियातील अनोळखी व्यक्तींशी सावधगिरीने वागणे आवश्यक असते. संबंध कामापुरतेच असावे.
  6. जसे प्रत्यक्ष जग रंगीबेरंगी-चित्रविचित्र लोकांनी भरलेले आहे तसाच सोशल मीडिया देखील रंगीबेरंगी-चित्रविचित्र लोकांनी भरलेला आहे, हे कायम ध्यानात असू द्यावे.
  7. आपल्या नगरात, वस्तीत, गावात जसे पॉकेटमार, लुटारु, भुरटे, वाटमारी करणारे, चोर, लबाड, ढोंगी, अतिशहाणे, दीडशहाणे वगैरे असतात ते सर्व आता सोशल मीडियातही उपस्थित आहे. सावध राहा.
  8. काही सोंगाडे बनावट चेहरे घेऊन तुमच्याशी मैत्री करायला व हितगुज करायला येऊ शकतात. स्त्रीच्या नावाची बनावट आयडी घेऊन येणारी स्त्रीच असेल असे नाही, तो कदाचित पुरुष असू शकतो. किंवा पुरुषाच्या नावाची बनावट आयडी घेऊन येणारा पुरुषच असेल असेही नाही, ती कदाचित स्त्री असू शकते. कुणाशी कितीही घनदाट मैत्री असली तरी कौटुंबिक किंवा गोपनीय स्वरूपाची माहिती त्यांना देऊ नका.
  9. कौटुंबिक समस्यांचे निवारण करायचे असेल तर आपल्या ओळखीच्या मित्राशी किंवा नातेवाइकांशीच संवाद करा.
  10. घरी मोबाईल असेल तेव्हा तो मोबाईल त्या व्यक्तिजवळच असेल असे नाही. घरातील अन्य सदस्यांजवळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वत्रिक स्वरूपाची बाब नसून विशिष्ट व्यक्तीशीच बोलावी अशी बाब असेल तर आधी दुसऱ्या एन्डवर संबंधित व्यक्तीच आहे याची खात्री करून नंतरच संवादाला सुरुवात करा.
  11. आपण आपल्या दैनंदिन जीवनात असभ्य, अभद्र, अश्लील व शिवराळ स्वरूपाचे वर्तन करत नसाल तर सोशल मीडियातही अजिबात करू नका. "इथे कोण पाहते" असे समजून चुकीचे वर्तन करायला गेलात तर आयुष्यभर कणाकणाने मिळवलेली पत व इज्जत एका चुकीमुळे धुळीस मिळू शकते.
  12. आपण आपल्या दैनंदिन जीवनात असभ्य, अभद्र, अश्लील व शिवराळ स्वरूपाचे वर्तन करत  असाल तरीही सोशल मीडियात असे काही करू नका. प्रत्यक्ष जीवनातील वर्तणुकीचे पुरावे मिळणे अवघड असते पण सोशल मीडियातील संभाषणाचे पुरावे कायम उपलब्ध असतात. सबब सवयी बदलून माणुसकीत येणे हितावह आहे.
  13. अनावश्यक व खात्री नसलेले मोबाईल ऍप्स डाउनलोड करून इन्स्टॉल करू नका. कदाचित एखादे अँप तुमच्या मोबाईलची हेरगिरी करून मोबाईल मधील फोटो, व्हिडियोसहित अन्य डाटा त्याच्या निर्मात्या मालकाकडे पाठवू शकते. म्हणून खात्रीशीर व आवश्यक ऍपच इन्स्टॉल करा.
  14. कोणत्या ऍपला वापरासाठी कोणकोणती परवानगी द्यायची याची सुविधा मोबाईल मध्ये असते. डॉक्युमेंट बघण्याची व कॅमेरा-व्हीडिओ वापरण्याची परवानगी अनावश्यक ऍप्सना देऊ नका. सेटिंगमध्ये जाऊन सेटिंग व्यवस्थित करून घ्या.
  15. तुम्हाला किंवा तुमच्या मोबाईल नंबरला किंवा तुमच्या ईमेल आयडीला हजारो/लक्षावधी रुपयाची लॉटरी लागल्याचा मॅसेज आल्यास तो अजिबात उघडू नका. वाचू तर नकाच नका. लगेच डिलीट करा आणि शक्य झाले तर असा संदेश पाठवणाऱ्याला BLOCK करा.
  16. बिनाजामीन व बिनडॉक्युमेंटने तुम्हाला सहज सुलभ कर्ज देतो, असा मॅसेज आल्यास तो अजिबात उघडू नका. वाचू तर नकाच नका. लगेच डिलीट करा आणि शक्य झाले तर असा संदेश पाठवणाऱ्याला BLOCK करा.
  17. मी म्हातारी झाली आहे व मला कुणीच वारस नसल्याने बँकेतील रक्कम मला दान करून टाकायची आहे, असे सांगत तुम्हाला सदर व्यक्ती काही माहिती मागत असेल तर अजिबात देऊ नका. 
  18. तुम्हाला सहज कर्ज/लॉटरी/दान देईल असा कुणीच व्यक्ती या संबंध जगात उपलब्ध नाही. मोहात पडून स्वतःचा घात करून घेऊ नका. 
  19. अनोळखी नंबरवरून फोन आल्यास आणि संशयास्पद वाटल्यास तो "१ नंबर दाबा/२ नंबर दाबा" असे सांगत असेल तर अजिबात कोणतेच बटन दाबू नका. कॉल डिस्कनेक्ट करून मोकळे व्हा आणि आपला खिसा कापायची कुणाला संधी देऊ नका.
  20. सोशल मीडियात चॅटिंग करून वेळ घालवण्याऐवजी नवनवीन बाबी शिकण्याला प्राधान्य द्या आणि आपले ज्ञानभांडार आणखी समृद्ध करा.
तूर्त इतकेच! बाकी नंतर यथावकाश बघुयात!!
 
शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
 
IT कार्यशाळा
सोशल मीडिया
सावधगिरी
कार्यशाळा
सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची सावधगिरी

Raosaheb Jadhav

बुधवार, November 4, 2020 - 19:29
Permalink
New

सुंदर उदाहरणे देऊन जागृती केली...
पण कोणतेही app घ्यायचे असेल तर allow करावेच लागते...
निदान काही पर्याय तरी...

  • Log in or register to post comments
महत्वाचे ऍप

गंगाधर मुटे

बुधवार, November 4, 2020 - 19:48
Permalink
New

महत्वाचे ऍप असेल जसे कि फेसबुक, मॅसेंजर, व्हाटसप, झूम, गुगल मीट वगैरे सारखे तर त्याना सर्व आवश्यक परमिशन देण्यात काहीच अडचण नाही.

 

पण ज्या ऍपची आपल्याला खात्री नाही आणि फारशी गरजही नाही त्यांना कॅमेरा, डॉक्युमेंट वगैरेची परवानगी देऊ नये.

  • Log in or register to post comments

In reply to सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची सावधगिरी by Raosaheb Jadhav

अत्यंत महत्त्वाचे

Pradip Deshmukh

बुधवार, November 4, 2020 - 20:22
Permalink
New

अत्यंत महत्त्वाचे

  • Log in or register to post comments
धन्यवाद

गंगाधर मुटे

बुधवार, November 4, 2020 - 20:35
Permalink
New

धन्यवाद सरजी!

  • Log in or register to post comments

In reply to अत्यंत महत्त्वाचे by Pradip Deshmukh

' वीस गोष्टी ' म्हणजे वापरकर्त्यांना 'विसावा देणारी दृष्टी ' !

MAHAAN CHAVAN

शुक्रवार, November 6, 2020 - 23:34
Permalink
New

' वीस गोष्टी ' म्हणजे वापरकर्त्यांना
' विसावा देणारी दृष्टी ' !

' माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा लेखमाला ' अंतर्गत भाग १३ मध्ये ' आंतरजाल तंत्रज्ञान ' आणि
' समाज माध्यम ' यांवरील खिसेकापूंपासून सावधान राहण्यासाठी त्यांचा कसा वापर करावा, यासाठी नानाविविध उदाहरणे देऊन समजावून सांगितलेल्या ' वीस गोष्टी ' म्हणजे वापरकर्त्यांना
' विसावा देणारी दृष्टी ' आहे.

- महान चव्हाण.

*congrats* :congrats: *hurray* *congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
विसावा देणारी दृष्टी

गंगाधर मुटे

शुक्रवार, November 6, 2020 - 19:20
Permalink
New

*namo* :namo:
*wink* ;-) ;) ^_~ :wink:
*ROFL* *ROFL* :rofl: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

  • Log in or register to post comments

In reply to ' वीस गोष्टी ' म्हणजे वापरकर्त्यांना 'विसावा देणारी दृष्टी ' ! by MAHAAN CHAVAN

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11470 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • दत्ता वालेकर
  • P D Katkar

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 136 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    1 hour 4 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    1 hour 47 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    14 hours 37 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 5 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 6 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
बा बळीराजा 10
कागद अजून कोरीच आहेत 9
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 9
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 9
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 9
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 9
गझल 9
शेतकरी 9
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 9
नागपुरी तडका - ई पुस्तक 9
वाढदिवसाची कविता 9
शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार 9
कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा 8
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 8
तुझ्यापायीच झाली ही दैना 8
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७ 8
हूसास 8
अभय 8
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 8
उद्ध्वस्त 8
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,133
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,097
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,751
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,251
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,214
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,169
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,139
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,637
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,946
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,893
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,494
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,629
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,001
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,601
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,469
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,799
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,270
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini