Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

वांझ

Main page content

श्री. अनिकेत देशमुख
By श्री. अनिकेत देशमुख | 8:19 PM IST, शुक्र July 17, 2020
कविता

वांझ

नेहमीप्रमाणंच....
तुमच्यासारखंच....
हे बियानंही बोगस निघालं सरकार!
आलटून पालटून मारेकऱ्यांकडेच
पुन्हा तीच तक्रार !!

ज्यांनी उसवून टाकलीत आमची
उद्याची सोनेरी स्वप्न
हिरावून घेतलं मातीचं
गर्भारपणाचं सुख!
पाचवीलाच पुजलेलं
हे पिढीजात दुख!!

ही तर भ्रूणहत्याचं?
पंचवार्षिक योजनांमधल्या
आभासी आकडेवाऱ्यांसारखी?
तुमची हिरवळ वाढतेय...
माती मात्र पारखी !

माती झुरत राहिली
प्रसवपिडांच्या कळांसाठी
नी बाप हरखत राहिला
हिरव्या कोंबांसाठी !

पण त्याच्या भाबड्या आशेला
वास्तवाचा अंकुर फुटलाच नाही
कर्जाचा गळ्याभोवतीचा दोर
घट्ट झाला; पण सुटलाच नाही

बाप निळा काळा होवून
कुढत स्वतःवरच रुसला
नी मायच्या कपाळावरचा
लाल सूर्य पुसला !

मातीनंच घेतलंय आता
त्याला आपल्या कुशीत
लेकरही वाढतील याच
काळ्या आईच्या मुशीत !

माती माय नी बाप
तिघांच्याही डोळ्यांत
दिसायचं हिरवं सपान
लेकरांच्या वहीत दडलेलं
जसं पिंपळपान !

बापाला सहन झालं नाही
मातीचं वांझ राहणं?
मायला पोखरुण गेलं
बापाचं केवीलवाणं पाहणं !

तरीही बापाने
नव्हती सोडायची उमेद
करायचा होता
इथल्या भेसळीचा शिरच्छेद !!

निदान आता तरी
सोडून द्यावं
जगणं कन्हून कन्हून
लढायचं एकजुटीनं
भूमिपुत्र बनून !!

कदाचीत
त्याला ठाव नवतं
ही 'कृषीप्रधान व्यवस्थाच वांझ झालीय'
ह्या बियाण्यांसारखी म्हणून....
ह्या बियाण्यांसारखी म्हणून.....
....
©®✍️अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
(पाऊलखुणाकार )
रा- गोपालखेड , ता. जि. अकोला
MO. 9689634332

©®Copyright: - Aniket J. Deshmukh

ग

Narendra Gandhare

सोमवार, September 21, 2020 - 08:00
Permalink
New

सुंदर.. पाउलखुणा....

  • Log in or register to post comments
मनःपूर्वक धन्यवाद सर

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, September 25, 2020 - 21:54
Permalink
New

मनःपूर्वक धन्यवाद सर

  • Log in or register to post comments

In reply to ग by Narendra Gandhare

ही प्रवेशिका ग्राह्य नाही.

गंगाधर मुटे

शनीवार, October 10, 2020 - 13:50
Permalink
New

प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही  प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास  विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.



सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल.  त्यासाठी  Fingure-Right  लेखन करा  Fingure-Leff  येथे क्लिक करा. या धाग्यावर क्लिक करून आपली प्रवेशिका नव्याने सादर करावी.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5840 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Kiran mahadev …

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 2850 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    21 hours 6 minutes ago
  • धन्यवाद
    21 hours 7 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    22 hours 47 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    22 hours 50 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    22 hours 52 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 36
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 35
उद्देश आणि भूमिका 35
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : नियम, अटी व तपशिल 35
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 34
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 33
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल 32
इरसाल पाऊस 31
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31
अतरंगी पाऊस 31
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 31
गझल 31
गझल :अस्तित्व भारताचे 31
पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा 30
मी मेल्यावर....! 30
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 30
वरुणा ! वरुणा ! 30
सटवाई 29
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 29
उपद्रवी जिवाणू 29
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,579
नियमावली 44,848
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,297
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,948
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,836
शरद जोशी 40,828
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,384
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,221
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,700
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,196
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,189
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,820
गरीबी कशामुळे? 36,200
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 35,036
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,754
आईचं छप्पर ।।१०।। 34,695
रे नववर्षा 33,892
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,559
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,529
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,474
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini