नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कॅक्ट्स
रखरखत्या उन्हांत,
विशाल वाळवंटात
अगदी मध्यभागी
उभं होतं 'कॅक्ट्स'
उंच, हिरवं अगदीच एकाकी
सोबतीला होती त्याची छाया.
उन्हाची खंत नाही,
वादळ-वाऱ्याचे भय नाही.
जमिनीत खोलवर
रुतवून आपली मुळे,
अढळ उभं आहे आजही.
मनात विचार येतो,
आपणही असंच उभं राहावं,
या जीवनरूपी वाळवंटात.
अढळ, अभेद्य,अखंड.
जीवनातील संकटांना सोसत;
केवळ आत्मविश्वास व
इच्छाशक्तीरुपी मुळाच्या आधारावर.
कारण अशीच व्यक्ती यशस्वी होते
जसे वातावरणाच्या शुष्कतेत यशस्वी झालं
ते 'कॅक्ट्स'
संदीपकुमार
दि.३० मार्च,२०१५