Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकरी साहित्य चळवळ संघटनात्मक बांधणी कार्यक्रम

पोस्ट दिनांक : ०९/०९/२०२१
 
शेतकरी साहित्य चळवळ संघटनात्मक बांधणी कार्यक्रम
 
नमस्कार मृदसृजकहो,
 
मागील काही दिवस सहकाऱ्यांशी विचारविनिमय केल्यांनतर मुदतीच्या आत संघटनात्मक बांधणी पूर्ण व्हावी म्हणून खालीलप्रमाणे कार्यक्रम घोषित करण्यात येत आहे.
 
१) दि. १२/०९/२०२१ : संस्थेचे नियम व नियमावली निर्माण समितीची स्थापना व घोषणा
२) दि. १९/०९/२०२१ : संस्थेचे नियम व नियमावलीचा कच्चा मसुदा जाहीर करणे.
३) दि. २२/०९/२०२१ : संस्थेचा सभासद नोंदणी कार्यक्रम सुरुवात 
४) दि. ३०/०९/२०२१ : अंतिम तिथी-संस्थेचा सभासद नोंदणी कार्यक्रम
५) दि. ०२/१०/२०२१ : संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा
६) दि. ०२/१०/२०२१ : संस्थेचे नियम व नियमावलीला मंजुरी 
७) दि. ०३/१०/२०२१ : व्यापक व विस्तारित कार्यकारिणीची घोषणा
८) दि. ०५/१०/२०२१ : व्यापक व विस्तारित कार्यकारिणीची ऑनलाईन सभा 
९) दि. ०६/१०/२०२१ : वर्ष २०२१-२२ च्या नियोजित उपक्रमांच्या घोषणा.
 
सहकार्याच्या अपेक्षेत!
 
आपला स्नेहांकित
 
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=========

पोस्ट दिनांक : ०६/०९/२०२१

शेतकरी साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी

 
नमस्कार मृदसृजकहो,
 
"पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" हे ब्रीद घेऊन अबोलतेला लिहिते बोलते करण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्थापन झालेल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची मुहूर्तमेढ अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २०१४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता गझलनवाज पं भिमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते, श्री विजय विल्हेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री संजय कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
 
या काळात आपण ७ साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करून पार पाडलीत आणि आठवे संमेलन आयोजनाच्या उंबरठ्यावर आहे. पण शेतकरी साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी करणे आवश्यक असूनही आजपर्यंत तसे शक्य झाले नव्हते. शेतकरी साहित्य चळवळीचे अवघड धनुष्य कोण कोण पेलू शकेल, सुदृढ, सकस आणि अर्थपूर्ण शेतीसाहित्याची पताका समर्थपणे कोण कोण आपापल्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करू शकेल याविषयी आजवर  धूसर असलेले चित्र आता सुस्पष्ट व्हायला लागल्याने बांधणीचे कार्य सुरु करणे आवश्यक झालेले आहे. त्यादृष्टीने आता वेगवान पावले टाकण्याची आवश्यकता आहे. 
 
या अनुषंगाने आपले मत महत्वाचे ठरणार आहे. चळवळीला नियमावली व घटना असावी का? असली तर प्रारूप काय असावे? संघटनात्मक बांधणीचा आराखडा कसा असावा? याविषयी आपली मते आमंत्रित आहेत.
 
सहकार्याच्या अपेक्षेत!
 
आपला स्नेहांकित 
 
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=========
Share