नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सकाळ पासून चालवते,
तो दोन बैलांचा नांगर।
त्याची बायको घेऊन जाते,
त्याला चटणी आणि भाकर।
एकदा पाऊस पडला नाही,
गेलं वाया पूर्ण शेत।
दुसऱ्या वर्षी कर्ज कडून,
त्यानं पिकवल हिरवं शेत।
पाहून कापसाचे भाव,
तो रडला शेतकरी।
दुसऱ्या दिवशी त्यानं,
घेतली विहिरी मधी उडी।
दोन वेळच अन्न,
शेतकऱ्याला चांगलं मिळत नाही।
पण, सरकार शेतकऱ्याकडे,
वाळूनही पाहत नाही।
चांगलीच होते,
या शेतकऱ्याची दशा।
मग जगावणार देश,
हा शेतकरी कसा।
नाव:-प्रतिक राऊत