
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाप पेरणी करतो
ऊन डोक्यावर घेतो
पिकासाठी बाप माझा
घाम कपाळाचा देतो
शेतामधी पीक आले
झाली जमीन आनंदी
काळया मातीच्या गंधात
मन झाले हे सुगंधी
पाणी लाऊन सरीने
वाहे पाट झुळझुळू
पीक येई अंगावरी
मन लागे हुरहूर
बाप करतो राखण
रात्र दिवस बेजार
पीक नाही आले तर
जीव येई फासावर
मातीमध्ये राबतो हा
घाम गाळतो रानात
कष्ट करी राजा जरी
जीव झाला कासाविस
साईनाथ बालाजी रहाटकर
मु पोस्ट दगडगांव
ता. लोहा.जिल्हा. नांदेड
पिन क्र:431708
मो, 7350848348