Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शेतकऱ्यांच्या जीवनाचा सातबारा : सुखदेव ढाणके ह्यांचा काव्यसंग्रह :पिंडपात

Main page content

Kiran dongardive
By Kiran dongardive | 9:20 PM IST, शुक्र September 17, 2021
पुस्तक समीक्षण

शेतकऱ्यांच्या जीवनाचा सातबारा: पिंडपात

सुखदेव ढाणके यांच्या दर्जेदार कवितांची मेजवानी देण्याचे काम विष्णू जोशी यांनी आपल्या काव्याग्रह प्रकाशना मार्फत केले आहे. सुखदेव ढाणके या प्रतिथयश कवीच्या काव्यातील कथा ही शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी आहे.
उणारून जीव केला संवसार उभा
लेकरांच्या पंखावर स्वार केले नभा
स्वतः कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी मात्र सोनेरी दिवसाच्या स्वप्न प्रत्येक शेतकरी बाप पाहतो. ह्या बापाच्या खांद्याला खांदा देत दुष्काळाच्या काळात जन्मूनही माहेरी लाडाची लेक असलेली माय कसा संसार करते ते सांगताना कवी म्हणतात,
बापाच्या दो हाताची माय बळकट मूठ झाली
ह्या ओळी मधून मायने बापाला दिलेली साथ किती लाख मोलाची असते हे दिसून येते तर,
अशाच एका प्रहराला
जाते तिचे मुके झाले
तिच्यासह ओवी मेली
अस्तित्वाचे धुके झाले
अशा ओळीतून अंगावर सर्रकन काटा येतो, आई गेलेल्या दुःखाने पोरके झालेली प्रत्येक व्यक्ती सैरभैर होऊन स्वतःच्या आईची आठवण करते हे प्रचंड सामर्थ्य कवींच्या शब्दाचा आहे, कवी किती मोठ्या प्रतिभाशक्तीचे धनी आहेत याची जाणीव रसिकाला होते. आई-बाबा प्रमाणेच कृषक समाज हा बैलांचा कायम ऋणांकीत आहे तोच धागा पकडून बैल आणि नको कोरी झुल अशा सुंदर कविता पिंडपात मध्ये आहेत. बाप आणि बैल या कवितेत तर दोघांच्याही कष्टाचे वर्णन आढळते, तर खुंट्यावरच मरु कवितेमध्ये,
दोर असा कापू नको
खाटकाला विकू नको
खुंट्यावरच मरु दे
मातीत अंती झरू दे
अशी आर्त विनवणी बैलांच्या वतीने कवींनी केलेली आहे. माझ गाव: काल आज आणि उद्या ह्या कवितेत जगरहाटी प्रमाणे बदलत गेलेल्या गावाचे वर्णन अस्वस्थ करून जाते. कृषक संस्कृतीतील शेतकऱ्यांचे दुःख पिंडपातच्या पानापानावर कवींनी मांडले आहे.
आली मळणीत खोटं
नाही आकणीत दाणा
झाले कुटार जिण्याचे
त्यास ढोरही खायी ना
अशाप्रकारे शेतकऱ्यांचे जीवन त्यांच्या हाल-अपेष्टा कवींनी जवळून पाहिल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या कविता प्रभावीपणे काळजास भिडतात. पावसा, ढगातल्या माय बापा, ओल्या सुक्या दुष्काळाचे अशा कवितांमधून पावसाची आर्त वाट पाहणारा बळीराजा समोर उभा राहतो. दंतकथा ह्या कवितेतून लोप पावत चाललेली ग्रामीण संस्कृती आणि नष्ट होत चाललेला सर्व धर्म समभाव ह्याची आठवण देत कवी म्हणतात,
एकादशी करी रोजा
ईद दिवाळीच्या घरी
शिरखुर्म्याची वाटी
पुरणाच्या पोळीवरी
वरील शब्दचित्रण आपण अनुभवलेले असले तरी आज ती एक दंतकथा वाटते ही खंत मांडताना ह्याच कवितेत कवी म्हणतात,
वर्तमानाच्या दाढेत
झाला भूतकाळाचा चोथा
चरचरीत सत्याची
उरे आज दंतकथा
अश्याप्रकारे शेतकरी व ग्रामीण जीवन मांडत असताना कवीने प्रमाण शब्द वापरून कविता रसिकाच्या अधिक जवळ पोहोचतील ह्याची काळजी घेतली आहे. ग्रामीण जीवन मांडायचेचे म्हणजे ग्रामीण बोलीभाषा वापरली पाहिजे असा अट्टहास न धरता आपली शैली आपली बोली आपली वृत्ती व प्रवृत्ती कायम ठेवत कवितेतील शब्द सौंदर्य कोठेही कमी न पडू देता आशयाच्या अंगाने कविता अधिक खुलवते नेण्याचे काम सुखदेव ढाणके यांनी या संग्रहात केले आहे. आपल्या दैन्या बद्दल कवीच्या कवितेतील शेतकरी कुणावरही आगपाखड करत नाही. रक्तरंजित क्रांती आणि परीवर्तनाची भाषा करत विळ्या कोयत्याना तलवारीत बदलत नाही. तर आपली व्यथा आणि वेदना मांडून समाजानेच संवेदना जागवावी ह्या विचारातून कर्माच्या बळावर नियतीशी लढून टिकून राहणारा बळीराजा आपल्याला या ठिकाणी दिसतो. अगदीच अपवाद म्हणून सर्व व्यवस्थेवर रोष प्रकट करताना कवी म्हणतात,
अनुदानाचे टवाळ गाणे पॅकेजचा पोकळ ढोल
सुखात माती काळवणाऱ्या हरामाचे नरडे सोल
अश्या प्रकारे कवी व्यक्त होत असताना व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह ठेवतो. शेवटी काही मुक्तकातून तर
लाज द्रौपदीची कोण, लाल मायीचा राखे
तिच्या भरोश्याचा कान्हा दुःशासनाला सामील
अशा ओळींमधून स्त्रियांवरील अत्याचाराला आता कोणी वाली राहिला नाही असे कवी म्हणतात. धर्म-कर्म संस्कृती परंपरा इत्यादी अनेक अवडंबरच्या अत्याचाराला स्त्री रोज बळी जात आहे हे दाहक वास्तव कवींनी मांडले आहे.जेष्ठ चित्रकार श्रीधर दादा अंभोरे ह्यांचे आकर्षक साजेशे आणि बोलके मुखपृष्ठ, विष्णू जोशींची प्रकाशक म्हणून मेहनत व आशयघन अनुभव सिद्धते सह दिव्य प्रतिभेचा सुखदेव ढाणके यांचा शब्दविष्कार ह्याचा परिपाक म्हणजेच पिंडपात हा संग्रह होय कवीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!
किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7, समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576
पिंडपात
कवी सुखदेव ढाणके
काव्यग्रह प्रकाशन वाशीम

काव्यसंग्रहाचे खुप छान

Rajesh Jaunjal

शुक्रवार, September 17, 2021 - 22:07
Permalink
New

काव्यसंग्रहाचे खुप छान समीक्षण केले किरणभाऊ.

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 20:30
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6460 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Rajshree
  • आशिष आ. वरघणे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 104 *
Who's new नवीन सदस्य
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    8 hours 58 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    9 hours 41 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    22 hours 31 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 13 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 13 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
जिवाची काशी 1
करोना तुझ्यामुळे रे..... 1
ये रे म्हणू की जा रे पावसा? 1
अभंग 1
स्वानुभवाचा वैश्विक आविष्कार: 'चांदणभूल' 1
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका 1
तरी हुंदक्यांना गिळावे किती? 1
आले तव चरणा 1
गझल: एकिकडे 1
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 1
एकटी 1
प्रतिनिधींचे मनोगत आणि अभिप्राय : 12sss 1
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 1
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 1
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 1
बायल्यावाणी कायले मरतं? 1
तुमचं काय गेलं:- मंगेश पाडगावकर व्यंगातून जीवन भाष्य 1
बळीच्या सरणावरती 1
इतिहासातील अनमोल रत्न : बळीराजा 1
हताश औदुंबर 1
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,137
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,128
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,292
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,218
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,181
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,178
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,677
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,952
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,896
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,500
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,962
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,672
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,002
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,602
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,471
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,804
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,274
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini