कथेचा विषय - कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा
Main page content
लेखाचे समीक्षण
कथेचे नाव - गंधवार्ता एका प्रेताची
कथेचा विषय - कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा
कथेचा विषय - कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा
लेखक - गंगाधर मुटे
कथा लेखक 'गंगाधर मुटे" लिखित कथेत कर्जबाजारी शेतकर्याच्या दुःखाचे वर्णन केले आहे. वास्तव चित्र दृष्टीसमोर उभे राहते. सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी. दारिद्र्य त्याच्या पाचवीलाच पुजलेले. दुष्काळानं शेतात पिक नाही. अशावेळी सावकाराची, बँकांची दारे ज्याला बंद झाली असा शेतकरी कितीही निधड्या छातीचा असला तरी परिस्थितीनं तो खचून जातो. पण - तरीही लढत राहतो. त्याच्यामध्ये एक जिद्द लपलेली असते. मुलाबाळांचे स्वप्न तो रंगवत असतो. लेखक गंगाधर मुटे यांना 'अर्जुन'च्या प्रतिकातून कित्येक 'अर्जुन' दिसतात. एका बाजूने भरत गव्हाणकर सारखे शेतकरी शासकिय नोकरी सोडून शेतीत नवनवीन प्रयोग करतात. पण हाती काहीच लागत नाही. अर्थात तेच घडते. पण प्रयत्नांची शर्थ करणारा भरत भविष्याशी लढत राहतो. शिवाय शेतीबरोबर जोडधंदाही करतो. शांत, विवेकी, प्रसंगावधानी संकटांना सामोरा जाणारा शेतकरी.
कितीही प्रसंग आपणावर ओढवले तरी खचून न जाता प्रसंगांना तोंड द्यावे व आपल्या जीवनाचे सार्थक करावे. 'मी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा म्हणतात मला' असा संदेश लेखक येथे भरतच्या प्रतिकातून देतात.
माणसाचे जीवन हे क्षणभंगूर असते. त्याच्या वाट्याला काही दिवस सुख तर काही दिवस दुःखच असते. त्याला पोटापाण्याची चिंता असते.
मुला-बाळांचे प्रश्न दृष्टिसमोर असतात.खडतर आयुष्याचा मार्ग तो आक्रमित असतो.अशावेळी जगावे कसे? हाच त्याचा मुख्य प्रश्न असतो. लेखक गंगाधर मुटे यांनी म्हणी, वाक्प्रचार वापरुन कथेला धार आणली. कथानकातून वास्तव सत्य दृष्टीस पडते.लेखकाला कर्जबाजारी अर्जुन शेतकर्याचा मृत्यू, त्याच्या पत्नीचा मृत्यू, मुलींचे छत्र हरपल्याचे अफाट दुःख झाले आहे. हे हृदयाला छेदणारे दुःख. वाचकाच्याही हृदयाची तार तुटते. हे दुःख शेवंताने दिलेल्या टाहोवरुन व भरतच्या भरल्या हृदयाच्या टाहोवरुन मनाला छेदणारं आहे.
सदर कथेतील संवादातून ग्रामीण बोलीभाषेचा प्रभाव दिसून येतो. शेतकर्याचे कष्टमय जीवन,त्याला सतत दुःखाचे चटके सहन करावे लागतात; हे येथे हुबेहुब व्यथित केले आहे. 'अर्जुन' झाडावर लटकलेला, निलिमा निपचित पडलेली, शब्दाली मांजरीशी खेळत बसलेली, मुन्नीचा समंजसपणा हे सारे दृष्य दृष्टिपटलावर हायलाईट केल्यासारखे दिसतात. तसेच कान ग्रहण करण्याच्या योग्यतेचे नाहीत, दृष्याचे पृथक्करण, मेंदूस अर्थ पुरवण्याइतपत जाणीवा पक्व नसणे, गंधवार्ता कळणे ईत्यादी शब्दप्रयोगातून मन अगदी भावनावश होते. खरंय शेतकर्याला वाली नाहीच.....
संपूर्ण कथा मनाला भिडणारी आहे.
सौ.वीणा अजित माच्छी
डहाणू ,पालघर.
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 18 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 1 day 11 hours ago
- 1 day 11 hours ago
- 1 day 11 hours ago
- 1 day 11 hours ago
- 2 days 12 hours ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| वांगे अमर रहे...! | 45,509 |
| नियमावली | 44,820 |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,152 |
| What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi | 41,823 |
| मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | 41,743 |
| शरद जोशी | 40,746 |
| “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ | 39,115 |
| शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे | 39,057 |
| संपर्क/सुचना/अभिप्राय | 38,548 |
| ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन | 37,046 |
| मी मराठी - स्पर्धा विजेती गझल | 37,045 |
| माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. | 36,801 |
| गरीबी कशामुळे? | 36,067 |
| बरं झाल देवा बाप्पा...!! | 34,618 |
| आईचं छप्पर ।।१०।। | 34,525 |
| पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। | 34,063 |
| रे नववर्षा | 33,748 |
| शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन | 33,297 |
| श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ | 32,271 |
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,267 |

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
गंगाधर मुटे
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
*congrats* :congrats:
*bq* *bq*