कविता म्हणू प्रियेला
कविता म्हणू प्रियेला
कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी?
'' साहित्यचोर न टपो '' या काळजीत मी
अपराध काय माझा ते तूच सांग ना
लेखी तुझ्या उरावा माझा अतीत मी
अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता
जगणे अवखळ माझे अन टवटवीत मी
धावायचे किती रे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी
’अभयास’ अभ्रकाचे छप्पर नसे जरी
नक्षत्र पांघरुनी या झोपडीत मी
गंगाधर मुटे
..................................................
वृत्त - 'विद्युलता'
..................................................................
- Read more about कविता म्हणू प्रियेला
- Log in or register to post comments
- 7906 views
गणपतीची आरती जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥ वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥ पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥ तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक एक आस जीवनास, पंथ दावी नेक
Recent comments ताजे प्रतिसाद