पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
प्राक्तन फ़िदाच झाले प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ? हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा? नेमस्त गांजलेले कानून पाळताना आता ’अभय’ जगावे अश्रू न पाझरावे आशेवरी निघावे ही वाट चालताना गंगाधर मुटे ................................................ (वृत्त - आनंदकंद )
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.