Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

रानमेवा

Main page content

माणूस

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:26 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
कविता
कविता
कविता
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

माणूस

अरे माणूस माणूस
जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने
रोज पेटवितो चुल्हा ......!

अरे माणूस माणूस
जसा बक समाधिस्थ
मिष साधूचे घेवूनी
करी सावजाशी फस्त .....!

अरे माणूस माणूस
जसं सरड्याचं अंग
वेळ तशी खेळे संधी
बदली चामडीचे रंग ......!

अरे माणूस माणूस
जसा श्वान पोळी खाया
झगडितो आप्तियांशी
नाही दया, नाही माया......!

अरे माणूस माणूस जसा
इंगळीचा चावं
एक बोल जिभलीचा
देई कलिजाला घाव ......!

अरे माणूस माणूस
जसा कुंभाराचा खर
फुकामधी ओझे वाही
वर चाबुकाचा मार ......!

अरे माणूस माणूस
कसं निसर्गाचं देणं?

baliraja
बळीराजा
रानमेवा
कोल्हा
माणूस
सरडा
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
  • Read more about माणूस
  • Log in or register to post comments
  • 7688 views

तू तसा - मी असा

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:21 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
कविता
कविता
कविता
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

तू तसा - मी असा

नाकीतोंडी माश्या गेल्यात, मी मात्र मख्ख
माझी अवस्था पाहून, तू खिदळलास चक्क

मोगल आले तेव्हा, मी अगदी स्वस्थ
लाळ घोटायचा खुलेआम, तू मात्र मस्त

इंग्रज आले तेव्हा, मी झोपलो गाढ
चापलुशित तुझ्या, बरीच झाली वाढ

डोंगरमाथ्याहून शिवाजी, घालत होता साद
मला फ़ुरसत नव्हती, तुला फ़ितुरीचा नाद

फ़ाशी चढताना भगतसिंग, स्वप्न पाहत होता
मला प्रपंचाची ओढ, तू टाळ्या वाजवीत होता

आता उजाडेल,मग उजाडेल
"अभय" कधीतरी उजाडेल?
की.....
तू तसा-मी असा,
म्हणून उजाडणेही बुजाडेल?

गंगाधर मुटे

baliraja
बळीराजा
रानमेवा
इंग्रज
भगतसिंग
शिवाजी
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
  • Read more about तू तसा - मी असा
  • Log in or register to post comments
  • 6366 views

नंदनवन फ़ुलले ...!!

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:17 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी काव्य
शेतकरी काव्य
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

नंदनवन फ़ुलले ...!!

वृद्धतरूच्या पारावरती,
झोके घेत झुलले
तरूघरी नंदनवन फ़ुलले

रम्यकोवळी रविकिरणे ती
कुणी अप्सरा खिदळत होती
मेघही हसती उडता उडता
गरजणे भुलले

भूक कोवळी घेऊन पाठी
स्वप्न उद्याचे कुणी शोधिती
भिरभीर भिरभीर उडती पतंगे
पंखही खुलले

पक्षी बोलती खोप्यामधुनी
मधमाश्यांशी हितगुज करूनी
वल्ली नाचल्या धुंद होऊनी
देठ थरथरले

गाय,खार अन् मनीम्याऊ ती
खेळ खेळती लपती छपती
चित्रकार तो तद्रूप झाला
रंगही स्फ़ुरले

चैतन्याचे अभय तरंग
वृद्ध तरूही झाला दंग
खोडव्याला फ़ुटली पालवी
फ़ुले ही फ़ुलले

गंगाधर मुटे

baliraja
बळीराजा
रानमेवा
अप्सरा
नंदनवन
निसर्गकविता
मेघ
शेतकरी
शेतकरी गीत
शेतकरी काव्य
shetkari
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
बालकविता
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
  • Read more about नंदनवन फ़ुलले ...!!
  • Log in or register to post comments
  • 7794 views

मांसाहार जिंदाबाद ...!!

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:12 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
कविता
कविता
कविता
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

मांसाहार जिंदाबाद ...!!

सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन् गांडूळाच्या शेवया...!!

गोचिडाची खिचडी
टमगिर्‍याचं भरीत
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीत
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण
घे पुरणात भराया .....!!

गोमाश्यांचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
उवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!

कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जिभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरिबाला सुळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!

गंगाधर मुटे

baliraja
बळीराजा
रानमेवा
कोंबडी
गांडूळ
बकरी
मांसाहार
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
विनोदी लेखन
कविता
काव्यधारा
विनोदी कविता
  • Read more about मांसाहार जिंदाबाद ...!!
  • Log in or register to post comments
  • 16612 views

जरासे गार्‍हाणे

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:09 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
कविता
कविता
कविता
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

जरासे गार्‍हाणे

कुठे नोंदावे गार्‍हाणे हत्तीने तुडवले तेव्हा
वार्‍याने उडवले आणि पावसाने बडवले तेव्हा ......!

आदर्शाच्या रेघा शिष्यांनीच पुसून टाकल्या
त्या महात्म्याला वारसाने रडवले तेव्हा ......!

त्यागुनी रणांगणाला पळपुटे जे पळाले
त्यांच्या पराक्रमाला कनकाने मढवले तेव्हा ......!

जीविताची राख ज्यांच्या, सिंहासने घडवताना
त्यांच्याच चामडीचे पायतणे चढवले तेव्हा ......!

बसवूनी खांद्यावर अभयाने आधार दिला,
तोच हितशत्रू ! कारस्थाने दडवले तेव्हा ......!

गंगाधर मुटे

baliraja
बळीराजा
रानमेवा
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
  • Read more about जरासे गार्‍हाणे
  • Log in or register to post comments
  • 5890 views

ऊठ ऊठ शेतकरी बाळा

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:06 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
शेतकरी गीत
शेतकरी गीत
शेतकरी गीत
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

ऊठ ऊठ शेतकरी बाळा

ऊठ ऊठ शेतकरी बाळा, तोड रे पैंजणचाळा
भूमातेची साद तुला, रानगंध लेवी भाळा
उचलुनी देख फ़णा, मना... शोध रे कारणा ...!
 
ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
तुझा बाप घाम गाळी, फुलोरते धरणी काळी
कोण करी सदावर्ते? चिंध्या का रे त्याच्या भाळी?
शोध हा तू न्यायपणा, मना... शोध रे कारणा ...!
 
तुझा बाप सांब भोळा, कष्टकरी मराठमोळा
baliraja
बळीराजा
रानमेवा
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
ग्रामीण
माझी कविता
वाङ्मयशेती
शेतकरी
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
  • Read more about ऊठ ऊठ शेतकरी बाळा
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 19649 views

रे नववर्षा

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:48 AM IST, Wed June 22, 2011
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी काव्य
शेतकरी काव्य
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

रे नववर्षा

रे नववर्षा ये नेमाने
वल्हवीत अंकुर नवजोमाने
एक कवडसा चैतन्याचा
जा फुलवीत ही उदास राने ....!

ना अस्त्राने वा शस्त्राने
उकलन व्हावी सद्भभावाने
मत्सर-हेका ना गर्जन-केका
बाहुबलीचे नको भुजाने .....!

दानवाने ना देवाने
राज्य करावे बळीराजाने
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!

रे नववर्षा दे अभयाने
दे भरुनी दुरडी भगोणे
वित्तपातल्या लक्तरांना
भरव मुक्तीचे चार दाणे ...!

गंगाधर मुटे

....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)

baliraja
बळीराजा
रानमेवा
वाङ्मयशेती
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
ग्रामीण
माझी कविता
शेतकरी
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
  • Read more about रे नववर्षा
  • 7 comments
  • Log in or register to post comments
  • 33734 views

श्री गणराया - ।।२।।

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:12 PM IST, Mon June 20, 2011
काव्यधारा
अभंग
अभंग
अभंग
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

श्रीगणेश श्री गणराया कृपावंत व्हावे श्री गणराया भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥ चिंतामणी तू चिन्मय देवा अनुतापी मी, तू करुणा ठेवा द्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥ भयमोचक तव मंगलदृष्टी अनुदिन लाभो तारक वृष्टी हा भवबंध पार कराया ॥२॥ अनुष्ठान हे तव पूजनाशी क्षणभंगुर मी, तू अविनाशी साह्य होई मज अभय तराया ॥३॥ गंगाधर मुटे .................................................................... (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)

baliraja
बळीराजा
रानमेवा
माझी वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
माझी कविता
वाङ्मयशेती
कविता
काव्यधारा
भक्तीगीत
अभंग
ओवी
भजन
  • Read more about श्री गणराया - ।।२।।
  • 3 comments
  • Log in or register to post comments
  • 18989 views

पंढरीचा राया : अभंग ।।६।।

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:02 PM IST, Mon June 20, 2011
काव्यधारा
अभंग
अभंग
अभंग
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

विठोबा पंढरीचा राया : अभंग पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

baliraja
बळीराजा
रानमेवा
माझी_वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
माझी कविता
वाङ्मयशेती
कविता
काव्यधारा
भक्तीगीत
अभंग
भजन
  • Read more about पंढरीचा राया : अभंग ।।६।।
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 15887 views

शुभहस्ते पुजा : अभंग ।।५।।

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:59 PM IST, Mon June 20, 2011
काव्यधारा
अभंग
अभंग
अभंग
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

विठ्ठल शुभहस्ते पुजा : अभंग प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥ सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥ त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥ हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥ लबाड लंपट । तयांची जमात ॥ माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥ पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥ मन किटाळले । कैसे नाही ॥४॥ म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥ अभयास वाटे । शंका तशी ॥५॥ गंगाधर मुटे ....................................................................

baliraja
बळीराजा
रानमेवा
माझी_वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
माझी कविता
वाङ्मयशेती
कविता
काव्यधारा
भक्तीगीत
अभंग
भजन
  • Read more about शुभहस्ते पुजा : अभंग ।।५।।
  • 2 comments
  • Log in or register to post comments
  • 17695 views

Pagination

  • Previous page ‹‹
  • Page 4
  • Next page ››
Subscribe to रानमेवा

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 5 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • डॉ. मीरा पंडित
  • spatil
  • Liladhardawande786
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 18 *
Who's new नवीन सदस्य
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18
  • Gauspasha Shaikh

Recent comments ताजे प्रतिसाद

  • लोकांना काय सांगू?
    20 minutes 9 seconds ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    1 hour 11 minutes ago
  • लेखनाचा विषय : शेती/महिला…
    3 hours 13 minutes ago
  • अत्यंत हृदयाला भिडणारे आणि मातीशी घट्ट नाळ जोडणारे
    4 hours 55 minutes ago
  • वैचारिक लेखाचा विषय दिलेला…
    6 hours 18 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ