Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



प्रतिनिधी नोंदणी : ११ वे साहित्य संमेलन

११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
दिनांक : सोमवार ४, व मंगळवार ५, मार्च २०२४  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
 
Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad
https://baliraja.com/rep-regd

Ad कार्यक्रमपत्रिका Ad
https://www.baliraja.com/kp11

Ad  नियोजन  Ad
https://baliraja.com/node/2847
 

अग्रिम प्रतिनिधी नोंदणी
(Advance Booking)

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती (१ रु. सुद्धा चालेल.) शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य व बंधनकारक आहे. ऑनलाईन भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी मिळू शकेल..
  • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
  • सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेऊन पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  • संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त राखणे बंधनकारक असेल.
महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही. 

अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

    ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 
       Punjab National Bank 
       Branch - Hinganghat 
       A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 
       A/c No - 0202000105179647
       IFSC Code - PUNB0020200 
       MICR Code - 442024005 

किंवा 
  
खालील अंगारमळा QR कोड वापरावा.

अंगारमळा

*  *  *   *
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : सहभाग शुल्क भरून झाले की पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी. 

     (A) ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :

  • Transaction No/Refference No नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी  येथे  Fingure-Right    क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
  •  टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी 
https://www.baliraja.com/Rep-11sss या लिंकवर पाहता येईल.

**********
    (B) ईमेल किंवा व्हाटसप द्वारे खालील माहिती पाठवावी. :

  • abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 97 30 78 60 04 या व्हाटसपवर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
  • ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. मोबाईल नंबर : 
  8. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  9. Txn/Ref/Rcpt No : 
  10. शुल्क भरल्याचा दिनांक : 
  11. संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त कायम राखण्यासाठी मी सहकार्य करेन.

वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.

कार्यक्रमपत्रिका Fingure-Right https://baliraja.com/kp11

नियोजन Fingure-Right https://baliraja.com/node/2847


आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

             आपला स्नेहांकित 
                गंगाधर मुटे
                 कार्याध्यक्ष
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मोहाडी, नाशिक
*  *  *   *
Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 04/12/2022 - 17:00. वाजता प्रकाशित केले.
    महत्वाचे निवेदन

    १) संमेलन प्रतिनिधी नोंदणी ही प्रतिनिधीची उपस्थिती नोंदणी असते. प्रतिनिधी नोंदणी केलेल्या सर्वांनाच व्यासपीठावर संधी मिळू शकत नाही. ही जाणीव ठेऊन नंतरच प्रतिनिधी नोंदणी करावी.

    २) जे प्रतिनिधी अर्थात श्रोते म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी करतात फक्त त्या प्रतिनिधींपैकी आपण कविसंमेलन/मुशायरा/कथाकथन/परिसंवाद यापैकी कुठल्याही सत्रासाठी सहभागी निवडून त्यांना आमंत्रित करत असतो. 
     

    ३) ज्याला सहभाग नोंदवायचा आहे त्याच्यासाठी आपले दार खुले असावे आणि भेदाभेद होऊ नये, कंपूबाजीचे स्वरूप येऊ नये म्हणून प्रतिनिधी नोंदणी पद्धत अत्यंत प्रभावशाली ठरली आहे. त्यामुळे नोंदणी अनिवार्य आहे.
     
    ४) काही लोक माझे नाव घेऊन टाका मी नंतर नोंदणी करतो, असे कळवतात. आपण कधी कधी त्यांना सामील करून घेतो पण त्यापैकी काही लोक नोंदणी करत नाहीत, ही फसवणूक ठरते आणि आपल्या कामातील पारदर्शकता धोक्यात येते. त्यामुळे अशी सूचना आयोजकांना कुणी करू नये. 
     
    ४) नोंदणी केलेल्या प्रतिनिधींनाच सभागृहात प्रवेश करण्याचा अधिकार असतो. निमंत्रण पत्र म्हणजे सभागृहात प्रवेश करण्याची परवानगी पास नव्हे. नोंदणी अनिवार्य आहे.
    ५) नोंदणी केलेल्या व्यक्तींना कुणी सोबत सहकारी आणायचे असतील तर त्यांची सहप्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे मात्र त्यासाठी वेगळे शुल्क अदा करणे अनिवार्य नाही. एका शुल्कात चार सहप्रतिनिधी व्यक्तींची नोंदणी होऊ शकते.
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 04/01/2023 - 21:25. वाजता प्रकाशित केले.

    *लेखनस्पर्धा-२०२२ - नियम, अटी व शर्ती*

    विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ चे आयोजन करतानाच स्पर्धेचे *नियम, अटी व शर्ती* जाहीर केलेल्या असून सर्व त्यास बांधील आहेत. पण अनेक स्पर्धक *नियम, अटी व शर्ती* वाचतच नाही त्यामुळे क्वचित प्रसंगी नको तो वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
    कृपया सर्वांनी परत एकदा *नियम, अटी व शर्ती* वाचून घ्याव्यात. नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती https://baliraja.com/node/2632 येथे उपलब्ध आहे.

    *अत्यंत महत्वाचे निवेदन - पारितोषिक वितरण*

    १) २१ आणि २२ जानेवारी २०२३ ला नियोजित १० व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
    २) विजेत्या स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
    ३) पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. स्पर्धेचा निकाल १० जानेवारी २०२३ ला घोषित होईल. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. ११/०१/२०२३ पूर्वी आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. *ज्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांचेच नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.* संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती https://baliraja.com/rep-regd येथे उपलब्ध आहे.

    सहकार्याच्या अपेक्षेत!

    - *गंगाधर मुटे*
    अध्यक्ष
    - *राजेंद्र फंड*
    स्पर्धा संयोजक
    अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
    =-=-=-

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 26/12/2023 - 18:00. वाजता प्रकाशित केले.
    महत्वाचे निवेदन
     
    संमेलन प्रतिनिधी नोंदणी ही प्रतिनिधीची उपस्थिती नोंदणी असते. प्रतिनिधी नोंदणी केलेल्या सर्वांनाच व्यासपीठावर संधी मिळू शकत नाही. ही जाणीव ठेऊन नंतरच प्रतिनिधी नोंदणी करावी.

    शेतकरी तितुका एक एक!