पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
विनोदी कविता
पहाटे पहाटे तुला जाग आली पहाटे पहाटे तुला जाग आली उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!! तुझे घोरणे ते, मला सोसवेना किती घालू कानी, बोळे ते कळेना असा राहू दे हात, माझ्या कानाशी ...!! म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला भिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!! जरा तान घे तू, ताण दे घशाला मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला? फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!! तुला जाग ना ये, मला झोप ना ये भगवंत माझा, कसा अंत पाहे अभय झोप सारी, चकनाचूर झाली ...!! गंगाधर मुटे
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.