पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तापणारा तापतो अन मजवरी संतापतो मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो
तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो
अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर अंतराला अंतराच्या अंतराने कापतो
वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो? वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?
आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 5 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.