![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एल्गार
नोटाबंदी करुन साहेब
तुमी तुमचीच केली चांदी
आमच्या जीवनात मात्र
मरेपर्यंतची मंदी....
विकासाचं गाजर दाखवून
तुमी आमाले लुटून रायले
पारतंत्र्यात असतांनाही साहेब
असे दिवस नोते हो पायले....
माणसांपेक्षा आज तुमाले
गाय महत्त्वाची वाटते
औषधाविना लेकरु मरते ना साहेब
तवा जीव थटंथटं तुटते....
भूमिपुत्रावरच जर का साहेब
आत्महत्येची वेळ येईल
तुमीच सांगा तुमाले साहेब
मंग ही धरणी पोटात कशी घील....
भूमिपुत्रांनो तुमी आता
असा एल्गार करा
स्वताः मरण्याआधी चार-पाच
भ्रष्ट नेते मारुन मरा....
एकच मागणं तुमाले साहेब
नका रचू देशाचं सरण
नाईतं कास्तकाराईच्या हातून लिवलं जाईल
तुमा सा-याईचं मरण.....
त्या बुलेट ट्रेन अन् मेट्रोले साहेब
तुमी आमच्या नजरीतून बघा
एका दिवसापूरतं तरी साहेब
तुमी शेतकरी बनून जगा....
एका दिवसापूरतं तरी साहेब
तुमी शेतकरी बनून जगा.....
श्री.अनिकेत जयंतराव देशमुख (अनु) (पाऊलखुणाकार )
(कवी, निवेदक व लेखक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
(स. शि. पं. स. हिंगोली )
©Copyright - Aniket J. Deshmukh
Email Id :-
anudesh25488@gmail.com
प्रतिक्रिया
कविता
एल्गार
अनिकेत
जबरदस्त प्रहार !अप्रतिम कविता ..
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने