नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

माझा राजा बळी

मुक्तविहारी's picture

माझा राजा बळी

बोंड-अळीला त्रासून गेला, माझा राजा बळी
बळीराजावर सदैव संकट, येते असे अवेळी

कीटकनाशक फवारणी त्याने, केली वारंवार
बोंडामधल्या लाल अळीला, करण्यासाठी ठार

हमीभाव ना मिळतो त्याच्या, शेतमालास
व्यवस्थेशी लढता लढता, लावी गळ्याला फास

आत्महत्या म्हणू कशी मी, ही तर आहे हत्या
आयोग नेमिले कितीक आणि, नेमिल्या समित्या

शासनव्यवस्था अशी कशी ही, निष्ठूर जाहली
पोटावरती मारी बळीच्या, कीव दया न आली

धान्य पिकवतो जगास देतो, कष्टतो दिनरात
बळी माझा राजा तरीही, त्याचा रिकामाच हात

- मुक्तविहारी,
क्वार्टर क्र. जुने डी ८ ,
थर्मल काॅलनी, परळी वैजनाथ - ४३१५२०.
जि. बीड.
मो. ९८६०९८५९११.
ईमेल : muktvihari@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share

प्रतिक्रिया