नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

किसान क्रांती

आशिष आ. वरघणे's picture

*किसान क्रांती*

खर्रा खाणे दारू पिणे, सोड आता पोरा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

दरसाल दर शेकडा
सावकार खातो आपला
सालभर कष्ठ करून
हिशोब घेतो तुपला

कर्जापाई बापाचा, रंगविला रे सातबारा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

बाप हाय अडाणी
म्हणून म्हणतो शिक
आमची हयात गेली
तू मागू नको भिक

आयुष्याचा खेळ गेला, वादळ वाऱ्यात सारा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

आपला माणूस कोण्ता
जरा जाणायला शिक
हायब्रीड वाण कोण्त
जाण गावराणी पिक

सालोसाल कष्ठ करून, डोळ्यातून झरल्या धारा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

दिस येईल आपला
नको फासी लावू
राज्य येईल बळीचं
नको विष पेवू

हसला पाहीजे शेतकरी, धर आता नारा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

घामाच्या दामांनी आता
भरू नको चोराचे हात
हक्कासाठी लढू सारे
विसरूया जात पात

कोटातल्या सायबाला सांग, दाखवू नको तोरा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

सरकारी धोरणं नाई खरे
गेले काळजाला चरे
आपल्याच बापाचे यांनी
खुडले पाय नाचरे

समजून घे व्यवस्था, विस्कटला अवस्थेचा गारा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा

एक दिवस आपला
पिकवू आनंदी मळा
खुप सोसल्या दोस्ता
आपल्या बापांनी कळा

उतरू आता रणांगणा, दाखवू मावळेपण सारा
किसान क्रांती पाहीजे, शेतकऱ्याच्या पोरा.

- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share

प्रतिक्रिया