नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मरणाचे धोरण

sunandasalunke's picture

मरणाचे धोरण
-------------
हवालदील बा शेतकरी, देई कुणी ना थारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा //
मातीत राबे हयातसारी
तरी सदा तो कर्जबाजारी
निसर्गावरी विसंबून तो, त्रस्त करी दुष्काळ-गारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा // १ //
काळी आई सोने पिकवी
श्रमप्रतिष्ठा लोका शिकवी
पण भाव मिळेना माला, कमाई कशिबा येई दारा ?
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा // २ //
कर्ज विळखा सावकारी
घर चालवण्या कठीणभारी
बोजा बोजा वाढत जाई, वाजे त्याचे बारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा // ३ //
लग्नाच्या त्या पोरीबाळी
सदैव अपुला घाम गाळी
बाप होता स्वर्गवासी, कोण तयांना सहारा ?
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा // ४ //
पालनपोषण रखडत जाई
शिक्षण तयांचे पुरे न होई
खपण्यासाठी माती नशिबी, सदैव झेली ऊनवारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा // ५ //
योजना ना कल्याणकारी
कर्ज माफी ना शासनदारी
मरणाचे धोरण आता, राबते शासनद्वारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा // ६ //

सुनंदा साळुंके
१७, साईक्रुपा सोसायटी,
विद्यावर्धिनी कालेजमागे,
साक्री रोड, धुळे - ४२४००१
मो. ७५८८३१६९९४
ई-मेल : sunandasalunke17@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share

प्रतिक्रिया