आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही पण;
आता शेतकर्यांच्या मदतीला नवीन संगणकीय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरजालाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागीलवर्षी पहिली आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली होती. यंदाचे आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धेचे हे दुसरे वर्ष.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१५ या कालावधीत
www.baliraja.com या संकेतस्थळावर आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ जाहिर करून यशस्वी- रित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्यांची संख्याच उणीपुरी असल्याने या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्री. कमलाकर देसले (नाशिक), श्री. मसूद पटेल (यवतमाळ), श्री. राजीव जवळे (जालना), अॅड. विशाल ठोंबरे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री. मारोतराव शिंदे (परभणी), श्री. बदीउज्जमा बिराजदार (सोलापूर), श्री. राज पठाण (बीड), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), श्री. पुष्पराज गावंडे (अकोला)
शेतीविषयक लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
|
लेखनाचा विषय : शरद जोशी
|
|
अनु
|
लेखनप्रकार
|
लेख/कवितेचे नाव |
विजेता लेखक/कवी
|
जिल्हा
|
१
|
अनुभवकथन
|
|
गीता खांडेभराड
|
जालना
|
२
|
मागोवा
|
|
सचिन मोहन चोभे
|
अहमदनगर
|
३
|
ललितलेख
|
|
विनिता माने पिसाळ
|
पुणे
|
४
|
वृत्तांतलेख
|
|
रामेश्वर अवचार
|
परभणी
|
५
|
वैचारिक लेख
|
|
गंगाधर मुटे
|
वर्धा
|
६
|
पद्यकविता
|
|
रविंद्र कामठे
|
पुणे
|
७
|
गीतरचना
|
|
अनिल सा.राऊत
|
सोलापूर
|
८
|
छंदमुक्त कविता
|
|
निलेश कवडे
|
अकोला
|
९
|
छंदोबद्ध कविता
|
|
रावसाहेब जाधव
|
नाशिक
|
स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार आणि विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!
पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
पारितोषिक वितरण :
१. २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ मध्ये नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
२. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
गंगाधर मुटे
अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
प्रतिक्रिया
अरे व्वा! निकाल जाहीर झाला.
अरे व्वा! निकाल जाहीर झाला.
मा. जोशीसाहेबांच्या हयातीत ही स्पर्धा झाली याने खूप बरे वाटले.
अभिनंदन सर्वांचे
पाने