| Attachment | Size |
|---|---|
| Aundachi sheti-270614.jpg | 64.25 KB |
| Raj-Thakre.PNG | 307.87 KB |
| Gazal sanwad.jpg | 167.15 KB |
| Friendship-day-2014.jpg | 75.16 KB |
| Chandankhede-Maruti.jpg | 111.61 KB |
| Mhatre sir dnyanshri.jpg | 533.27 KB |
| Negative Subsidy.jpg | 93.63 KB |
| Radhamohan.png | 52.51 KB |
| Buldana-Kavi-Sanmelan.png | 644.26 KB |
| Deshonnati-300115.PNG | 126.41 KB |
Main page content
Search
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User login
Who's online हजर पाहुणे
Who's new नवीन सदस्य
- 19 hours 17 minutes ago
- 19 hours 25 minutes ago
- 19 hours 36 minutes ago
- 1 month 3 weeks ago
- 2 months 1 week ago


माझी फेसबूक पोस्ट-१९ मे २०१४
गंगाधर मुटे
एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत
- गंगाधर मुटे
****
माझी फेसबूक पोस्ट-१९ मे २०१४
ही झाडे कशाची बरे?
गांजा, चरस की अफ़ूची?
जर हे खरे असेल तर...
महाराष्ट्रात आमच्या शेतकर्याच्या शेतात जर एखादे झाड आढळले तर लगेच जेलची हवा खावी लागते मात्र पंजाब, हरयाणा व जम्मूमध्ये ही झाडे पावलोपावली आढळतात. जालंधर ते अमृतसर आणि अमृतसर ते जम्मू या महामार्गाच्या दुतर्फ़ा या झाडांचे अक्षरश: जंगल आहे. एकाच देशात सर्वांना कायदा सारखाच लागू असतो, असे थोडेच आहे!
*****
माझ्या संशयखोर स्वभावानुसार मला असे जाणवते आहे की, हा विषय तसा साधासुधा नसावा. कारण माणसे सरळसोट स्वभावाची असतच नाही.
या प्रवासात मी माझ्या डोळ्याने पाहिलेल्या झाडांची संख्या लक्षात घेता या मालाची किंमत किमान ३०० कोटी रुपये एवढी आहे.
त्यावरून या तीनही राज्यातील झाडॆ काही हजार कोटीची असू शकतात. हा सर्व किंमती माल उपयोगात आणला जात नसेल असे गृहीत धरणे, संयुंक्तिक वाटत नाही.
शिवाय...
१) सिमावर्ती भागातच ही झाडे का?
२) या झाडांचे पुढे काय होते?
३) या झाडांची बेमालूम शेती नसेल कशावरून?
आणि महत्वाचे म्हणजे
४) गांजर गवत निर्मुलनाच्या धर्तीवर भांग/गांजा निर्मुलनाचे शासकिय स्तरावर प्रयत्न का होत नसावेत?
काही तरी काळेबेरे नक्कीच असू शकते...!
*****
दिनांक : ०७/०४/२०१५
महाराष्ट्रात सक्त मजुरी व अन्य राज्यात मात्र आनंदी आनंद..!
काय सुंदर आपला देश आणि त्याहुनही सुंदर कायदे....!!
********
दिनांक १९ जुलै २०१४ : काय लिहावं यार, कायबी कळत नाही. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या नावाने चालणार्या आणि 1,05,168 likes मिळालेल्या पेजवर माझी खालील कविता टाकण्यात आली आहे. कवितेखाली कवीचे नाव घालायला हवे होते. ते तर टाकले नाहीच या उलट कविचे नाव टाळण्यासाठी शेवटच्या कडव्यातील अभय हा मक्ता असलेली आता ’अभय’ मनाच्या धुंदीस या जपावे। ही ओळच गायब करून टाकली आहे! काय म्हणावे?

*****LINK
मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
- गंगाधर मुटे
-----------------
दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय
गंगाधर मुटे
तळपायाची आग मस्तकात
गंगाधर मुटे
कापूस उत्पादक शेतकर्यांचे मोन्सॅन्टोवाले सासरे लागतात
गंगाधर मुटे
जैविक शेती
vinayak kadam
तज्ज्ञ, विद्वान या शब्दांचिच किळस
गंगाधर मुटे
हमीभाव काढण्याची पद्धत
गंगाधर मुटे
शेतकरी-शेतमजूर
गंगाधर मुटे
आत्महत्या करणारे शेतकरी केवळ
गंगाधर मुटे
दोन कुत्र्यांनी आपआपसात लढण्यासारखे
गंगाधर मुटे
काल कोरडवाहू कपाशीची टोकण
गंगाधर मुटे
पावसाचे वर्तन लहरीपणाचे आणि
गंगाधर मुटे
काही सेकंदापूर्वी माझ्या
गंगाधर मुटे
"परवा अडीच वाजता पाऊस
गंगाधर मुटे
एवढ्या मोठ्या कृषिप्रधान
गंगाधर मुटे
तोट्याची शेती आणि बोलघेवडे
गंगाधर मुटे
शेती बद्दलची भूमिका
गंगाधर मुटे
शेतीविषयक धोरणे का
गंगाधर मुटे
लक्ष्मी ऐवजी दरोडेखोर आणि लुटारू
गंगाधर मुटे
सद्यस्थितीत शेतकरी शेतमालाचे
गंगाधर मुटे
जोडधंदा
गंगाधर मुटे
पाऊस जबाबदार नाही
गंगाधर मुटे
महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?
गंगाधर मुटे
उठसूठ आणि तो सुद्धा शेतकर्याने न मागताच निष्कारण बाष्कळ सल्ला देण्यासाठी काही लोक फ़ारच उताविळ असतात. सल्ल्यामध्ये तरी काही नाविन्य वगैरे तरी असावे की नाही? गेली ४० वर्ष ऐकत आल्याने आमचे कान बुजण्याची शक्यता तयार झाली आहे शिवाय हे वाक्य पुस्तकात छापू-छापू आजकाल तर प्रिंटींग मशिनला सुद्धा अजिर्ण व्हायची वेळ आली आहे.
तेच तेच घोकमपट्टी केलेले छापील पुस्तकातील छापील उतारे वाचण्याचा आणि आम्हाला ऐकवण्याचा या शहाण्यांना आणि शेतीतज्ज्ञांना ज्या दिवशी कंटाळा येईल किंवा लाज वाटायला लागेल कदाचित त्या दिवसापासून शेतीला बरे दिवस येण्याची सुरवात होऊ शकेल.
शेतीचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी जाणिवपूर्वक शेतीमालाचे भाव ठरविले जातात, त्यामुळे शेती बकाल अवस्थेकडे झुकली आहे, हे एकतर त्यांच्या गावीच नसतं किंवा ही मंडळी "मंदबुद्धी" असल्याने त्यांच्या आकलनशक्तीला झेपत तरी नसावे.
शेतीची दुर्दशा शेतकर्यांच्या "पात्रतेशी" संबंधित नसून "व्यवस्थेशी" संबंधित आहे, हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी खालील समिकरण सोडवून दाखवावे, असे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.
हे एक गणित सोडवून दाखवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....
१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर तो निव्वळ शेतीच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर तो निव्वळ रिक्षा चालवून घाम आणि श्रमाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता अन्य व्यवसायात वापरली तर तो दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर तो अगदी लाचलुचपत न घेताही प्रामाणिकपणे दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर तो निव्वळ राजकारणाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?
महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?
मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते; त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव आम्हाला सांगावा, इतरांचा अनुभव आम्हाला सांगण्याचा कोडगेपणा अजिबात करू नये.
वस्तुत: विद्वत्ता/लायकी/पात्रतेच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे हो भाऊसाहेब......!
- गंगाधर मुटे -------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकर्यांची हजामत
गंगाधर मुटे
तक्रार कोणाकडे नोंदवू ?
गंगाधर मुटे
हवा’मान’ खात्याचे वर्त’मान’
गंगाधर मुटे
गेल्या ४-५ दिवसापासून पावसाची कधी रिपरिप तर कधी सततधार सुरू आहे. हवा’मान’ खात्याचे सारे अंदाज खोटे ठरवीत पावसाने हवा'मान' खात्याला 'मान' खाली घालावयास भाग पाडलेले आहे. तशीही हवा’मान’ खात्याची ’मान’ फ़क्त ताप’मान’ वर्तवण्यापुरतीच ताठ असते. पर्जन्य’मान’ वर्तवताना त्यांचे अनु’मान’ नेहमीच ’मान’ पायाखाली दुमडून उताणे झोपत असते. त्यामुळे शेतकर्यांनी स्वत:च्या द’मानं’च घेतलेलं बरं! हवा’मान’ खात्यावर विसंबून आणि आपली ’मान’ हवा’मान’ खात्याच्या मांडीवर ठेवून शेतकर्यांनी आपला वर्त’मान’ बिघडवून घेण्यात काहीही अर्थ दिसत नाही.
बाहेर पाऊस पडत आहे आणि मी आतमध्ये बसून पेपर चाळत आहे. ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ या संबंधित एकही बातमी दिसत नाही. कुत्री केकाटण्याचे जसे उत्तरा नक्षत्र असते तसेच ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ सारखे शब्द उच्चारून केकाटणार्यांचे रोहिणी नक्षत्र असते. कधी-कधी पावसाचे आगमन लांबलेच तर ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ च्या नावाने केकाटणेही थोडेफ़ार लांबत असते. मात्र एकदाचा पाऊस कोसळला की गाढवाच्या सिंगाप्रमाणे हे केकाटणारेही प्रसिद्धीमाध्यमातून गायब होऊन जातात.
पावसाचे आगमन लांबले तर त्याला पर्यायी काही उपाय सांगता आलेत तर ते सांगणे उपयोगाचे ठरू शकते पण हे तज्ज्ञ पर्याय सांगण्याऐवजी पाऊस लांबण्याची कारणमिमांसा व्यक्त करण्यात धन्यता मानतात. ज्याचा शेतीला आणि शेतकर्याला कवडीचाही उपयोग नसतो.
पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, यावर शेतीचे पीकपाणी अवलंबून असते, हे साधेसुधे कोडे देखील आमच्या तज्ज्ञांना अजूनपर्यंत उमगलेले नाहीये. यांची भाषा अजूनही पावसाची वार्षिक सरासरी याभवतीच पिंगा घालत आहे. एखाद्या वर्षी पावसाची सरासरी काय होती, ती १००% होती, १५०% होती कि ५०% टक्केच होती यावर पीकपाण्याची-उत्पादनाची शक्यता ठरत नाही. एखादेवर्षी जर २०% किंवा ३०% च पाऊस पडला; पण तो जर थोडा-थोडा आणि नियमित कालावधीत पडत राहिला तरी कोरडवाहू शेतीमध्ये भरघोस उत्पादन येऊ शकते. याऊलट एखादेवर्षी १००% सरासरी पाऊस पडला पण कमी दिवसात/कमी कालावधीत मुसळधार पडला तर कोरडा किंवा ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येऊ शकते आणि नेमके एवढे साधे गमक सुद्धा अजूनपर्यंत हवामान तज्ज्ञांना गवसायचे बाकीच आहे. मुलभूत ज्ञानाचा पायाच जर अव्यवहार्यतेवर आधारला असेल तर कसले बोडक्याचे संशोधन करणार? अशा संशोधनाची आणि सल्याची उपयोगीता तरी काय असणार आहे? आणि म्हणूनच
हवामान तज्ज्ञ शेतीच्या दृष्टीने शोकेसचे जिन्नस झाले आहे, असे वाक्य उच्चारले तर ते चुकीचे ठरणार नाही.
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१४ जुलै २०१४
गंगाधर मुटे
१६ जुलै २०१४
गंगाधर मुटे
२० जुलै २०१४
गंगाधर मुटे
२५ जुलै २०१४
गंगाधर मुटे
१ ऑगष्ट २०१४
गंगाधर मुटे
३ ऑगष्ट २०१४
गंगाधर मुटे
१७ ऑगष्ट २०१४
गंगाधर मुटे
१८ ऑगष्ट २०१४
गंगाधर मुटे
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या
गंगाधर मुटे
०७-११-२०१४
गंगाधर मुटे
०९-११-२-१४
गंगाधर मुटे
१७-११-२०१४
गंगाधर मुटे
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2226760470681962
दि. ११-११-२०१८
गंगाधर मुटे साहेब,
हेमंत साळुंके
हे खरे आहे
admin
२४/०८/२०१४
admin
९-११-२०१४
गंगाधर मुटे
१७-११-१४
गंगाधर मुटे
०९/१२/२०१२४
गंगाधर मुटे
२०-१२-२०१४
गंगाधर मुटे
०४-०१-२०१५
admin
पंढरपूर : मंगळवेढ्यात कृषीक्रांती फार्मर्स ग्रुपने नंदनवन फ़ुलवल्याची व ढोबळी मिर्ची आणि काकडीचं पीक घेतल्याची एबीपी माझाची बातमी लक्षवेधी जरुर होऊ शकते पण महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून दिला असल्याची भाषा ही चक्क दिशाभूल आहे.
जोपर्यंत गहू, ज्वारी, धान, तूर, सोयाबिन, उडीद, कापूस वगैरे पीक घेऊन कोणी सर्व खर्च वजा जाता लाखो/करोडो रुपये निव्वळ नफ़ा मिळवून दाखवत नाही तोपर्यंत नवा आदर्श घातल्याच्या गप्पा ह्या केवळ वल्गनाच ठरतील. ढोबळी मिर्ची आणि काकडी हे काही देशभरातील बहुसंख्य शेतकर्यांच पीक नाहीये की इतरांनी असल्या आदर्शाचे अनुकरण करावे.
समजा देशभरात अन्य सर्व पिकाऐवजी पूर्ण भारतभर काकडीचेच पीक घेतले तर काय होईल? मग एवढी काकडी कोण विकत घेणार? एवढ्या काकडीचे करणार तरी काय? आणि मग आयुष्यभर भात-पोळी ऐवजी सारेच नुसतीच काकडी व ढोबळी मिर्ची खाणार काय? शिवाय या आदर्शाचे अनुकरण करायचे म्हणून किंवा भरमसाठ नफ़ा मिळतो असे गृहित धरून देशभरात काकडी व ढोबळी मिर्चीची लागवड झाली तर मग भाव तरी मिळतील का? की समुद्रात नेऊन फ़ेकून द्यावी लागेल? मागणी पुरवठ्याचा सिद्धांताला असली आदर्शाची भाषा तरी कळते काय?
कसला आदर्श नी कसलं काय!
माझा आक्षेप बातमीला नाही फ़क्त आदर्श या शब्दाला आहे.
- गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------
http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/01/03/article467214.ece/Mangalvedha-success-story
आला थंडीचा महीना, झटपट शेकोटी
admin
आला थंडीचा महीना, झटपट शेकोटी पटवा! (06/01/2015) — at Arvi Chhoti.
आदरणीय म्हात्रे सरांना
admin
आदरणीय म्हात्रे सरांना ज्ञानश्री पुरस्कार
पुरस्कार वितरण दि.11/01/2015
सरांचे मनपूर्वक अभिनंदन...!
"तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला!"
admin
"तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला!"
च्यायला! गोड बोलण्याच्या बदल्यात फ़ुकटात वाटायला तीळ आणि गूळच म्हणजे शेतमालच सापडतो व्हय?
डिझेल, पेट्रोल, रॉकेल, टीव्ही, कॅमेरा, मोबाईल, चप्पल, शूज, टेबल, पंखा, घड्याळ, एसी, कूलर, बाईक, पुस्तके, सिलिंडर या पैकी संक्रांतीनिमित्त कुणीतरी फ़ुकटात वाटायला घेऊन या हो आमच्याकडे. बदल्यात आम्ही पण तुमच्याशी गोडगोड बोलू. :)
मी ठरवलंय. संक्रातीला तीळगूळ घ्यायचा नाही आणि संक्रांती संपल्याशिवाय गोड तर अजिबातच बोलायचं नाही!!
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१३-१२-२०१४
गंगाधर मुटे
१२-०१-२०१५
गंगाधर मुटे
१३-०१-२०१५
गंगाधर मुटे
http://www.youtube.com/attribution_link?a=XJ3k9OVY7Yw&u=%2Fwatch%3Fv%3D…
अत्यंत दिशाभूल करणारी बातमी.
इतका गणीताचा लवलेश नसलेला बेहिशेबी मनुश्य कदाचित हजार वर्षापूर्वी सुद्धा अस्तित्वात नसेल.
जंगली अवस्थेतला किंवा आदिमानवच इतका निर्बुद्ध बेहिशेबी असू शकतो.
म्हणे ८ एकराचा उत्पादन खर्च पन्नास हजार फ़क्त आणि साडेचार लाखाचा निव्वळ नफ़ा...!
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते यालाच!!
१४-०१-२०१५
गंगाधर मुटे
"तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला!"
च्यायला! गोड बोलण्याच्या बदल्यात फ़ुकटात वाटायला तीळ आणि गूळच म्हणजे शेतमालच सापडतो व्हय?
डिझेल, पेट्रोल, रॉकेल, टीव्ही, कॅमेरा, मोबाईल, चप्पल, शूज, टेबल, पंखा, घड्याळ, एसी, कूलर, बाईक, पुस्तके, सिलिंडर या पैकी संक्रांतीनिमित्त कुणीतरी फ़ुकटात वाटायला घेऊन या हो आमच्याकडे. बदल्यात आम्ही पण तुमच्याशी गोडगोड बोलू. :)
मी ठरवलंय. संक्रातीला तीळगूळ घ्यायचा नाही आणि संक्रांती संपल्याशिवाय गोड तर अजिबातच बोलायचं नाही!!
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------------------
साहित्यिकांचे कळप?
गंगाधर मुटे
आज कवी संमेलनात भाग घेण्यासाठी बुलडाण्याला जात आहे.
वर्धेत गझलरंगचा गझलमुशायरा कार्यक्रम होतो आहे, हे आजच कळले. आधी कळले असते तर मी बुलडाण्याच्या कवी संमेलनाचे निमंत्रण स्विकारले नसते. इथेच वर्धेला गझल ऐकण्याचा आनंद लुटता आला असता. काव्याचा आनंद घेण्यासाठी ५०० किमी जायची गरज नव्हती.
आता पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे वर्धेत उपस्थित राहून दिग्गज गझलकारांच्या गझलेचा आनंद घेता येणार नाही याची खंत वाटत आहे.
१७ जानेवारी हा फ़ारच भाग्यवान दिवस दिसतो. या दिवसाला असे काय ऐतिहासिक महत्व आहे माहीत नाही पण आज एकाच दिवशी जालना, बुलढाना, उमरखेड येथे साहित्य संमेलने तर डोंबीवली आणि वर्धा येथे गझलमुशायरा आहे. कदाचित ही यादी यापेक्षाही मोठी असू शकेल.
साहित्यिकांना फ़ारच चांगले सोन्याचे दिवस येत आहे असे दिसते.
मात्र यातून मराठी साहित्याला चांगले दिवस येतील की त्याऐवजी साहित्यिकांच्या कळपांच्या संख्येत वाढ होईल, हे सांगणे कठीण आहे. मी या क्षेत्रात नवीन आहे. अजून अभ्यास व्हायचा आहे व अनुभव यायचा आहे, त्यामुळे सध्यातरी माझ्यासाठी या प्रकारावर भाष्य करणे कठीण आहे.
२०-०१-२०१५
गंगाधर मुटे
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू होत असल्याची बातमी वेदनादायी आहे. वर्ध्याच्या पाठोपाठ आता चंद्रपूरचा नंबर लागला आहे.
हा निर्णय अत्यंत अविवेकी आणि भित्रेपणाचा आहे. मी शासनाचा निषेधच नव्हे तर धिक्कार करत आहे......!!
वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेनेच असे कोणते पाप केले आहे की केवळ त्यांनाच ही सजा दिली जात आहे? मी कधीही मद्यपान करत नाही पण इतरांची/माझ्या शेजार्यांची निष्कारण होत असलेली गळचेपी बघून मी असूरी आनंद मिळवू शकत नाही.
दारू जर वाईट असेल तर पूर्ण देशात दारुबंदी लागू करण्याचे धाडस दाखवावे. कोणतेही शासन भित्रेच असते आणि संपूर्ण देशात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्याची कोणत्याच शासनाची ऐपत नसते म्हणून असे बौध्दीक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे निर्णय शासनाकडून घेतले जातात,
देशात शासनाकडून सर्वांना वागणूक समानच मिळाली पाहिजे. केवळ त्या जिल्ह्यात थोर पुरुष जन्माला आले किंवा वास्तव्य होते, या कारणासाठी त्या जिल्ह्यापुरता निर्णय घेण्याचे काहीही औचित्य तर नाहीच उलट त्या महापुरुषांना संकुचित भौगोलिक प्रदेशात बंदिस्त करून ठेवण्यासारखे आहे.
ज्यांना स्वत: दारु पिणे आणि दुसरा पितांना पाहणे जर आवडत नसेल तर पूर्ण देशात दारुबंदी करण्याची त्यांनी मागणी केली पाहिजे. पण जर अशा दारुबंदी समर्थकांची दारुबंदीची भाषा जर केवळ विशिष्ट भौगोलिक प्रदेशाकरिता असेल तर अशा सर्व "पोटदुख्या" व "जळकुकड्यां"साठी एक वेगळा "दारुमुक्त" जिल्हा निर्माण केला जावा आणि त्यांचे त्या जिल्ह्यात सरकारी खर्चाने सन्मानजनक स्थलांतरण व पुनर्वसन केले जावे, अशी मी एक नवी मागणी करत आहे. ;)
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२३-०१-२०१५
गंगाधर मुटे
१९८० पासून शेतीक्शेत्रात काही अत्यंत क्रांतीकारी बदल झाले आहेत. काही बाबतीत उलटापालट झाली आहे.
उदा.
भारतात मनुष्य
पुरुषांमध्ये सर्वात जास्त कष्ट करणारा शेतकरी पुरुष
महिलांमध्ये सर्वात जास्त कष्ट करणारी शेतकरी महिला
हेच उरले आहेत.
तर
प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट वाट्यास येणारा शेतीतला बैल हाच प्राणी आहे.
अनेक कारणामुळे इतरांचे कष्ट कमी झाले आहेत.
हे खरे आहे का? तुम्हाला काय वाटते?
२४-०१-२०१५
गंगाधर मुटे
प्राण्यामध्ये जास्त कष्ट करतो बैल
अन्न पिकवतो बैल
मरमरमरतो बैल
आणि
कौतुक व पूजा होते गाईची
.
.
.
उलटी गंगा वाहे, पूर आकाशी आला
एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला
असे संत एकनाथ महाराजांनी भारुडात भविष्यकथन करून ठेवले आहे.
---------------------------------------------- २२/०२/२०१५ ची फेसबूक पोस्ट वर्ल्ड कप लोणच्या सारखाच असतो. माणसाची पहिली भूक अन्नाची असते. ज्यांच्या आयुष्यात अन्नाची भ्रांत हा शब्दच नसतो व अन्नाची समस्या ही समस्याच राहिलेली नसते तेव्हा अशा माणसांना अन्नाव्यतिरिक्त अनेक तर्हेच्या भूका लागायला लागतात. मग स्वत:चे अन्य चोचले पुर्ण करून घेताना वर्ल्ड कपचा देखील लोणच्या सारखाच उपयोग होतो. अन्नाची अजिबात भ्रांत नसलेले चिक्कार लोक ग्रामिण भागात सुद्धा आहे. मी गेल्या ३० वर्षापासून क्रिकेट पाहतच आहे. हा खेळ माझ्या आवडीचा आहे. ज्यांची अन्नाची समस्या सुटलेली नाही ते कोणताच खेळ पाहात नाहीत, हे दुर्दैव आहे. मी खेळाचा विरोधक नाही, समर्थकच आहे. पण सामाजिक वास्तव आहेच तसे त्याला पर्याय नाही. खेळाने उर्जा मिळते. खेळ बघण्याने उत्साह येतो व आनंद मिळतो. पण ही उर्जा फ़क्त काही टक्के लोकांच्याच वाट्याला येते, ही दु:खद बाब आहे. सर्वांची म्हणजे १०० टक्के लोकांची अन्नाची भ्रांत मिटावी व तमाम जनतेला खेळातून उर्जा मिळवण्याइतपत उसंत मिळावी, अशी अपेक्षा आहे. ----------------------------------- ०६/०३/२०१५ ची फेसबूक पोस्ट हिरव्यांना हिरव्या रंगाच्या निळ्यांना निळ्या रंगाच्या भगव्यांना भगव्या रंगाच्या गुलाबी हृदयांना गुलाबी रंगाच्या महाभयंकर शुभेच्छा.!! * * * बाकी उरलेल्यांना तिरंगी व सप्तरंगी मनपूर्वक शुभेच्छा..!! - गंगाधर मुटे ---------------------------------------- बुरा ना मानो होली है! ----------------------------------------ते या संदर्भात सुद्धा लागू पडते काय हो! :)
३०-०१-२०१५
गंगाधर मुटे
विदर्भ राज्य आंदोलन समितीची जनजागरण यात्रा
०८/०३/२०१५
गंगाधर मुटे
देशोन्नती-०९-०३-२०१५
गंगाधर मुटे
३१/०३/२०१५
गंगाधर मुटे
१२/०३/२०१५
गंगाधर मुटे
१५/०३/२०१५
गंगाधर मुटे
०२/०४/२०१५
गंगाधर मुटे
०४/०४/२०१५
गंगाधर मुटे
०४/०४/२०१५
गंगाधर मुटे
०५/०४/२०१५
गंगाधर मुटे
११/०४/२०१५
गंगाधर मुटे
२३/०४/२०१५
गंगाधर मुटे
८ मे २०१५
admin
नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा.
गंगाधर मुटे
१३-०५-२०१५
गंगाधर मुटे
१६-०५-२०१५
गंगाधर मुटे
१९-०५-२०१५
गंगाधर मुटे
२२-०५-२०१५
गंगाधर मुटे
२४-०५-२०१५
गंगाधर मुटे
25/05/2015
गंगाधर मुटे
सकाळ - २८/०५/२०१५
गंगाधर मुटे
३०/०५/२०१५
गंगाधर मुटे
०५/०६/२०१५
गंगाधर मुटे
२४/०८/२०१५
गंगाधर मुटे
२६/०८/२०१५
गंगाधर मुटे
१५/०९/२०१५
गंगाधर मुटे
१४/०९/२०१५
गंगाधर मुटे
१४/०९/२०१५
गंगाधर मुटे
दि. २१/१०/२०१५
admin
October 23, 2015
गंगाधर मुटे
October 24, 2015 · Pune ·
गंगाधर मुटे
October 26, 2015
गंगाधर मुटे
November 1, 2015
गंगाधर मुटे
November 5, 2015
गंगाधर मुटे
November 12, 2015
गंगाधर मुटे
November 14, 2015
गंगाधर मुटे
December 5, 2015
गंगाधर मुटे
December 27, 2015
गंगाधर मुटे
December 28, 2015
गंगाधर मुटे
December 31, 2015
गंगाधर मुटे
April 9, 2016
गंगाधर मुटे
April 11, 2016
गंगाधर मुटे
पुण्यनगरी ११/०४/२०१६
गंगाधर मुटे
दिनांक : १४/०४/२०१६
गंगाधर मुटे
दिनांक : १४/०४/२०१६
गंगाधर मुटे
दिनांक : १९/०४/२०१६
गंगाधर मुटे
दिनांक : २२/०४/२०१६
गंगाधर मुटे
२५-०४-२०१६
गंगाधर मुटे
२७-०४-२०१६
गंगाधर मुटे
११/०७/२०१६
गंगाधर मुटे
July 12, 2014
गंगाधर मुटे
July 12, 2016
गंगाधर मुटे
August 01, 2016
गंगाधर मुटे
August 01, 2016
गंगाधर मुटे
August 15, 2016
गंगाधर मुटे
September 10, 2016
गंगाधर मुटे
November 11, 2016
गंगाधर मुटे
November 14, 2016
गंगाधर मुटे
16-11-2016
गंगाधर मुटे
चलन तुटवड्यामुळे शेतकरी हैराण
गंगाधर मुटे
आयातीवर निर्बंध
गंगाधर मुटे
ऊत्पादन खर्च म्हणजे काय?
गंगाधर मुटे
३१/१२/२०१५
गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
https://www.facebook.com/photo.php?fbid=1150917248266295&set=a.37615558…
दुसरे अभंग साहित्य संमेलन
गंगाधर मुटे
https://www.facebook.com/photo.php?fbid=1410543055637045&set=a.14105369…
मराठी गझलेचा जागतिक संचार
गंगाधर मुटे
https://www.facebook.com/photo.php?fbid=1457753507582666&set=a.14105369…
अध्यक्षीय मंडळाची बैठक
गंगाधर मुटे
https://www.facebook.com/sharadjoshi.in/photos/a.510330199061169/131858…
November 22, 2017 ·
गंगाधर मुटे
November 12, 2017 ·
गंगाधर मुटे
November 11, 2017 ·
गंगाधर मुटे
November 9, 2017 ·
गंगाधर मुटे
November 8, 2017 ·
गंगाधर मुटे
November 7, 2017
गंगाधर मुटे
November 1, 2017
गंगाधर मुटे
October 31, 2017
गंगाधर मुटे
October 24, 2017
गंगाधर मुटे
September 23, 2017
गंगाधर मुटे
September 10, 2017
गंगाधर मुटे
September 9, 2017
गंगाधर मुटे
September 7, 2017
गंगाधर मुटे
काल एक मित्र मला म्हणाला की,
गंगाधर मुटे
०६-११-२०२०
गंगाधर मुटे
तोट्याच्या शेतीला विमा लागू
गंगाधर मुटे
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0jnjkqu3sCNs69E7uUebp…
१०० ना ओरबाडून १० ना मलम
गंगाधर मुटे
#शुभरात्री_लोक्सहो
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid02TcjRLS1dgC5URYd8iDD…
शेतकरी बळीराजा असल्याने
गंगाधर मुटे
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0o3EgjsvNm7K8DvbzQtAS…
शेती हा असा एक रोमहर्षक खेळ
गंगाधर मुटे
"माझ्या बाजूने लढा" असे
गंगाधर मुटे
फार्मर्स प्रोडूसर कंपनी ही
गंगाधर मुटे
हा विचार कुणाकुणाला पटतोय
गंगाधर मुटे
"मेंदूने विचार करणारे महात्म्याचा पराभव करतात तर हृदयाने विचार करणारे महात्म्याला कोंदणात सजवतात"
- गंगाधर मुटे
फेसबुक लिंक
मी शेतकरी संघटनेत का आलो? ABP
admin
https://youtu.be/gye5Nyh-pks
मित्र मला म्हणाला "माटावेल
गंगाधर मुटे
35 वर्षानंतर आज अचानक व. पु.
admin
शेतकऱ्यांच्या बाजूने उभे
गंगाधर मुटे
फेसबुक लिंक
शहजादे, पप्पू, फेकू, पनौती
गंगाधर मुटे
हिंदूंचा पक्ष भाजप व अन्य
गंगाधर मुटे
#शुभरात्री_लोक्सहो
फेसबुक लिंक
नाही निवडता आला कुणाला,
गंगाधर मुटे
पाटलांची पाटीलकी तमाशामुळे
गंगाधर मुटे
महागडी, ब्रँडेड, इम्पोर्टेड
admin
नवरा आणि बायको दोघेही अपघातात
Andi2702
माझ्या नावाने फेक खाते कोणी
गंगाधर मुटे
*फार्मर्स प्रोडूसर कंपनी ही
गंगाधर मुटे
आरक्षण हवे की नको?
गंगाधर मुटे
1) काही लोकांच्या मते भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्याने आता आरक्षण पुढे ठेवण्याची गरज नाही ते रद्द केले पाहिजे असे त्यांचे मत आहे पण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण या 75 वर्षात मागासले होते त्यांचा मागासपणा दूर व्हायला हवा होता पण तसे न होता याउलट मागासले होते ते आणखी मागास झाले मग आरक्षण नको हा मुद्दा कसा टिकणार? स्वातंत्र्य पूर्वी जे मागासले होते, 75 वर्षात स्वातंत्र्यानंतर ते इतरांच्या बरोबरीने आर्थिक पायावर उभे राहायला हवे होते तेच झाले नाही तर.... 75 वर्षे काय आणि 750 वर्षे काय, वर्षाचा हिशोब काय कामाचा? 2) आरक्षण रद्द करा याचा अर्थ नोकरीच्या 100 टक्के जागा मोकळ्या करून त्या आमच्यासाठी 100 टक्के मोकळ्या करा, असे म्हणणे म्हणजे आडपडद्याने आरक्षण मागणेच आहे. :DD आरक्षण रद्द करून 100 टक्के जागा मोकळ्या झाल्या की आम्हाला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील आणि आम्ही जास्तीत जास्त संधीचा फायदा घेऊ शकू असा त्याचा आडपडद्याने अर्थ आहे. म्हणजे आरक्षण नको म्हणणे हे सुद्धा आमच्यासाठी सर्व जागा आरक्षित करा असे म्हणण्यासारखे आहे. उदा. : बापाच्या हाती दहा चॉकलेट असतील आणि त्यातील काही चॉकलेट बापाने शेजाऱ्याच्या लेकराला द्यायचे ठरवले तर त्याचा मुलगा म्हणतोय की शेजाऱ्याच्या पोराला अजिबात देऊ नको. त्याला देऊ नको याचा अर्थ सगळे चॉकलेट माझ्यासाठीच राखून ठेव, सर्व चॉकलेट मी एकटाच खाईल... हा त्याचा अर्थ असतो. निष्कर्ष : इतरांना देऊ नको याचा अर्थ स्वतःसाठी आरक्षण मागणे असाच असतो. ज्यांना आरक्षण नकोच त्यांना आरक्षण असले काय आणि आरक्षण नसले काय, फरक पडायलाच नको, त्यांनी यात मुंडके खूपसायची अजिबात गरज उरत नाही. :D माझी भूमिका स्पष्ट आहे. मी आरक्षणाचा विरोधही करत नाही आणि समर्थनही करत नाही. कारण केवळ अर्ध्या भाकरीच्या तुकड्यासाठी 99 टक्के लोकांनी कुत्र्यासारखे भांडणे.... या पलीकडे याला काही अर्थ नाही. आरक्षण आणि नोकरीमुळे केवळ 1 - 2 टक्के लोकांचाच रोजीरोटीचा प्रश्न सुटू शकतो. बाकी कष्टकरी जनतेच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधारच शिल्लक राहणार आहे. - गंगाधर मुटे
३ ग्रॅम तीळगुळासाठी गोड गोड
गंगाधर मुटे
LINK
भांडणात सिनेमातल्या स्त्रिया
गंगाधर मुटे
#शुभरात्री_लोक्सहो
LINK
15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला
गंगाधर मुटे
Facebook Link
प्रजेची सत्ता आणू
गंगाधर मुटे
मोदींचे कौतुक किंवा विरोध
गंगाधर मुटे
देशाला तुमची भयानक गरज आहे. :DD :DD :D
#शुभरात्री_लोक्सहो
Facebook Link
"माझ्या बाजूने लढा" असे
गंगाधर मुटे
Facebook Link
व्हॉट्सॲपवर लोक एकमेकांना
गंगाधर मुटे
काही साहित्यिक स्वतःचं कौतुक
गंगाधर मुटे
फेसबुक लिंक
https://www.youtube.com/live
गंगाधर मुटे
शेतमाल म्हंजी हपापाचा माल
गंगाधर मुटे
MSP नक्को, घामाचे दाम हवे! #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
फेसबुक लिंक
काँग्रेसने रामदेवबाबाला सलवार
गंगाधर मुटे
फेसबुक लिंक
MSP ऐवजी उत्पादन खर्चावर भाव
गंगाधर मुटे
फेसबुक लींक
४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी
गंगाधर मुटे
प्रास्ताविक भाषण
चौथ्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील माझ्या भाषणाची चित्रफीत बघितली. स्वाभाविकपणे स्वतःच्या त्रुटी स्वतःला लक्षात यायला लागतात. त्या भाषणात मी उपस्थित केलेले मुद्दे किती लोकांना कळले असतील, देवच जाणे! कामाच्या धबडग्यात चिंतनाला अथवा पूर्वतयारीला वेळ न मिळाल्याने उभं राहिल्यानंतर जे सुचले ते बोललो. पण मर्यादित वेळेमुळे व वेळेचे बंधन पाळण्यामुळे बहुतांश मुद्दे अत्यंत त्रोटकपणे आलेले आहेत. एकेक मुद्दा सविस्तर घ्यायचा म्हटले तर त्या भाषणाला किमान एक तास तरी वेळ हवा होता. मी आयोजक किंवा सर्वेसर्वा असलो तरी प्रास्ताविक करणाऱ्याने किती वेळ बोलावे, याचे मला भान होते. अध्यक्षांच्या भाषणापेक्षा प्रस्ताविकच जास्त लांबीचे झाले तर ते "जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा" या वर्गवारीत तर जातेच पण चेष्टेचा विषयही होत असते. पण मी मांडलेले काही मुद्दे शेतकरी साहित्य चळवळीच्या दृष्टीने महत्वाचे होते. पण मुद्दे नवीन होते आणि मुद्याचा विस्तार न केल्याने त्यांचे अत्यंत त्रोटकपणे प्रकटीकरण झाले. त्यामुळे ते किती लोकांना कळले असतील,असा स्वाभाविक प्रश्न मला पडलेला आहे. शेतकरी साहित्य चळवळीची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल याविषयी भाष्य होणेही अत्यंत महत्वाचे आहे. ही भूमिका आयोजकालाच पार पडायची असेल तर पुरेसा वेळ मिळणेही आवश्यक आहे. भविष्यात यातून मार्ग कसा काढायचा, प्रास्ताविकाऐवजी बीजभाषण करायचे कि काय, हा विचार करावा लागणार आहे. - गंगाधर मुटे https://www.baliraja.com/node/1481
फेसबुक लिंक
भविष्य उज्वल नसलेला भविष्यकाळ
गंगाधर मुटे
दिल कहे दिलदार मिला,
गंगाधर मुटे
वर्धा जिल्ह्यात प्रचंड गारपीट
गंगाधर मुटे
विचारधारा व सिद्धांत
गंगाधर मुटे
राजकारणजीवी, भ्रष्टाचारजीवी,
गंगाधर मुटे
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन
गंगाधर मुटे
FaceBook Link
स्टार माझा या लोकप्रिय मराठी
गंगाधर मुटे
Facebook Link
एकट-दुकट व्यक्तीवर Love
गंगाधर मुटे
एकट-दुकट व्यक्तीवर Love
गंगाधर मुटे
अनुभव समृद्धीची खोली वाढवायची
गंगाधर मुटे
दिल्लीची राजधानी नागपूरला
गंगाधर मुटे
चक्रीभुंग्याने सोयाबीन नेलं,
गंगाधर मुटे
अन्न व वस्त्र स्वस्तात मिळत
गंगाधर मुटे
"शेतकरी नपुसक असल्याने
गंगाधर मुटे
अंधश्रद्धा या शब्दाची धड
गंगाधर मुटे
प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच
गंगाधर मुटे
*ज्याचा पक्ष, जात आणि धर्म
गंगाधर मुटे
*"पिढ्यान्पिढ्यांच्या
गंगाधर मुटे
*शेतीच्या शोषकांना पोषक लेखन
गंगाधर मुटे
*"धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने एका
गंगाधर मुटे
मी बोट दाखवत Bus Bay (बस बे)
गंगाधर मुटे
मी कुणाच्या बापाच्या जागेवर उभा आहे का?
म्हणून मराठीत "बस स्टॅन्ड" असेच म्हणत चला रे ब्वॉ. नसत्या आफती नकोत. :D :DD
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
Facebook Link
22 February 2021
गंगाधर मुटे
Facebook Link
एक पोरगी वावरामधी दिसली होती,
गंगाधर मुटे
तमाशेवाली बघून हृदयात
गंगाधर मुटे
22 February 2020
गंगाधर मुटे
22 February 2015
गंगाधर मुटे
शेतकरी साहित्य चळवळीची
गंगाधर मुटे
आणि त्यावर चर्चा घडवून आणत आहे. आपण फेसबुकवर असाल तर सहभागी व्हायला हरकत नाही. https://www.facebook.com/gangadharmute?mibextid=ZbWKwL
१) "पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन!
लिंक
२) शेतीच्या शोषकांना पोषक
गंगाधर मुटे
२) शेतीच्या शोषकांना पोषक लेखन करणारे शेतीसाहित्यिक असू शकत नाही... जरी त्यांच्या नावाने सातबारा असेल तरीही!
#शुभरात्री_लोक्सहो३) ज्याचा पक्ष, जात आणि धर्म
गंगाधर मुटे
३) ज्याचा पक्ष, जात आणि धर्म शेती हाच असतो तोच फक्त शेतीसाहित्यिक असतो... बाकी सर्व शेतीच्या शोषकांना पोषकच!
#शुभरात्री_लोक्सहो४) धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने
गंगाधर मुटे
४) धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने एका हातात नांगर व दुसऱ्या हातात लेखणी धरावी यासाठी म. शे. साहित्य संमेलनाचे प्रयोजन!
#शुभरात्री_लोक्सहो५) कोणत्या स्वभावाच्या
गंगाधर मुटे
५) कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना आसपास फिरकू द्यायचे नाही हे शेतकरी साहित्य चळवळ आधी ठरवते. नंतर सहकारी जोडते.
#शुभरात्री_लोक्सहो६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि
गंगाधर मुटे
६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि शास्त्र
शेतमालाच्या भावाच्या मुद्द्यास पद्धतशीरपणे बगल देऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपायोजना, नाना तऱ्हेच्या शेतीपद्धती, ज्ञान-विज्ञान, पौराणिक-आधुनिक, सेंद्रिय-जैविक-रासायनिक, शाश्वत-अशाश्वत, किटनाशक-गोमूत्र, एमएसपी-एमआरपी, अशा एकापेक्षा एक सरस व आकर्षक भुलभुलैय्यात गुंतवून.... अगडबंब यंत्र-मंत्र-तंत्र वगैरे अंगीकारायला सांगण्याचे नवनवे खुळखुळे वापरायचे आणि शेतकऱ्यांना खेळवत व झुलवत ठेवून पद्धतशीरपणे वर्षानुवर्षे शेतमाल स्वस्तात लुटत राहायचे..... हे शेतीच्या लुटारुंचे शास्त्र आणि शस्त्र आहे... याची अर्थशास्त्रीय पायावर तर्कशुद्ध जाणीव साहित्यिकांना करून देण्यासाठी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे प्रयोजन आहे. #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #शेतीचे_अनर्थशास्त्रमाझ्या साहित्यविषयक पोस्टवर
गंगाधर मुटे
#शुभरात्री_लोक्सहो
देवीदेवतांमुळे "भारत" गरीब
गंगाधर मुटे
तस्कर, अफसर, गुंडा, मवाली,
गंगाधर मुटे
हो आहे ना आपल्याकडे क्वालिटी
गंगाधर मुटे
मोठ्या वृक्षाखाली वाढ खुंटते
गंगाधर मुटे
गंगाधर मुटे
सेंद्रियशेती/निसर्गशेती
गंगाधर मुटे
सकाळी निळसर होतास तू, दुपारी
गंगाधर मुटे
20/09/2024
गंगाधर मुटे
दिसण्यात कार्य अपुले, दिसतेय
गंगाधर मुटे
जे जे दिसेल ते ते, सारेच
गंगाधर मुटे
22/092024
गंगाधर मुटे
23/09/2024
गंगाधर मुटे
25/09/2024
गंगाधर मुटे
26/09/2024
गंगाधर मुटे
च्यायला, देवाचं नाव घेतलं तरी
गंगाधर मुटे
29/09/2024
गंगाधर मुटे
30/09/2024
गंगाधर मुटे
01/10/2024
गंगाधर मुटे
30/00/2024
गंगाधर मुटे
02/10/2024
गंगाधर मुटे
29/05/2023
गंगाधर मुटे
29/05/2018
गंगाधर मुटे