गझल
पेटतो वैशाख वणवा एक ठिणगी लागते
जिंकतो संघर्ष मित्रा जिद्द हृदयी लागते
माणसांनी पाहिजे तो रंग देवाला दिला
देव म्हणतो का? पताका फक्त भगवी लागते
चोचले ठाऊक नाही या जिभेला माझिया
भूक येता भाकरीवर फक्त चटणी लागते
आत्महत्येने बळीची जिंदगी गेल्यावरी
कोणत्या चौकात सांगा मेणबत्ती लागते
राहणी ह्या माणसांची उंच झाली केवढी
बंगल्यांच्या अंगणांना आज फरशी लागते
. . . . .निलेश कवडे अकोला

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
समीक्षक
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.