Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

अ.भा.शेतकरी मराठी साहित्य चळवळ : संकल्प

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:10 AM IST, Thu February 27, 2014
                   


 
मराठी भाषा दिन : दोन संकल्प
 

नमस्कार मित्रहो,


          आज २७ फेब्रुवारी आणि महाशिवरात्री सुद्धा आजच. ५२ वर्षापूर्वी महाशिवरात्री अशीच नेमकी २७ फेब्रुवारी या दिवशी आली होती आणि नेमका हाच शुभमुहूर्त निवडून अस्मादिकांनी या पृथ्वीतलावर आपले ’पुनरागमन’ केले. या दिवसाला वाढदिवस का म्हटले जाते हे एक गूढ कोडेच आहे आणि हा दिवस साजरा करावा हे आणखी एक जटिल कोडे. या दिवशी ’वाढ’ कशात होते हेच कळेनासं झालंय. वयमानात वाढ होते मात्र जगण्याचा काळ कमी होत जातो. यात हर्षोल्लास करण्यासारखे काय आहे?


          वय वाढत जाताना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ’वाढ’ या शब्दाचे संदर्भ देखील बदलत जातात. बालपणी वाढत्या वयासोबत शारीरिक बल आणि बुद्धी वाढत जाते. तरुणपणी वाढत्या वयासोबत चैतन्य आणि विवेकशीलता वाढत जाते मात्र एकदा का तारुण्य ओहोटीला लागलं की मग वाढत्या वयासोबत ’वाढ’ शब्दाचे संदर्भही उलटे पडायला लागतात. मानसन्मान वाढण्याची शक्यता असते; केवळ शक्यता असते खात्री नाहीच. मात्र वाढत्या वयासोबत डोळ्याच्या नंबरमध्ये सततची वाढ, प्राकृतिक विकारामध्ये निरंतर वाढ हे मात्र हमखास असते आणि तरीही आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत ’वाढदिवस’ साजरा करण्याचा आपला उत्साह मात्र यत्किंचितही कमी होत नाही. हे मानवी स्वभावातील एक रहस्यच समजावे लागेल.


          आजचा दिवस "मराठी भाषा दिवस" "जागतिक मराठी भाषा दिवस" "मराठी भाषा दिन" म्हणूनही जगभरातील मराठी भाषिकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेऊन मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. या दिवसाचे औचित्य साधून आपणही काहीतरी संकल्प करायला हवा. मी सुद्धा मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी माझ्यापरीने दोन प्रकल्प हाती घेत आहे.


१) सुमारे दीड वर्षापूर्वी म्हणजे २२/०७/२०१२ रोजी मी www.sharadjoshi.in अर्थात "योद्धा शेतकरी" या एका महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाच्या निर्माणाचा एक महाप्रकल्प हाती घेतला. हे संकेतस्थळ म्हणजे शरद जोशी आणि शेतकरी संघटनेविषयी परिपूर्ण माहितीने ओतप्रोत भरलेला अनमोल खजिना व्हायला हवा. शरद जोशींच्या समग्र लेखनासहित अधिवेशने, मेळावे, रस्ता रोको अथवा रेल्वेरोको दरम्यान वेगवेगळ्या आंदोलनस्थळी घडलेल्या घडामोडीविषयीचे शक्यतो फोटोसहित सर्व वृत्तांत येथे उपलब्ध व्हायला हवेत. त्यादृष्टीने कार्य सुरू केले पण हे संकेतस्थळ परिपूर्ण करण्याचे कार्य वाटते इतके नक्कीच सहजसाध्य नसल्याने अजूनही पूर्णत्वास पोचलेले नाही. अजून खूप काम बाकी आहे. दीड वर्षात झालेल्या कामाबद्दल मी स्वतःही समाधानी नाही. पुढील एक वर्षात हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. त्यासाठी येत्या काही काळात एक "राज्यव्यापी दौरा" करण्याचे निश्चित केले आहे.


२) आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलन झालेत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून एका वर्षाच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे ठरवले आहे.


          शामियान्याच्या भव्यदिव्यतेपेक्षा चर्चात्मक दर्जाची "भव्यदिव्यता" जर प्रकटीत करता आली तर ते कदाचित अधिक प्रभावकारी शेतकरी साहित्य संमेलन ठरू शकेल. या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्‍यांची प्रचंड गरज भासेल. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची याचना करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. आपण लवकरच यासंदर्भात चर्चा सुरू करू. संघटनात्मक प्रारूप ठरवू, नियमावली बनवू, संस्था नोंदणीसाठी दस्तावेज तयार करू आणि आकारास आणू अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ.



सहकार्याच्या अपेक्षेत...!



आपला नम्र

गंगाधर मुटे

२७ फेब्रुवारी २०१४

------------------
साहित्य संमेलन
मराठी भाषा दिन
संकल्प
साहित्य
चळवळ
शेतकरी साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
साहित्य
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 15130 views

प्रतिसाद (5)

सहा संमेलने

गंगाधर मुटे

शनीवार, February 29, 2020 - 19:11
Permalink
New

संकल्प केल्याला सहा वर्ष झालीत. सहा वर्षात सहा संमेलने पार पडलीत. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा पाया रचला गेला आहे. आता पुढील वाटचाल तितक्याच जोमाने आणि उत्सहाने झाली तर चळवळ भक्कमपणे उभी राहू शकेल. बघुयात.... भविष्यात काय वाढून ठेवले आहे ते.

  • Log in or register to post comments
येत्या वर्षातील उपक्रम

गंगाधर मुटे

शनीवार, February 29, 2020 - 20:07
Permalink
New

 येत्या वर्षात खालील उपक्रम कटाक्षाने राबवावे लागतील.



१) बळीराजावर निवडक शेतकरी कविता व गझलांचे संकलन : असे संकलन केल्यास विशेषकरून प्रसार माध्यमांना व वक्त्यांना उपयुक्त ठरेल.

२) निवडक शेर आणि चारोळी संकलन 

३) प्रत्येक जिल्ह्यात आणि विभागात शेतकरी कविसंमेलन व शेतकरी गझल मुशायरे आयोजित करणे.

४) शेतकरी साहित्य चळवळीची केंद्रीय कार्यकारिणी ठरवणे.

५) ज्येष्ठ शेतकरी साहित्यिकांची सूची तयार करणे.

६) सातव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागणे.

७) सातव्या विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचा विषय निश्चित करणे.

  • Log in or register to post comments
शुभेच्छा सर !

Dr. Ravipal Bh…

शनीवार, February 29, 2020 - 21:11
Permalink
New

आपल्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा ! *bq*

  • Log in or register to post comments
आपल्यासारखे सहकारी

गंगाधर मुटे

शनीवार, February 29, 2020 - 21:26
Permalink
New

सर, आपल्यासारखे सहकारी मिळाले म्हणूनच चार पावले वाटचाल करता आली. *Ramram*

  • Log in or register to post comments

In reply to शुभेच्छा सर ! by Dr. Ravipal Bh…

स्वागत!

Raosaheb Jadhav

रवीवार, February 28, 2021 - 08:34
Permalink
New

स्वागत!

  • Log in or register to post comments

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर
  • गंगाधर मुटे
  • डॉ. उपेंद्र बळ…

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 21 *
Who's new नवीन सदस्य
  • RATNESH CHAUDHARI
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अत्यंत अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि तितकाच संवेदनशील
    13 hours 46 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
    13 hours 51 minutes ago
  • दळवी सरांची दिवाबत्ती सुंदर…
    14 hours 13 minutes ago
  • लोकांना काय सांगू?
    16 hours 30 minutes ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    17 hours 21 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Adsense

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ