नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

बळीराजा

Chitra Kahate's picture

बळीराजा

बळीराजा हा लेक धरणीचा
फासावर तळमळला।
काळी मायही रडली भळभळा
पाऊस ही हळहळला।

समृद्धीची ओंजळ भरण्या
रात्रंदिन तो खपला।
रित्या घागरी कर्तृत्वाच्या
पाहून तो कोसळला।

धरणीआईची ओटी भराया
अंथरले हे दाणे।
दाहकता सूर्याची पचवून
जखमांनी भडभडला।

काळ्या आईची कुस उजवली
पिके यायची पोटी।
स्वप्नांना गोंजारत हिरव्या
आनंदे सळसळला।

चित्रा कहाते
नागपूर

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
शोधखुणा: 
Share

प्रतिक्रिया